अकोला, 28 जून : इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर स्वतःला सिद्ध करता येतं. जिल्ह्यातील उमरी येथील राहुल बाळकृष्ण कराळे (Rahul Karale) याने हालाकीच्या परिस्थितीत स्वत:ला सिद्ध केलं आहे. राहूल हा उमरी येथे राहणार साधारण घरचा मुलगा. परिस्थिती नाजूक. लहापणी मंदिरा समोर फुले विकायचा. बालवयातच वडीलांच छत्र हरवलं. घराचा सर्व भार आईवर. त्यात 3 मुली आणि दोन मुलं अशा 5 मुलांचा सांभाळ. अशा परिस्थिती जेमतेम शिक्षण घेवून पुढे वाॅल पेंटची कामे करुन राहुलनेही घराला हात भार लावला यासह त्यानं अभिनय क्षेत्रात काम सुरू केलं आणि आज मोठ्या मेहनतीनंतर तब्बल पाच सिनेमात काम केले असून ‘प्रेमाची लाट लागली वाट’ (Premachi Laat Lagli Waat) हा पहिला मराठी चित्रपट पेक्षकांच्या भेटीला येत आहे. राहुराचा हा प्रेरणादायी प्रवास या विशेष रिपोर्ट मधून पाहूया.
लहानपणा पासूनचं राहुलची स्वप्न मोठी होती. आयुष्यात काही तरी वेगळ करायच होतं पण तशी परस्थिती नव्हती. परिस्थिती हालाखीची त्यात वडिलांचे छत्र हरवल्याने घराचा सर्व भार आईवर येऊन पडला. राहुलसह पाच भावंडे असल्यानं एकट्या आईला परिस्थिती संभाळणे कठीण होते. घराला हातभार लावण्यासाठी राहुल मंदिरासमोर फुलं विकायचा, काही काळ वाॅल पेंटिंग, चहा दुकानात, हाॅस्पीटलमध्येही कामे केली. यासह लहान पणापासून असणारी डान्सची आवड जोपासली. मोठी स्वप्न स्वप्न डोळ्यांसमोर ठेवत आयुष्यात असे बिगारी कामे करण्यापेक्षा वेगळ काही करण्याची तळमळ राहुलची होती. लहान पणापासून चित्रपत्र पाहणे त्यातील भुमिकांचे निरिक्षण करणे आणि त्याप्रमाणे अभिनय करण्याचा प्रयत्न राहुल करत असे. चित्रपटाचे जणू त्याला वेडच लागले होते.
वाचा : Shocking! आकाशातून थेट जमिनीवरील कारवर कोसळलं विमान; भयंकर अपघाताचा VIDEO VIRAL
डोळ्यांसमोर ठेवलेले स्वप्न पूर्ण करायचे ठरवत राहुलने 2013 मध्ये फिल्म इंडस्ट्रीमध्ये करिअर करायच ठरवलं. पण प्रश्न पडला करायचं तर कस? घरची परिस्थिती नाजूक, अशा स्थितीत मुंबईला जाण्यासाठी राहुकडे पैसे नव्हती तर आईने पोतं विकून राहुलच्या मुंबईला जाण्याची सोय केली होती.
राहुलने मुंबई गाठले, तिथे जाऊन मोठी मेहनत घेतली. मुंबईला असताना देखील कलरची कामं केली. तिथं भरपूर त्रासही झाला. पण हार नाही मानली. कलरची काम करून तो फिल्मच्या शूटला जायचा. कालांतराने कामं मिळत गेली व तो करत गेला. 2018 मध्ये राहुलची मुंबईला असताना, इन्स्पॅक्टर विठ्ठलसिंग राजपूत यांच्याशी ओळख झाली. त्यांनी राहुलला खूप सपोर्ट केला. राहुल कामाविषयी जेव्हा नर्वस असायचा तेव्हा ते त्याचा आत्मविश्वास वाढवायचे. यातून राहुलला कामासाठी उर्जा मिळायची. मेहनत, जिद्दीने राहुलला एका मागे एक मराठी, हिंदी चित्रपटांत काम मिळत आहे.
मनात जिद्द ,चिकाटी, सय्यम असेल तर एक दिवस आपल्याला यश हे जरुर मिळते, हे नक्की आहे. आतापर्यंच्या यशामागे फॅमिली आणि मित्रांचा मोठा हातभार असल्याचे राहुल सांगतो. राहुलने आतापर्यंत एकूण दहा चित्रपटांत काम केले. राहुलने काम केलेले चित्रपट लवकरच आपल्या भेटीला येणार आहेत. या चित्रपटांत सयाजी शिंदे, शक्ती कपूर, सुदेश बेरी, गोविंद नामदेव, राखी सावंत, सुनिल पालं, विलास उजवणे, मुश्ताक खान, सुनील गोडबोले, गणेश यादव अशा दिग्ग्ज लोकांचा समावेश आहे. या चित्रपटासाठी राहुलला परभणी, लोणावळा आणि ओरंगाबादला ऑडिशन द्यावे लागले. आता सध्या राहुल हा आपल्या परिवारासोबत अकोल्याला असतो. जेव्हा त्याला शूटसाठी बोलावलं जात तेव्हा तो मुंबईला असतो. मात्र इतरवेळी तो आपल्या मुळगावी आपल्या आई आणि भावासोबत अकोल्यात असतो.
राहुलची आई सांगते की, आम्ही लहानपणापासूनच खूप कष्ट केलेत. परिस्थिती नाजूक असल्याने खूप कठीण दिवस काढावे लागले. आम्हाला नेहमी वाटायचं की, आमच्या मुलाने काहीतरी करावं, आणि त्याने ते करुनही दाखवलं आहे. राहुलचा एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे त्याचा आम्हाला खूप आनंद आहे.
डॉ. मिलिंद चौखंडे सांगतात की, मला अतिशय आनंद वाटतो, की माझ्या हॉस्पिटलमध्ये गेल्या 20 वर्षांपासून कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या उशाबाईंच्या मुलाने खूप छान प्रगती केली. राहुलचा आम्हाला देखील अभिमान वाटतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.