जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / मामामुळेच भाच्याने 'गेम' केला? सत्यजीत तांबेंच्या राजकीय खेळीची Inside Story

मामामुळेच भाच्याने 'गेम' केला? सत्यजीत तांबेंच्या राजकीय खेळीची Inside Story

मामामुळेच भाच्याने 'गेम' केला? सत्यजीत तांबेंच्या राजकीय खेळीची Inside Story

नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसकडून विजयाची हॅट्रिक करणारे डॉक्टर सुधीर तांबे यांनी पक्षाला अनपेक्षित धक्का दिला आहे. सुधीर तांबे यांच्याऐवजी सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

  • -MIN READ Nashik,Maharashtra
  • Last Updated :

अहमदनगर, 12 जानेवारी : नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसकडून विजयाची हॅट्रिक करणारे डॉक्टर सुधीर तांबे यांनी पक्षाला अनपेक्षित धक्का दिला आहे. काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर झालेली असताना ऐनवेळी आपला अर्ज दाखल न करता त्यांनी मुलगा सत्यजीत तांबे याचा अपक्ष अर्ज दाखल केला आहे. भाजपकडून सत्यजीत तांबे उमेदवारी करतील, अशी चर्चा असताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज चमत्कार होईल, असं सूचक विधान केलं होतं. काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे मेव्हणे डॉ. सुधीर तांबे यांनी गेल्या तीन निवडणुका जिंकत नाशिक पदवीधरचे प्रतिनिधीत्व केलंय. आजही त्यांनाच पक्षाने उमेदवारी जाहीर केलेली होती. काँग्रेसकडून सुधीर तांबे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गेलेही, मात्र आपला उमेदवारी अर्ज दाखल न करता मुलगा सत्यजित तांबे याचा अपक्ष अर्ज त्यांनी दाखल केला. मी काँग्रेसचा उमेदवार असून महाविकास आघाडी म्हणून निवडणूकीला सामोरे जाणार असल्याचं सत्यजीत तांबे म्हणत आहेत, मात्र दुसरीकडे भाजपाचा देखील पाठींबा घेणार असल्याचं म्हणत असल्याने मोठा संभ्रम निर्माण झालाय. भाच्याला मामाचाच विरोध? बाळासाहेब थोरातांचा भाचा असलेला सत्यजीत याला खऱ्या अर्थाने सुरुवातीपासून मामाचाच विरोध असल्याचं बघायला मिळतंय. राजकीय महत्त्वाकांक्षा घेऊन आखाड्यात उतरलेल्या सत्यजीत तांबे यांनी 2009 साली शिर्डी विधानसभेत राधाकृष्ण विखे पाटलांविरोधात लढण्याची तयारी केली होती, मात्र त्यांना उमेदवारी मिळू शकली नाही. 2014 साली अहमदनगर शहरातून सत्यजीत तांबे यांनी आमदारकी लढवली मात्र त्यांचा पराभव झाला. आपल्या मुलाला आमदार करायचंय हे स्वप्न असणाऱ्या सुधीर तांबे यांनी आज पक्षादेश धुडकावून लावत आपला अर्जच दाखल न केल्याने काँग्रेसचीही गोची झाली आहे.

News18लोकमत
News18लोकमत

नाशिक पदवीधर निवडणुकीत आता काँग्रेसचा अधिकृत उमेदवार नसणार. सत्यजीत तांबेना पाठिंबा देण्याशिवाय महाविकास आघाडीला पर्यायही राहीला नाही, त्यामुळे तांबेच्या या खेळीने आघाडीची मोठी अडचण झाली आहे. जर आघाडीने पाठिंबा दिला नाही तर कदाचित सत्यजीत तांबे हे भाजप पुरस्कृत उमेदवार होऊ शकतात. नाशिक पदवीधर संघात तीन टर्म आमदार राहीलेल्या सुधीर तांबे यांची घट्ट पकड आहे, मतदार पक्षापेक्षा व्यक्ती म्हणून सुधीर तांबेच्या निर्णयासोबत राहू शकतात, त्यामुळे काहीही झालं तरी या सर्व अनपेक्षित घटनाक्रमानंतरही विजयाचे पारडे तांबेंच्याच बाजूने झुकत असल्याचं मत राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात