मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /निवणुकीतील पराभव जिव्हारी! नंगी तलवार घेऊन गावभर फिरला पण.. माजी सरपंचाची जिल्ह्यात चर्चा

निवणुकीतील पराभव जिव्हारी! नंगी तलवार घेऊन गावभर फिरला पण.. माजी सरपंचाची जिल्ह्यात चर्चा

अकोला जिल्ह्यात तर ग्रामपंचायत हातातून गेल्यानं एक गावपुढारी हातात तलवार घेऊन गावात दमदाटी करत फिरत होता.

अकोला जिल्ह्यात तर ग्रामपंचायत हातातून गेल्यानं एक गावपुढारी हातात तलवार घेऊन गावात दमदाटी करत फिरत होता.

अकोला जिल्ह्यात तर ग्रामपंचायत हातातून गेल्यानं एक गावपुढारी हातात तलवार घेऊन गावात दमदाटी करत फिरत होता.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Akola, India

अकोला, 24 डिसेंबर : ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर काही ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या. अकोला जिल्ह्यात तर ग्रामपंचायत हातातून गेल्यानं एक गावपुढारी हातात तलवार घेऊन गावात दमदाटी करत फिरत होता. गुन्हा दाखल झाल्यावर गावपुढारी आता फरार झालाय.

अकोला जिल्ह्यातल्या खामखेड गावातल्या रस्त्यावर हातात तलवार घेऊन गावपुढारी फिरत होता. सुरेश गुंजकर, असं या पुढाऱ्याचं नाव आहे. गुंजकर तब्बल 30 वर्ष या ग्रामपंचायतीचा सरपंच होता. पण नुकत्याच झालेल्या निवडणुकीत गावकऱ्यांनी त्याला आस्मान दाखवलं. चिडलेल्या गुंजकरनं हातात तलवार घेऊन गावातल्या लोकांना दमदाटी केली. त्याला आक्षेप घेणाऱ्यांना त्यांनं मारहाण केली. या प्रकरणी स्थानिकांनी पोलिसांत तक्रार केल्यानंतर गावपुढारी फरार झालाय. या गाव पुढाऱ्याचा नंगी तलवार घेऊन गावात दहशत पसरवण्याचा व्हिडिओ समोर आला.

निवडणुकीत जयपराजय होत असतात. ज्या गावकऱ्यांनी तीस वर्ष निवडून दिलं त्या गावकऱ्यांनी यावेळी का नाकारलं याचं आत्मपरीक्षण करणं गरजेचं होतं. त्याऐवजी मतदारांवर तलवार उगारणाऱ्या या तलवारबाज नेत्याला पुन्हा कधीही निवडून देऊ नये हिच अपेक्षा.

First published:
top videos