पुणे, 20 जुलै : पुणे-सोलापूर हायवेवर इट्रिका आणि ट्रकमध्ये झालेल्या अपघातामध्ये 9 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. कदम वाक वस्ती इथं ग्रामपंचायतीसमोर हा भीषण अपघात झाला. अपघातात मृत्यू झालेले सर्वजण दौंड तालुक्यातील यवत इथले रहिवसी होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-सोलापूर हायवेवर सोलापूरच्या दिशेने जाणार्या इट्रिका या चार चाकी गाडीतील चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने गाडीने थेट दुभाजक ओलांडला आणि समोरून येणाऱ्या ट्रकला जोरदार धडक दिली. ही धडक एवढी जोरात होती की इट्रिकामधील 9 जणांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, दौंड तालुक्यातील यवतचे हे सर्व तरुण काल सकाळी रायगडला इर्टिकामधून फिरायला गेले होते. सहलीचा आनंद घेऊन परत येत असताना या तरुणांवर काळाने घाला घातला. रात्री 1 वा. कदम वाकवस्तीत हा भीषण आपघात झाला आहे. अपघातात जीव गमावलेल्या तरुणांची नावे: अक्षय भरत वाईकर, विशाल सुभाष यादव, निखिल चंद्रकात वाबळे, सोनू उर्फ नूरमहद अब्बास द्याया, परवेझ आशपाक अतार , शुभम रामदास भिसे, अक्षय चंद्रकात घिगे, दत्ता गणेश यादव, आणि जुबेर मुलाणी अशी 9 मृत तरुणांची नावे आहेत. पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात, 9 जणांचा जागीच मृत्यू
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.