03 सप्टेंबर : 10 कोटी रुपयांची खंडणी मागणार्या अपहरकर्त्यांनी अखेर चिमुकल्या युग चांडक याची अक्षरश: क्रूरपणे हत्या केली आहे. युगचा मृतदेह खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या बाबुळखेडा गावाजवळच्या पुलाखाली सापडला.
शाळेतून परतत असताना युग घरात न शिरता एका दुचाकीस्वारासोबत गेला होता. यावरून अपहरणकर्ता त्याच्या ओळखीचा असावा, असा पोलिसांचा अंदाज होता, आणि तो खरा ठरलाय. युगचे वडील डॉ. मुकेश चांडक यांच्याकडेच काम करणार्या राजेश डावरे आणि अर्जुन सिंग या दोघांनी या खुनाची कबुली दिली. युगच्या हत्येमुळे नागपुरच्या छापरुनगरमध्ये मोठा तणाव निर्माण झाला आहे.
तीन वर्षांपूर्वी वर्धमाननगर परिसरातच राहणार्या कुश कटारियाचा अशाच पद्धतीने खून करण्यात आला होता. विशेष म्हणजे, युग आणि कुश दोघेही आठ वर्षांचे होते. कुशची हत्या शेजार्याने, तर युगची नोकराने केली. या घटनेनंतर संतप्त जमावाने लकडगंज पोलीस ठाण्यावर दगडफेक केली तर हा जमाव पांगवण्यासाठी पोलीसांनीही सौम्य लाठीचार्ज केला.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]> |
---|
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++