16 सप्टेंबर : अहमदनगर जिल्ह्यातल्या राहुरी तालुक्यातल्या देवळालीत एक अतिशय दु:खद घटना घडली आहे. घरासमोर उभ्या असलेल्या ट्रॅक्टरवर खेळणार्या दोन चिमुकल्यांचा ट्रॅक्टर विहिरीत पडल्याने जीव गमवावा लागला आहे. शिवाजी तावरे यांची पाच वर्षांची अनुष्का आणि दोन वर्षांचा प्रथमेश ट्रॅक्टरवर खेळत होते. पण ट्रॅक्टरची चावी काढायचं शिवाजी तावरे विसरून गेले. विहिरीजवळच हा ट्रॅक्टर होता. मुलांनी चावी फिरवली आणि ट्रॅक्टर तीस फूट विहिरीत कोसळळा आणि या दोन्ही चिमुकल्यांचा दुदैर्वी अंत झाला. +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]> |
---|
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.