मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Abu Azmi : घरी इन्कम टॅक्स आणि ईडीचा छापा? अबू आझमी अमरावतीहून थेट मुंबईला रवाना

Abu Azmi : घरी इन्कम टॅक्स आणि ईडीचा छापा? अबू आझमी अमरावतीहून थेट मुंबईला रवाना

सपाचे आमदार अबू आझमी अकोला दौऱ्यावर आले होते. दरम्यान आझमींनी अकोला दौरा रद्द करून तातडीने मुंबईसाठी रवाना झाले आहेत.

सपाचे आमदार अबू आझमी अकोला दौऱ्यावर आले होते. दरम्यान आझमींनी अकोला दौरा रद्द करून तातडीने मुंबईसाठी रवाना झाले आहेत.

सपाचे आमदार अबू आझमी अकोला दौऱ्यावर आले होते. दरम्यान आझमींनी अकोला दौरा रद्द करून तातडीने मुंबईसाठी रवाना झाले आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Sandeep Shirguppe

अकोला, 15 नोव्हेंबर : सपाचे आमदार अबू आझमी अकोला दौऱ्यावर आले होते. दरम्यान आझमींनी अकोला दौरा रद्द करून तातडीने मुंबईसाठी रवाना झाले आहेत. अचानक दौरा रद्द करण्यात आल्याने अबू आझमी का गेले याबाबत शंका वक्त केली जात आहे. दरम्यान त्यांच्या मुंबईतील राहत्या घरी इन्कम टॅक्स आणि ईडीकडून छापेमारी केल्याची माहिती समोर आली आहे. याचबरोबर ते अमरावती दोऱ्यावर असताना त्यांना पोलिसांनी नजर कैदेत ठेवल्याची सुद्धा चर्चा रंगली आहे.

यावर अबु आझमी यांना माध्यमांनी विचारले असता ते म्हणाले की, मी माझ्या खाजगी व्यापारात अडचण आल्यामुळे मुंबईला निघत असल्याचे त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. माझ्या घरी किंवा कुठेही IT किंवा ED चे छापे पडले नसल्याचे आझमी म्हणाले परंतु त्यांनी अचानक दौरा रद्द केल्याने शंका व्यक्त करण्यात आली आहे. समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी हे कालपासून अमरावती दौऱ्यावर होते व त्यांची आज अकोला येथे जाहीर सभा होणार होती.

हे ही वाचा : चलो गुवाहाटी.., मुख्यमंत्री शिंदेंचं ठरलं; 50 आमदारांना घेऊन जाण्याची तारीख निश्चित!

लव जिहादच्या नावाखाली भाजपचा अतिरेक

अमरावतीत अलीकडे भाजपने लव्ह जिहादचे अनेक आरोप केले याचा देखील समाचार अबू आझमी यांनी घेतला, 18 वर्षा नंतर कोणीही कोणाशी लग्न करू शकतो, मुलीवर दबाव टाकून मुस्लिम मुलांना फसवण्याचा हा डाव आहे. मुस्लिमांना फसवण्यासाठी टार्गेट केलं जात असल्याचे ते म्हणाले. मुख्तार अब्बास नक्वी, शहानवाज हुसेन हे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचे जावई आहेत. त्यांना पकडावे त्यांनाही लव जिहादचा जाब विचारावा अशी टीका अबु आझमी यांनी केली.

देशात नवीन संविधान लिहणे सुरू

भाजपवर टीका करत आझमींनी खळबळजनक व्यक्तव्य करत म्हणाले, देशात नवीन संविधान लिहणे सुरू आहे, तसेच नवीन संसद, राष्ट्रपती भवन, पंतप्रधान निवास तयार करणे सुरू आहे. त्यामुळे जुनी संसद पाडण्याला विरोध केला पाहिजे या विरोधात उभे राहिले पाहिजे असं आवाहन समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनी केलं.

हे ही वाचा : जितेंद्र आव्हाडांच्या जामीन अर्जावर कोर्टात हायहोल्टेज ड्रामा, दुपारी 2 वाजता होणार फैसला

15 लाख रुपये पंतप्रधान मोदी देणार होते दोन करोड नोकरी देणार होते त्याच काय झालं. देशात बेरोजगारी वाढली आहे तर देश बरबाद होत आहे याला जबाबदार पंतप्रधान नरेंद्र मोदी असल्याचे म्हणत त्यांनी मोदींवर जोरदार टीका केली.

First published:

Tags: Abu azmi, Case ED raids, Income tax