जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / कर्जमाफी घोषित होईपर्यंत एकाही मंत्र्याला गावात येऊ देऊ नका - अजित पवार

कर्जमाफी घोषित होईपर्यंत एकाही मंत्र्याला गावात येऊ देऊ नका - अजित पवार

फाईल फोटो

फाईल फोटो

16 एप्रिल : कर्जमाफीच्या मुद्द्यावरून अजित पवारांनी आज पुन्हा एकदा सरकारला धारेवर धरलं. कर्जमाफी घोषित होईपर्यंत एकाही मंत्र्याला गावात येऊ देऊ नका. त्या मंत्र्याला म्हणावं बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर, अशा शब्दांत अजित पवारांनी सरकारवर टीका केली. बुलडाण्यातून सुरू झालेली दुसऱ्या टप्प्यातली संघर्षयात्रा सध्या धळे शहरातील शिरपूरमध्ये पोहोचली आहे. यावेळी अजित पवारांसह, जितेंद्र आव्हाड, राधाकृष्ण विखे पाटील, जयंत पाटील, अबू आझमीं यांच्यासह विविध पक्षाचे नेते उपस्थित होते. विरोधी पक्षाच्या सर्वच नेत्यांनी सरकारच्या धोरणावर टीका केली.

  • -MIN READ
  • Last Updated :

    16  एप्रिल : कर्जमाफीच्या मुद्द्यावरून अजित पवारांनी आज पुन्हा एकदा सरकारला धारेवर धरलं. कर्जमाफी घोषित होईपर्यंत एकाही मंत्र्याला गावात येऊ देऊ नका. त्या मंत्र्याला म्हणावं बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर, अशा शब्दांत अजित पवारांनी सरकारवर टीका केली. बुलडाण्यातून सुरू झालेली दुसऱ्या टप्प्यातली संघर्षयात्रा सध्या धळे शहरातील शिरपूरमध्ये पोहोचली आहे. यावेळी अजित पवारांसह, जितेंद्र आव्हाड, राधाकृष्ण विखे पाटील, जयंत पाटील, अबू आझमीं यांच्यासह विविध पक्षाचे नेते उपस्थित होते. विरोधी पक्षाच्या सर्वच नेत्यांनी सरकारच्या धोरणावर टीका केली. सरकार शेतकरी विरोधी असल्याची टीका यावेळी विरोधकांकडून करण्यात आली. तर शिवसेनेच्या अजेंड्यावर शेतकरी कर्जमाफीचा मुद्दाच नसल्याचा आरोप राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. दरम्यान विरोधकांची संघर्षयात्रा जळगावात पोहोचल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटीलृ, अजित पवार, जयंत पाटील, राजेश टोपे आदि महत्वाच्या नेत्यांनी  भाजप नेते एकनाथ खडसे यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. या सर्वांनी एकनाथ खडसे यांना संघर्ष यात्रेत सहभागी होण्याचं निमंत्रण दिल. अजित पवार यांनी ही बाब उघडपणे मान्य केलेली नसली तरीही राधाकृष्ण विखे पाटलांनी मात्र तशी विनंती खडसेंना केल्याची माहिती प्रसारमाध्यमांना दिली. सध्या एकनाथ खडसे हे सत्तेत असून देखील विरोधी पक्षाची भुमिक पार पाडत आहेत, शेतक-यांच्या प्रश्नांवर ते विधानसभेत सरकारला खडसावत आहेत.त्यामुळे एकनाथ खडसे यांनी शेतक-यांच्या कर्जमाफीच्या मुद्दयावर आमच्या संघर्ष यात्रेत सहभागी व्हावे अशी विनंती केली असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात