जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Akola: 'या' गावचा असाही पॅटर्न; 25 जण पोलीस खात्यात नोकरीला, पहा VIDEO

Akola: 'या' गावचा असाही पॅटर्न; 25 जण पोलीस खात्यात नोकरीला, पहा VIDEO

पोलीस

पोलीस

जेमतेम 2 हजार लोकवस्तीचे करतंडी रेल्वे हे गाव शेती आणि मजुरीवर अवलंबून आहे. या छोट्या गावातील मुला-मुलींनी शिक्षणाचा आधार घेत आपले करिअर सेट केले आहे. यात या मुलांचे पालक आणि गावकऱ्यांचे देखील मुलांना प्रोत्साहन मिळत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

    अकोला, 14 जून : शिक्षण (Education) हे काळाची गरज बनले आहे आणि त्याच शिक्षणाच्या आधारावर आपले करिअर (Career) देखील घडवता येते. गाव खेड्यातील मुलं-मुली आता शिक्षणात आपले नाव कमावत आहेत. जिल्ह्यातील करतंवाडी रेल्वे (Kartanwadi Railway) गावात जवळपास प्रत्येक घरातील एक व्यक्ती पोलीस खात्यात (Police Department) आपले कर्तव्य बजावत आहे. गावातील तब्बल 25 ते 30 जणांना पोलीस खात्यात नोकरी लागली असून गावाने पोलीस खात्यात भर्ती होण्याचा नवा प‌ॅटर्नच बनवला आहे.

    जाहिरात

    वाचा :  BEED : जिलेबी आणि भजी मिक्स असणारा ‘टक्कर’ पॅटर्न माहितीय का? पहा या भन्नाट पदार्थाचा VIDEO

    जेमतेम 2 हजार लोकवस्तीचे करतंडी रेल्वे हे गाव शेती आणि मजुरीवर अवलंबून आहे. या छोट्या गावातील मुला-मुलींनी शिक्षणाचा आधार घेत आपले करिअर सेट केले आहे. यात या मुलांचे पालक आणि गावकऱ्यांचे देखील मुलांना प्रोत्साहन मिळत आहे. यामुळेच गावातील विद्यार्थाची पोलीस खात्यात निवड होताच गावभर मोठ्या जल्लोषात मिरवणूक काढली जाते. पोलीस खात्यातील अधिकारी पर्यंतचा प्रवास गावातील इतरांना कळावा यासाठी या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांचा सत्कार सुद्धा करण्यात येतो. करतवाडी रेल्वे या गावातील पोलीस अधिकारी महाराष्टाच्या कानाकोपऱ्यात आपले कर्तव्य बजावत आहेत ही बाब करतंडी वासियांसाठी मान उंच करणारी आहे.

    **हेही वाचा-** Career After 12th: मुलींसाठी ‘हा’ कोर्स अगदी मोफत!, जाणून घ्या SPECIAL REPORT

    “येत्या काळात मोठे अधिकारी घडवण्याचा मानस…” या सर्व पोलीस बांधवांशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की, “आमचं गाव केवळ 2 हजार वस्तीचे आहे, आजवर गावातून अनेक पोलीस , सैनिक तयार झाले आहेत. येत्या काळात मोठे अधिकारी घडवण्याचा आमचा माणसं आहे. त्यासाठी गावात पोलीस अकॅडमी, सुसज्ज वाचनालय, महिला प्रशिक्षण केंद्र, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, रोजगार मार्गदर्शन केंद्र (employment guidance center)आदी सुरू करण्याचा आमचा मानस आहे. गावातील सर्व निवृत्त पोलीस आणि सध्या कार्यरत असलेले पोलीस अधिकारी याकामी मदत करणार आहेत.”

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात