संसार फुलायला सुरुवात झाली अन् काळाने घातला पती-पत्नीवर घाला

संसार फुलायला सुरुवात झाली अन् काळाने घातला पती-पत्नीवर घाला

राऊत दाम्पत्याच्या निधनानंतर त्यांची 8 महिन्यांची मुलगी पोरकी झाली आहे.

  • Share this:

हैदर शेख, चंद्रपूर, 18 सप्टेंबर : लग्नानंतर सुखी संसार फुलवण्याचं स्वप्न प्रत्येकच दाम्पत्य पाहतं. मात्र याच काळात दोघांवरही काळाने घाला घातल्याची दुर्दैवी घटना चंद्रपूर जिल्ह्यात घडली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात आज चालत्या दुचाकीवर वीज पडून पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे.

ब्रम्हपुरी शहराजवळील प्रभूकृपा राईस मिल जवळची ही घटना असून पारडगाव येथील पिंन्टु राऊत (30) व त्यांची पत्नी गुंजन राऊत (27) आज ब्रह्मपुरी शहरात काही कामानिमित्त आले होते. त्यानंतर हे दाम्पत्य आपलं काम आटपून गावाकडे परत जात जात होते. मात्र वाटेतच वीजांच्या कडकडाटासह पाऊस पडत असताना प्रभूकृपा राईस मिल जवळ त्यांच्या दुचाकीवर वीज कोसळली,

या घटनेत हे दोघेही पती-पत्नी जागीच ठार झाले. राऊत दाम्पत्याच्या निधनानंतर त्यांची 8 महिन्यांची मुलगी पोरकी झाली आहे. एका क्षणात कुटुंब उद्धवस्त झाले्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

हेही वाचा - महिला बँक मॅनेजरचा खून; पोलिसांनी अवघ्या 12 तासांत लावला आरोपींचा शोध, हत्येचं कारण उघड

दरम्यान, पावसाळा सुरू झाल्यापासून वीज पडून मृत्यू झाल्याच्या अनेक घटना महाराष्ट्रात घडल्या आहेत. त्यामुळे पावसाचं वातावरण असताना शक्य असेल तर घरातच थांबणं जीव वाचवण्यासाठी गरजेचं आहे. चंद्रपुरातील दुर्दैवी घटनेनंतरही हेच अधोरेखित झालं आहे.

Published by: Akshay Shitole
First published: September 18, 2020, 7:44 PM IST

ताज्या बातम्या