मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /शिर्डी साईंच्या झोळीत करोडोंचे दान; भाविकाने 1 कोटीच्या डीडीसह 27 लाखांची सोन्याची आरती केली अर्पण

शिर्डी साईंच्या झोळीत करोडोंचे दान; भाविकाने 1 कोटीच्या डीडीसह 27 लाखांची सोन्याची आरती केली अर्पण

शिर्डीच्या साईबाबांना 01 कोटी 27 लाख रुपयांचे दान.. एक कोटीचे डीडी तर 27 लाखांची सुवर्ण आरती ..

शिर्डीच्या साईबाबांना 01 कोटी 27 लाख रुपयांचे दान.. एक कोटीचे डीडी तर 27 लाखांची सुवर्ण आरती ..

शिर्डीच्या साईबाबांना 01 कोटी 27 लाख रुपयांचे दान.. एक कोटीचे डीडी तर 27 लाखांची सुवर्ण आरती ..

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Shirdi, India

सुनिल दवंगे, प्रतिनिधी

शिर्डी, 11 जानेवारी : 2022 च्या रेकॉर्डब्रेक देणगीनंतर 2023 च्या सुरुवातीलाच शिर्डीच्या साईबाबांना तब्बल एक कोटी रुपयांचे दान एका भाविकाने दिले आहे. हैदराबाद येथील साईभक्त राजेश्वर यांनी साईबाबांना ही एक कोटी रुपयांची देणगी दिली आहे. त्यांनी हे दान मेडिकल फंडमध्ये हे दान दिले असल्याचे साई संस्थानचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल जाधव यांनी सांगितले.

शिर्डीच्या साईबाबांनी आपल्या हयातीत आरोग्य सेवेला अधिक महत्त्व दिले होते. हीच आरोग्यसेवा साई संस्थान देखील पुढे नेत बाबांचा वारसा जपण्याचा प्रयत्न करत आहेत. साई संस्थानच्या वतीने साईबाबा सुपर आणि साईनाथ अशी दोन रुग्णालये चालवली जातात. यातील साईनाथ रुग्णालय हे पुर्णतः मोफत असून याठिकाणी राज्यभरातून गरजू रुग्ण उपचार घेण्यासाठी येतात. तर साईबाबा सुपर मध्ये 50 टक्के चॅरिटी वर उपचार केले जातात.

अशा साई बाबांचा आरोग्यवारसा यात साईभक्त राजेश्वर यांनी साई संस्थानला 25 लाख रुपयांचे चार डीडी दिले आहेत. ज्यांची एकुण किमंत एक कोटी रुपये आहे. साईसंस्थानचे सीईओ राहूल जाधव यांनी हे दान स्विकारले आहे. तसेच दानशूर भाविक राजेश्वर यांचा साईंची मुर्ती, उदी, साईचरित्र देवून सत्कार केला आहे.

साईंना दान देणारे भाविक राजेश्वर यावेळी बोलताना भावूक होतात. राजेश्वर म्हणतात की, "जे साईंचे आहे तेच त्यांना आपण देत आहोत. आपल्याकडे जे काही आहे ते साईबाबांच्या आशीर्वादानेच आहे. नेहमी आपण बाबांना दान करत असतो, मात्र, यावेळी साईकृपा व्हेंनचर ह्या आमच्या ट्रस्टच्या नावाने एक कोटी रुपये मेडीकल फंडात दान स्वरुपात दिले आहे. सुरुवातीला सोन्याची वस्तू दान देण्याचा विचार केला होता. मात्र, बाबांना सोने देले तर माझ्यात कदाचित अहंकार आला असता म्हणून मी मेडीकल फंडात हे दान दिले आहे."

भाविकाने दान केलेली 27 लाखांची सुवर्ण आरती.

भाविकाने दान केलेली 27 लाखांची सुवर्ण आरती.

हेही वाचा - शिर्डीच्या साईचरणी 400 कोटींचं दान, गेल्या वर्षाच्या तुलनेत कमालीची वाढ

साईबाबांना गेल्या वर्षी म्हणजे 2022 मध्ये 400 कोटी 17 लाखांचे दान प्राप्त झाले होते. नववर्ष प्रारंभेला 17 कोटी 81 लाखांचे दान प्राप्त झाले होते. त्यात आता 2023 मधील तब्बल 1 कोटी रुपयांचे यंदाचे मोठे दान प्राप्त झाले आहे. तर याच बरोबर व्ही राजेंद्र या चेन्नई येथिल साईभक्तांने 27 लाख 77 हजार रुपायांची सोन्याची आरती दान दिली आहे. ऐवढच काय तर हैदराबाद येथील सुब्बाराव या भाविकाने देखील साई संस्थानला 47 लाख रुपयांचे एक्स- रे मशीन दान देण्याचा संकल्प केल्याचे साई संस्थानकडून सांगण्यात आले आहे.

First published:

Tags: Sai Baba Of Shirdi (Deity), Shirdi, Shirdi news, Shirdi sai baba sansthan