मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटीलने घेतले शिर्डीत साई समाधीचे दर्शन, तरुणाईला दिला 'हा' संदेश

महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटीलने घेतले शिर्डीत साई समाधीचे दर्शन, तरुणाईला दिला 'हा' संदेश

कोल्हापूरचे महाराष्ट्र केसरी पैलवान पृथ्वीराज पाटील (Kolhapur Prithviraj Patil) यांनी आज शिर्डीला येवून साई बाबा समाधीचे दर्शन घेतले.

कोल्हापूरचे महाराष्ट्र केसरी पैलवान पृथ्वीराज पाटील (Kolhapur Prithviraj Patil) यांनी आज शिर्डीला येवून साई बाबा समाधीचे दर्शन घेतले.

कोल्हापूरचे महाराष्ट्र केसरी पैलवान पृथ्वीराज पाटील (Kolhapur Prithviraj Patil) यांनी आज शिर्डीला येवून साई बाबा समाधीचे दर्शन घेतले.

शिर्डी, 23 एप्रिल : कोल्हापूरचे महाराष्ट्र केसरी पैलवान पृथ्वीराज पाटील (Kolhapur Prithviraj Patil) यांनी आज शिर्डीला येवून साई बाबा समाधीचे दर्शन घेतले. अकरा किलो वजनाची चांदीची गदा साईबाबा चरणी ठेवत पैलवान पृथ्वीराज यांनी मनोभावे साई समाधीचे दर्शन घेतले.

काय म्हणाले पृथ्वीराज पाटील?

राजकारण , टीव्ही, मोबाईल अशा गोष्टींपासून आपण दूर आहोत. तालीम आणि आखाडे यांच्याशी नाळ जोडली असल्यानं लहानपणापासून पैलवान व्हायचय हे एकमेव ध्येय होतं आणि ते आता साताऱ्यातील स्पर्धेत पूर्ण झाले आहे. वयाच्या विसाव्या वर्षी पृथ्वीराज पाटील महाराष्ट्र केसरी झाले आहेत. पुढचे ध्येय हे ऑलिम्पिक असणार असून त्यासाठी तयारी सुरू आहे. यामुळेच बाबांचे दर्शन घेण्यासाठी शिर्डीत आल्याचं पैलवान पृथ्वीराज यांनी यावेळी म्हटलं. तसेच तरुणांनी एकतर शिक्षणाकडे लक्ष द्यावे किंवा एखादा खेळ निवडावा, इतर गोष्टीत पडू नये, असा सल्लाही पैलवान पृथ्वीराज पाटील यांनी साई दर्शनानंतर तरुणांना दिला. यावेळी साईबाबासंस्थानच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला.

कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील ठरला यंदाचा महाराष्ट्र केसरी -

महाराष्ट्र केसरी कुस्तीचा अंतिम सामना (Maharashtra Kesari 2022 final match) हा कोल्हापूर विरुद्ध मुंबई असा झाला. कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील आणि मुंबईचा विशाल बनकर यांच्यात अंतिम लढत झाली. या लढतीत कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटील (Kolhapur Prithviraj Patil) याने मुंबईच्या विशाल बनकरचा (Vishal Bankar) पराभव केला आहे. सहा मिनिटांच्या या लढतीत पृथ्वीराज पाटील याने बाजी मारली आहे.

अंतिम लढतीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. मुंबईच्या विशाल बनकर याने सुरुवातीला आघाडी घेतली मात्र, नंतर पृथ्वीराज पाटील याने विशाल बनकर याच्यावर आघाडी घेतली आणि अखेर महाराष्ट्र केसरीची गदा आपल्या नावावर केली. पृथ्वीराज पाटील याने विशाल बनलकरचा पाच विरुद्ध चार अशा पॉईंट्सने पराभव केला आहे. यासोबतच पृथ्वीराज पाटील याने 45वा महाराष्ट्र केसरी होण्याचा मान पटकावला. 

हेही वाचा - मोठी बातमी ! पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे उद्या एकाच मंचावर येण्याची शक्यता

अंतिम लढत ही पृथ्वीराज पाटील आणि विशाल बनकर यांच्यात झाली. विशाल बनकर हा सोलापूरचा आहे. मात्र, या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत तो मुंबईचे प्रतिनिधित्व करत होता. कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटील याने विशाल बनकर यावा चितपट केलं आहे. शेवटचे काही सेकंद शिल्लक असताना पृथ्वीराज पाटील याने बाजी मारली आहे.

पृथ्वीराज पाटील हा कोल्हापूरचा आहे. पृथ्वीराज पाटील याच्या विजयामुळे तब्बल 21 वर्षांनंतर महाराष्ट्र केसरीची गदा ही कोल्हापूरला मिळाली आहे.

First published:
top videos

    Tags: Shirdi, Shirdi news