मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Success Story : ‘रोशनी’च्या यशाने उजाळली घरकाम करणाऱ्यांची 10 बाय 10ची खोली, आईच्या डोळ्यात पाणी!

Success Story : ‘रोशनी’च्या यशाने उजाळली घरकाम करणाऱ्यांची 10 बाय 10ची खोली, आईच्या डोळ्यात पाणी!

X
अनंत

अनंत आर्थिक अडचणींवर मात करत रोशनीचे घवघवीत यश...

एकाच घरात 12 सदस्य, त्यात रात्री उशिरापर्यंत पडद्याचं पार्टीशन बांधून रोशनीने जिद्दीने अभ्यास केला आणि बारावीच्या परीक्षेत विज्ञान शाखेतून गुणांना उत्तम गुणांनी यश संपादित केलं. ती म्हणते, "परिस्थिती कशी का असेना, खचून न जाता प्रयत्न करणं आपल्या हातात असतं."

पुढे वाचा ...

  अकोला, 11 जून : अनंत आर्थिक अडचणींवर मात करत रोशनी दीपक मांडवेकर हिने इयत्ता बारावीमध्ये (12th Board Exam Result) विज्ञान शाखेच्या परीक्षेत 85.67 टक्के गुण मिळवले आहेत. एकाच खोलीत राहणारे 12 सदस्यांचे संयुक्त कुटुंब अशा वातावरणातून अभ्यास करत आणि अनेक आर्थिक अडचणींवर मात करत रोशनीने बारावीत घवघवीत यश संपादित केलेले आहे. (Roshni Mandvekar's success in 12th exam)

  रोशनी ही RLT महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. मांडवेकर कुटुंबीय कमला नेहरूनगर परिसरात राहतात. विवाहित बंधू अन् त्यांची मुले आणि दीपक यांचे आई-वडील व कुटुंबीय मिळून एकूण 12 सदस्य एकाच खोलीत राहतात. रोशनीची आई आणि काकू घरकाम करतात. तर वडील आणि काका 4 ते 5 हजार पगारावर खाजगी काम करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करतात. त्यातून आपल्या मुलांचे शिक्षणाचा खर्चही भागवतात.

  वाचा : अपेक्षेपलीकडचं यश! जिद्द अन् कष्टाच्या जोरावर अकोल्यातील मजुराच्या मुलाला बारावीत 92.67 टक्के; पहा VIDEO

  संयुक्त कुटुंब असल्या कारणाने रोशनीला अभ्यासासाठी कधीच शांत वातावरण मिळालं नाही. ती रात्री घरातील सर्व सदस्य झोपल्यानंतर अभ्यास करायची. मात्र, एका छोट्याशा खोलीत रात्रीच्या वेळेला कसा अभ्यास करायचा, तर एक त्याच खोलीत पडदा बांधून पार्टीशन करून ती अभ्यास करायची. यात रोशनीला तिच्या आईने खूप साथ दिली. अशा कठीण परिस्थितीतून वाट काढत रोशनीने बारावीचा अभ्यास केला आणि कौतुकास्पद यश संपादित केलं.

  आजी-आजोबा आहेत. मात्र, त्यातही रोशनीच्या आजीला कॅन्सर होता. रोशनीचे काका सांगतात की, अशा नाजूक परिस्थितीत त्यांच्या आईच्या आजारावर उपचार करण्यासाठी त्यांनी आईला मुंबईला नेलं आणि त्यांना मरणाच्या दारातून परत आणलं. आता त्या आजी बऱ्या असून त्यांनाही रोशनीच्या या यशाचं खूप कौतुक आहे.

  वाचा : Akola Special Report : हवामान विभागाचा अंदाज चुकला, त्यात आमचा काय दोष? शेतकरी हवालदिल!

  रोशनी सांगते की, "मला NEET चा अभ्यास करून डॉक्टर व्हायचे आहे. क्लास लावायला गेले. पण, फी आवाक्याबाहेर आहे. त्यामुळे मोबाईलच्या साहाय्याने तयारी करत आहे. मला डॉक्टर बनून समाजसेवा करायची आहे. कारण मला परिस्थितीची जाणीव आहे. कारण, गरिबी खूप जवळून बघितली आहे. अडचणी अनेकांना असतात . मात्र, खचून न जाता न डगमगता प्रयत्न करणे आपल्या हाती असते", असंही रोशनी सांगते.

  First published:
  top videos