मुंबई, 01 जुलै : आषाढी एकादशीतील (aashadhi ekadashi) पंढरपूरची वारी (waree) म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात मोठा असा हा सोहळा. विठुनामाचा गजर करत मोठ्या संख्येने वारकरी पंढरपूरच्या दिशेनं पायी रवाना होतात आणि वारीचा हा सोहळा डोळ्यात भरून ठेवावा असाच असतो. यंदा मात्र कोरोना महासाथीमुळे वारीचा असा हा सोहळा अनुभवता येणार नाही. यंदाची आषाढी वारी अत्यंत मोजक्या वारकरी बंधूंच्या उपस्थितीमध्ये साजरी करण्यात येत आहे. आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला राज्यभरातील मानाच्या पालख्या निवडक वारकरी बंधूंसह आपल्या लाडक्या एसटीने अगदी दिमाखात पंढपूर नगरीमध्ये दाखल झाल्या. मात्र ज्यांचे नयन वारीचा सोहळा अनुभवण्यासाठी आतुर आहेत, ते या व्हिडीओतून वारीचा नेत्रदीपक सोहळा अनुभवू शकतात.
Amazing videography
— Harsha Patel 🇮🇳 (@harshagujaratan) June 30, 2020
this beatiful vdo is from Pandharpur Maharashtra during Ashadi Waree.
Palakhis carries the paduka of the deity and various saints.
The Wari culminates at the Vithoba temple on the holy occasion of Ashadhi Ekadashi.#Vitthal_Vitthal_JaiHare_Vitthal 🙏🚩 pic.twitter.com/54WgyAOZFE
महाराष्ट्रातील वारीचा हा जुना व्हिडीओ आहे. जो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. यंदा वारीचं प्रत्यक्षात असं दृश्य दिसत नसलं तरी वारीचा अनुभव तुम्ही या व्हिडीओच्या माध्यमातून घेऊ शकता. या व्हिडीओत वारीतील रिंगण सोहळा चित्रित केलेला आहे.
यावर्षी आषाढी एकादशीला परंपरेने चाललेल्या राज्यभरातील विविध तीर्थक्षेत्रांवरून मानाच्या पालख्या या थेट पंढरपूरमध्ये आणण्यासाठी राज्य शासनाने एसटी महामंडळावर जबाबदारी टाकली होती. हे वाचा - आषाढी एकादशी : भक्तांऐवजी फक्त फुलांनी सजलेल्या विठूरायाचं इथे घ्या थेट दर्शन देहू येथून संत तुकाराम, आळंदी येथून संत ज्ञानेश्वर, सासवड येथून संत चांगवटेश्वर व संत सोपानदेव , नेवासा येथून संत मुक्ताई , त्र्यंबकेश्वर येथून संत निवृत्तीनाथ पंढरपुरातुन संत नामदेव यांच्या पालख्या एसटीच्या शिवनेरी, शिवशाही ,लालपरी अशा विविध बसेसमधून निवडक वारकरी बंधूंसह पंढरपुरात दाखल झाल्या. संपादन - प्रिया लाड