20 फेब्रुवारी : मुंबईतील इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबडकरांचे आंतरराष्ट्रीय स्मारक होणार आहे. पण नागपूरजवळच्या चिंचोली इथल्या बाबासाहेबांच्या 400 वस्तूंच्या संग्रहालयाच्या स्मारकाचे भवितव्य मात्र अंधारात आहे. बाबासाहेबांचे खाजगी सचिव दिवंगत नानकचंद्र रत्तू यांनी 1990 मध्ये हा संग्रह वामनराव गोडबोले यांना सुपुर्द केला होता. सरकारचा एकही पैसा न घेता मागील 24 वर्षांपासून या वस्तुंचा संग्रह करून शांतीवन हे स्मारक तयार करण्यात आलंय. मात्र निधीअभावी या स्मारकाकडे दुर्लक्ष झाले आणि आता ज्या ठिकाणी हे संग्रहालय उभं आहे, ती जागा दगडखाणींसाठी आरक्षित केल्याची माहिती आहे. त्यामुळे या वास्तूचं भवितव्यंही अंधारात आहे. राज्य सरकारने 40 कोटी रुपये नागपूर सुधार प्रन्यासला शांतीवनच्या विकासासाठी काही दिवसांपुर्वी मंजूर केले होते. या कामाचे टेंडरही निघाले पण हा भाग दगडखाणींसाठी आरक्षित आहे.त्यामुळे शांतीवनच्या वास्तूचेही भविष्य अंधारात आहे. शांतीवन परिसरातील भाग नागपूर सुधार प्रन्यासने दगडखाणींसाठी आरक्षित केल्याने स्मारकाच्या वास्तूचे काय होणार हा प्रश्न आहे. बाबासाहेबांच्या वस्तूंचा अमुल्य असा ठेवा वाचवण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.