मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

सावधान ! कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा 60 लाख लोकांना बसणार फटका, आरोग्यमंत्री टोपेंचं भाकित

सावधान ! कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा 60 लाख लोकांना बसणार फटका, आरोग्यमंत्री टोपेंचं भाकित

आरोग्य विभागाच्या गट क ची परीक्षा 24 ऑक्टोबरला तर गट ड ची परीक्षा 31 ऑक्टोबरला होणार आहे, अ

आरोग्य विभागाच्या गट क ची परीक्षा 24 ऑक्टोबरला तर गट ड ची परीक्षा 31 ऑक्टोबरला होणार आहे, अ

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत जवळपास 60 लाख व्यक्ती (60 lakh citizens) बाधित होतील, असा अंदाज महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health minister Rajesh Tope) यांनी व्यक्त केला आहे.

जालना, 18 जुलै : देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट (Second wave of corona virus) आता ओसरते आहे. अनेक राज्यांत परिस्थिती सामान्य होत असल्याचं चित्र आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांचा अपवाद वगळता परिस्थिती नियंत्रणात असली, तरी तिसऱ्या लाटेची शक्यता (Third wave) वर्तवण्यात येत आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत जवळपास 60 लाख व्यक्ती (60 lakh citizens) बाधित होतील, असा अंदाज महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health minister Rajesh Tope) यांनी व्यक्त केला आहे.

काय म्हणाले टोपे?

महाराष्ट्रातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव ओसरला असला, तरी तिसऱ्या लाटेची लक्षणं दिसायला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील रुग्णसंख्या गेल्या काही दिवसांत वाढत असल्याचं चित्र आहे. हे प्रमाण लक्षणीयरित्या वाढत नसलं, तरी तिसऱ्या लाटेची शक्यता फेटाळून लावता येऊ शकत नाही. पहिल्या लाटेत 20 लाख लोक बाधित झाले होते. दुसऱ्या लाटेत 40 लाख लोकांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे तिसऱ्या लाटेत साधारण 60 लाख नागरिकांना कोरोनाची बाधा होण्याची शक्यता आहे, असा अंदाज टोपे यांनी व्यक्त केला आहे. जालन्यात पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा अंदाज व्यक्त केला.

4000 मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज

कोरोनाची तिसरी लाट जर आली, तर राज्याला सुमारे 4 हजार मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज निर्माण होऊ शकते, असा अंदाजही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केला आहे. दुसऱ्या लाटेत एकूण 1700 मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज लागली होती. मात्र तिसऱ्या लाटेत जर बाधितांची संख्या जर 60 लाखांवर गेली, तर निश्चितपणे 4 हजार मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज लागेल, असं त्यांनी म्हटलं आहे.

हे वाचा - अनिल देशमुखांच्या मूळगावी EDचे छापे, कार्यकर्त्यांच्या नारेबाजीचा Live Video

डेल्टाची दहशत

जगातील अनेक देशांमध्ये सध्या कोरोनाचा डेल्टा प्लस हा नवा व्हेरियंट धुमाकूळ घालत आहे. विशेषतः लसीकरण झालेल्या ज्या नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे, त्यातील बहुतांश रुग्ण हे डेल्टा व्हायरसचे असल्याचं दिसून येत आहे. अर्थात, लसीकरण झालेल्यांना लागण होत असली, तरी त्याचं गांभिर्य कमी असल्याचंही दिसून आलं आहे. ज्यांचं लसीकरण झालं आहे, त्यांना नव्या व्हेरियंटची लागण झाली, तरी केवळ किरकोळ लक्षणे दिसतात, मात्र जीवावर बेतण्याइतपत परिणाम होत नसल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेअगोदर अधिकाधिक नागरिकांचं लसीकरण होणं गरजेचं असल्याचं मत वैद्यकीय तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

First published:

Tags: Coronavirus, Rajesh tope