नवी दिल्ली,09 डिसेंबर : हिवाळा (Winter) सुरू होताच त्वचेच्या समस्या (Skin problem) तुम्हाला जाणवू लागतात. या ऋतूमध्ये त्वचेवर खाज सुटणे, कोरडेपणा येणे आणि त्वचा तडकण्याच्या समस्या निर्माण होतात. शरीराला मॉइश्चराइज केले नाही तर त्वचेच्या या समस्या आणखी वाढू शकतात. यासाठी तुमच्या स्किन केअर रूटीनमध्ये बॉडी लोशनचा (Body Lotion) समावेश करा.
कोणत्या वेळी बॉडी लोशन लावायचे आहे हे देखील महत्त्वाचे आहे.
सकाळी त्वचेला मॉइश्चरायझ करा
सकाळी शरीर आणि त्वचेला मॉइश्चरायझिंग केल्याने त्वचेचे हानिकारक रसायने आणि प्रदूषकांपासून संरक्षण होते, त्यामुळे तुम्ही नियमितपणे संरक्षणात्मक मॉइश्चरायझर वापरणे महत्त्वाचे आहे.
अंघोळ, दाढी आणि हात धुणं
अंघोळ, शेव्हिंग आणि हात धुल्यानंतर लगेच मॉइश्चरायझर लावा. यामुळे त्वचा हायड्रेट राहण्यास मदत होईल. कोरडेपणाची समस्या राहणार नाही.
फ्लाइट दरम्यान आणि नंतर
प्रवासादरम्यान तुमची त्वचा कोरडी होते. कमी आर्द्रता आणि Recycled Air हे त्याचे कारण असते. यासाठी बॉडी लोशन नेहमी सोबत ठेवा. फ्लाइट दरम्यान आणि लँडिंग नंतर लगेच ते लावा. यामुळे त्वचेच्या कोरडेपणाची समस्या उद्भवणार नाही.
झोपेच्या वेळेआधी
तज्ज्ञांच्या मते, सकाळी 10 ते रात्री 11 या वेळेत त्वचा चांगल्याप्रकारे दुरुस्त (रिकव्हर) होत असते, त्यामुळे त्यापूर्वी तुम्ही तुमच्या त्वचेला मॉइश्चरायझ करणे महत्त्वाचे आहे. झोपेच्या वेळी ट्रान्स-एपिडर्मल वॉटर लॉस वाढते, ज्यामुळे त्वचेची आर्द्रता नष्ट होते. झोपण्यापूर्वी त्वचेला मॉइश्चरायझ करा.
हे वाचा - आता Internet शिवाय UPI Payments करता येणार! रिझर्व्ह बँकेकडून धोरण जाहीर
कसरती/व्यायाम करण्यापूर्वी
वर्कआउट करण्यापूर्वी बॉडी लोशन लावण्याची खात्री करा. व्यायामादरम्यान घाम येतो आणि त्यामुळे थकवा जाणवू शकतो, त्यामुळे व्यायामापूर्वी तुम्ही त्वचा मॉइश्चरायझ करणे महत्त्वाचे आहे. बाहेर व्यायाम केल्यानंतर त्वचा कोरडी होऊ शकते. व्यायामापूर्वी हलके बॉडी लोशन वापरा.
(सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.