मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आता 'ज्ञान दिवस' म्हणून साजरा होणार

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आता 'ज्ञान दिवस' म्हणून साजरा होणार

    13 एप्रिल :  या वर्षीपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती हा दिवस 'ज्ञान दिवस' म्हणून साजरा केला जाणार आहे. समाजकल्याण मंत्री राजकुमार बडोलेंनी हा निर्णय जाहीर केला असून यासोबतच, इतरही काही महत्त्वाच्या घोषणा त्यांनी केल्या आहेत.

    14 एप्रिल रोजी देशभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. मात्र, राज्य सरकारने आता 'ज्ञान दिवस' म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही संकल्पना आहे. समाजकल्याण मंत्री राजकुमार बडोलेंनी इतरही काही महत्त्वाच्या घोषणा केल्या. डॉ. आंबेडकर यांची आठवण असलेली 50 स्थळं पर्यटनाच्या दृष्टीनं एकमेकांना जोडण्यात येणार आहेत. राज्यातल्या बुद्ध लेण्या आणि बाबासाहेबांच्या स्फूर्तिस्थळांचा पर्यटन कॅरिडॉर म्हणून विकास केला जाणार आहे. त्यासाठी निधीही मंजूर झाला असल्याचं बडोलेंनी सांगितलं आहे.

    First published: