जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Dombivali News: पखवाजच्या तालावर भजनाचा सूर, डोंबिवलीकरांची 30 वर्षांपासून अखंड सेवा, Video

Dombivali News: पखवाजच्या तालावर भजनाचा सूर, डोंबिवलीकरांची 30 वर्षांपासून अखंड सेवा, Video

Dombivali News: पखवाजच्या तालावर भजनाचा सूर, डोंबिवलीकरांची 30 वर्षांपासून अखंड सेवा, Video

Dombivali News: पखवाजच्या तालावर भजनाचा सूर, डोंबिवलीकरांची 30 वर्षांपासून अखंड सेवा, Video

Dombivali News: डोंबिवलीतील सागर्ली येथे हनुमान भजनी मंडळ आहे. गावातील मंदिरात 30 वर्षांपासून या मंडळाची अखंड सेवा सुरू आहे.

  • -MIN READ Thane,Maharashtra
  • Last Updated :

भाग्यश्री प्रधान आचार्य, प्रतिनिधी डोंबिवली, 8 मे: विठ्ठल विठ्ठल जयहरी विठ्ठल, असे बोल, झांजेचा नाद आणि पखवाजाचा ताल दुरून ऐकू आला तरी जवळच कोणतं तरी मंदिर असल्याचं लक्षात येतं. मंदिरातून ऐकू येणारे हे भजनाचे बोल अनेकवेळा आपण ऐकतो आणि पुढे चालू लागतो. भजनाचे बोल आणि ताल आपल्याला एक उत्साह देऊन जातात. मात्र हे भजनी मंडळ अनेक वर्ष भजनाचा सराव करत असतं. त्यातूनच गाण्याची आणि वादनाची कला ते स्वतःच अवगत करून घेतात. डोंबिवली येथील सागर्ली गावात असेच एक मंडळ म्हणजे हनुमान वारकरी सांप्रदाय मंडळ आहे. पूर्वी प्रत्येक गावात असायचं भजनी मंडळ पूर्वी प्रत्येक गावात एक भजनी मंडळ असे. गावात कोणताही कार्यक्रम असला की या भजनी मंडळांना बोलावून घेत. हमखास एक दिवस तरी भजनाच्या कार्यक्रमासाठी राखीव ठेवत असत. शहरात आजकल हे चित्र पाहायला मिळत नाही. पण डोंबिवलीत सागर्ली गावातील भजनी मंडळानं ही परंपरा जोपासली आहे.

News18लोकमत
News18लोकमत

हनुमान भजनी मंडळ सागर्ली परिसरात कोणत्याही मंदिराचा कार्यक्रम असला की हनुमंत भजनी मंडळाला आमंत्रण दिलं जातं. त्या ठिकाणी भजनी मंडळातील सर्वजण एकत्र जमून भजनाचा कार्यक्रम होतो. हे भजनी मंडळ 30 वर्ष जुनं आहे. त्यांच्याकडे असणारा पखवाजही तितकाच जुना आहे. विशेष म्हणजे 10 ते 12 जण या मंडळात असून यातील जवळपास 5 ते 6 जण पखवाज वाजवतात. दादर आता विसरा, डोंबिवली सारखं स्वस्त मार्केट कुठेच नाही! कसं ते पाहा हा VIDEO 30 वर्ष जुने पखवाज हनुमान भजनी मंडळाकडे 30 वर्ष जुनं पखवाज आहे. या पखवाजची काळजी आम्ही जीवापाड घेतो. एखाद्या लहान मुलाप्रमाणे त्याला सांभाळतो. पखवाज ठेवण्यासाठी एक वेगळा बॉक्स तयार केला आहे. आम्ही सर्वजण सरावाने पखवाज शिकलो, असं म्हात्रे बुबा सांगतात. पखवाजाची काळजी घेताना कणीक लावणे, शाई भरून आणणे आदी कामे केली जातात. कणीक लावल्याने आवाज पण दमदार येतो, असं बुवांनी आवर्जून सांगितलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात