अहमदनगर, 29 ऑक्टोबर : महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये उंच भरारी घेत असून आपलं नावलौकिक मिळवत आहेत. महिलांना समाजात आणि कुटुंबात समान वागणूक मिळायला हवी, त्यांच्या विचारांचा आदर झाला पाहिजे. यासाठी प्रथम महिला आर्थिक सक्षम व्हायला हवी. यासाठी अनेक योजना आहेत. योजनांचा महिला लाभ घेऊन सक्षम होत आहेत. स्त्रीशक्ती सक्षम व्हावी यासाठी काही गाव महिलांना आर्थिक बाजूने सक्षम करण्यासाठी पुढे सरसावत आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील आंबी खालसा गावात महिला सक्षमीकरणासाठी अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम राबवले जात आहेत. गावात महिला उन्नतीसाठी व महिलांना पुरुषांच्या बरोबरीने स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी गावातील सर्व महिलांना एकत्रित करत महिला महासंघामार्फत 36 बचत गटांची स्थापना केली. महिलांना पूरक उद्योगांची उभारणी करून देऊन महिला सक्षमीकरणाचे महत्त्वपूर्ण काम केले जात आहे. तसेच गावात स्त्री जन्माचे स्वागत जोरदार केलं जात. विधवा पुनर्विवाहासाठी देखील एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. पुनर्विवाहास आर्थिक मदत विधवा महिलांचे प्रश्न अत्यंत बिकट आहेत. अनेक योजना राबवूनही त्यांचे प्रश्न सुटलेले नाहीत. या प्रश्नाचे गांभीर्य ओळखून संगमनेर तालुक्यातील आंबी खालसा येथील ग्रामपंचायतीने गावातील विधवांसाठी पुढाकार घेतला आहे. विधवांच्या पुनर्विवाहास प्रोत्साहन देण्याचा ठराव ग्रामसभेने केला आहे. यात विधवा पुनर्विवाहासाठी 11 हजार रुपये ग्रामपंचायतकडून व सरपंचाकडून 5000 रुपये असे एकूण 16000 रुपये देण्यात येणार आहेत. विधवांच्या पुनर्विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेणारी ही पहिलीच ग्रामपंचायत असावी. Video : मूर्ती लहान किर्ती महान! बारावीतील मुलीची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद मुलीच्या स्वागतासाठी एक हजारांची मदत महिला बालकल्याणमधून ज्या घरी मुलीचा जन्म होईल त्यांना मुलीच्या जन्माच्या स्वागतासाठी एक हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याचे ठरले आहे. एखाद्या महिलेचा संसार अर्ध्यावर मोडल्यानंतर संपूर्ण जीवन तिला एकटीला व्यतीत करावा लागतो. मात्र या स्त्रीने आपल्या भविष्याचा विचार करत पुनर्विवाह करावा. त्यासाठीच या ग्रामपंचायतीने स्तुत्य उपक्रम राबवला आहे. विधवांच्या पुनर्विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक मदत देण्याच्या निर्णयामुळे विधवा पुनर्विवाहचे प्रमाण वाढू शकते. त्यामुळे आंबी खालसा ग्रामपंचायतने उचललेले हे पाऊल समाजासाठी आदर्श आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.