काळे चणे खाणं आरोग्यासाठी फायदेशीर आहे. यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फायबर, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि मिनरल्स बरोबरच व्हिटॅमीन ए, व्हिटॅमीन बी, व्हिटॅमीन सी, व्हिटॅमीन डी, व्हिटॅमीन के आणि फॉस्फरस, पोटॅशियम असतं.
त्यामुळेच सकाळच्या नाश्त्यात काळे चणे खायला सुरुवात करावी. यामुळे शरीर स्ट्रॉंग होतं, मेंदू तल्लख होतो. हृदय आणि त्वचाही निरोगी राहते. तर, जाणून घेऊयात काळे चणे खाण्याचे फायदे.
काळे चणे डायबिटीज रुग्णांसाठी सुपर फूड मानले जातात. एक मुठ चण्यांमध्ये 13 ग्रॅम डायटरी फायबर असतं. ज्यामुळे ब्लड शुगर कंट्रोल मध्ये येते.
यामध्ये विरघळणारे आणि न विरघळणारे दोन्ही प्रकारचे फायबर असतात. मधुमेहाचे रुग्ण किंवा शरीरात वाढलेल्या साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्यासाठी काळे चणे दररोज खावेत.
चण्यामध्ये कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी करण्याची क्षमता असते. काळे चणे खाल्ल्यामुळे कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी होण्यात मदत होते.
यामध्ये भरपूर प्रमाणात ऍन्टिऑक्सिडन्ट असतात. ज्यामुळे हृदयासाठी फायदेशीर आहेत.या मधील फायबर कोलेस्ट्रॉल कमी करतात. त्यामुळे हृदय निरोगी राहतं.
काळ्या चण्यांमधील फायबर पचण्यासाठी हलकं असतं. दररोज चणे खाल्ल्यामुळे पोटासंदर्भातले आजार कमी होतात. काळे चणे कच्चे किंवा उकडून खाऊ शकता. यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते.