मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Akola Special Report : हवामान विभागाचा अंदाज चुकला, त्यात आमचा काय दोष? शेतकरी हवालदिल!

Akola Special Report : हवामान विभागाचा अंदाज चुकला, त्यात आमचा काय दोष? शेतकरी हवालदिल!

X
राज्यात

राज्यात यंदा लवकर पावसाचे आगमण होणार, असे हवामान विभागाने सांगितले होते. त्यामुळे महाग बी-बियाणे खरेदी करून शेतीची मशागतही शेतकऱ्यांनी केली. मात्र, मृग नक्षत्र सुरू झाले तरी पावसाचा पत्ता नाही. त्यामुळे अकोल्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे.

राज्यात यंदा लवकर पावसाचे आगमण होणार, असे हवामान विभागाने सांगितले होते. त्यामुळे महाग बी-बियाणे खरेदी करून शेतीची मशागतही शेतकऱ्यांनी केली. मात्र, मृग नक्षत्र सुरू झाले तरी पावसाचा पत्ता नाही. त्यामुळे अकोल्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे.

पुढे वाचा ...

    अकोला, 10 जून : यंदा मान्सून आठवडाभर आधीच येणार असल्याच्या हवामान विभागाचा ( Weather Department) अंदाजाने शेतकरी (Akola Farmers) आनंदी झाला होता. मात्र, मृग नक्षत्र रास बुधवार (7 जून) पासून प्रारंभ झाला, तरी पावसाचा काहीच पत्ता नाही. त्यामुळे शेतकर्‍यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. अकोला जिल्ह्यात गुरुवारी 42.9 अंश सेल्सिअस तापमान होते. त्याची पर्वा न करता शेतकऱ्यांनी मशागतीच्या कामांना वेग दिला आहे. पण, पावसांने दडी मारलेली आहे. (The farmer is blaming the weather department)

    मागील वर्षी कोरोना, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, रोगराई, अशा संकटाने शेतकरी हवालदिल झाला होता. पण, खरीब हंगामात झाले नुकसान भरून निघेल, या आशेने त्याने शेतीची कामे सुरू केली. मुलखाची महाग बी-बियाणे खरेदी करून ठेवली. आता पावसाची वाट पाहत बसला आहे. कधी एकदा पाऊस पडतो आणि कधी एकदा पेरणी करतोय, या अपेक्षेने शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसलेला आहे.

    वाचा : Wardha Special Report : शेतीची मशागत पूर्ण झाली; पण पाऊस कधी पडणार? शेतकरी वाट पाहतोय पावसाची!

    अकोला जिल्ह्यात दरवर्षी जून महिन्यात मृग नक्षत्राला पेरणी केली जाते. त्यासाठी शेतकरी मिळेल त्या भावामध्ये बियाणे खरेदी करतो. पण, यावेळी हवामान खात्याने अंदाज वर्तविला होता की, पावसाचे आगमण लवकर होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्याने महागात बियाणे खरेदी केले. मात्र, मृग नक्षत्राच्या दिवशीच हवामान खात्याने पावसाळा लांबला असून उष्णतेची लाट येणार असल्याचे सांगितले आणि शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरेल.

    वाचा : Monsoon Update : मान्सूनच्या आगमनाची प्रतीक्षा संपली, गोवा आणि दक्षिण कोकणात मान्सून दाखल imd कडून माहिती

    आता शेतकरी हवामान विभागाच्या विश्वासावर बियाणे खरेदी करून बसला, पण पाऊस नाही. त्यामुळे शेतकरी आता हवामान विभागाला दोषी ठरवत आहे. कारण, बाजारात बियाणे महाग झाले आहे. बियाणांच्या किमती भरमसाठ वाढल्या आहे. महाबीजने आपल्या बियाणांच्या किमतीमध्ये 140 रुपयांची वाढ केली आहे. आता थोडी किंमत झाली असली तरी, हा पावसाच्या लहरीपणामुळे आणि हवामान विभागाच्या चुकलेल्या अंदाजामुळे खरेदी केलेल्या महाग बियाणांचा भुर्दंड शेतकऱ्यांना सहन करावी लागतो की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी म्हणतात की, "आता आमचा कोणावरच विश्वास राहिला नाही."

    First published:
    top videos

      Tags: Akola News