पालघर, 15 फेब्रुवारी : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर दुर्वेश गावाच्या परिसरामध्ये अज्ञात वाहनाच्या धडकेने नर जातीच्या बिबट्याचा मृत्यू झाला आहे. बिबट्याचा मृत्यू झाल्यानंतर मृत बिबट्यासोबत काही नागरिकांनी फोटोही काढले आहेत .
गेल्या वर्षभरामध्ये अशाच प्रकारे अज्ञात वाहनाच्या धडकेमुळे आतापर्यंत तीन बिबट्यांचा मृत्यू झाला आहे. पालघर जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई-अहमदाबाद महामार्गाच्या बाजूने बऱ्याच ठिकाणी घनदाट जंगल आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी बिबटे भक्ष्याच्या शोधात महामार्गावर येतात व वाहन चालकांना अंधारात न दिसल्याने धडकून बिबट्याचा मृत्यू होतो.
ज्या महामार्गाच्या भागात घनदाट जंगल आहे व वन्यप्राणी रस्त्यावर येऊ शकतात अशा ठिकाणी महामार्गाच्या बाजूला संरक्षक जाळ्या वनविभागाने बसवाव्यात म्हणजे अशा प्रकारे दुर्मिळ वन्यजीवांचा मृत्यू होणार नाही अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
हेही वाचा -धावत्या रेल्वेत ओळखीच्या व्यक्तीनेच केला मुलीवर अत्याचार, ठाण्यात गुन्हा दाखल
दरम्यान, महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये बिबट्या विरुद्ध मानव हा संघर्षही वाढीस लागला आहे. पाण्याच्या आणि भक्ष्याच्या शोधात बिबट्या मानवी वस्तीत प्रवेश करत असल्याचं पाहायला मिळतं. परिणामी त्याचा मानवासोबत संघर्ष होतो. त्यामुळे वनविभागाने याबाबतही उपाययोजना करण्याची मागणी अनेकदा समोर आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.