Home /News /lifestyle /

बॉडी पोश्चर नीट होईल, शारीरिक वेदनांपासून मिळेल मुक्ती; 'ही' योगासनं ठरतील लाभदायक

बॉडी पोश्चर नीट होईल, शारीरिक वेदनांपासून मिळेल मुक्ती; 'ही' योगासनं ठरतील लाभदायक

प्रतीकात्मक फोटो

प्रतीकात्मक फोटो

योगा अनेक शारीरिक समस्यांपासून आराम देण्यात फायदेशीर आहे.

मुंबई, 05 ऑगस्ट : धावपळीच्या जीवनशैलीमुळे (Lifestyle) लोकांना अनेक शारीरिक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. कामाचा ताण, प्रवास, व्यायामाचा अभाव आणि चुकीचा आहार यामुळे लोकांना अनेक गंभीर आजार होताना दिसतात. विशेष म्हणजे आता कमी वयातच लोकांना गंभीर आजारांचा सामना करावा लागत आहे. सध्याच्या काळात अनेक तरुण मुलं किंवा मुली पाठदुखी (Backache), कंबरदुखी (Lower Back Pain), हाडं दुखणं अशा आजारांनी त्रस्त आहेत. उपचार घेऊनही या समस्या दूर होत नसल्याचं दिसून येतं. कमी वयात पाठ, कंबर दुखणं, हाडांमध्ये वेदना होणं, या त्रासामागे बिघडलेलं बॉडी पोश्चर (Body posture) म्हणजेच देहबोली किंवा शरीराची चर्या हे कारण असल्याचं तज्ज्ञ सांगतात. जे लोक दीर्घकाळ बसून काम करतात, त्यांना असा त्रास प्रामुख्याने होतो. वयापरत्त्वे या समस्या वाढत जातात आणि त्याचं रूपांतर गंभीर आजारात होऊ शकतं. या गोष्टी टाळण्यासाठी शरीराची चर्या अर्थात बॉडी पोश्चर सुधारणं गरजेचं आहे. नियमित योगासनं (Yoga) केल्यानं या समस्या दूर होऊ शकतात. दीर्घकाळ बॉडी पोश्चर खराब राहिलं तर त्यामुळे गंभीर आजार होऊ शकतात. त्यामुळे बॉडी पोश्चर सुधारण्यासाठी लोकांनी सातत्यानं उपाययोजना करणं गरजेचं आहे. यासाठी योगासनं हा सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. रोज योगासनं केल्यास बॉडी पोश्चर सुधारतं आणि पाठ, कंबरदुखी, हाडांमधल्या वेदना दूर होतात. याशिवाय आरोग्यदेखील सुधारतं, असं तज्ज्ञ सांगतात. योगासनांमध्ये धनुरासनाचा (Dhanurasana) रोज सराव केल्यास अनेक शारीरिक समस्या दूर होतात. छाती आणि खांद्याच्या स्नायूंसाठी तसेच हिप फ्लेक्सर्ससाठी हे आसन हितावह मानलं जातं. बॉडी पोश्चरमध्ये बिघाड झाल्याने पाठदुखीसारख्या समस्या निर्माण होतात. या समस्या कमी करण्यासाठी नियमित धनुरासन करणं लाभदायक ठरतं. हे वाचा - Back Pain : पुरूषांमध्ये पाठदुखी होण्याची ही आहेत प्रमुख कारणे, असा मिळवा पाठदुखीपासून अराम पश्चिमोत्तानासन (Paschimottanasana) हा योगाचा अत्यंत महत्त्वपूर्ण प्रकार आहे. मनःशांतीसाठी, तणाव दूर करण्यासाठी तसेच अनेक प्रकारच्या शारीरिक समस्यांचं निराकरण करण्यासाठी या आसनाचा नियमित सराव करावा. या योगासनामुळे पाठीचा मणका, खांदे आणि हॅमस्ट्रिंग्स ताणले जातात. या आसनाचा सराव केल्यास यकृत, मूत्रपिंड, अंडाशय आणि गर्भशयाचं कार्य सुधारण्यास मदत होते. पचनशक्ती (Digestion) सुधारण्यासाठी हे आसन करणं हितावह ठरतं. चक्रासनाचा (Chakrasana) सराव शरीरातील सर्व स्नायूंसाठी (Muscles) खूप प्रभावी मानला जातो. या आसनामुळे हृदय आणि छातीचं कार्य सुरळीत होतं आणि खोल श्वास घेण्यास मदत होते. ज्यांना बॉडी पोश्चर बिघडल्याने शारीरिक वेदना होत आहेत, त्यांनी नियमितपणे चक्रासनाचा सराव केल्यास तो लाभदायी ठरतो. कंबर आणि पाठीचा आजार असलेल्यांसाठी हे आसन विशेष फायदेशीर मानलं जातं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आसनं योगशिक्षकाकडून शिकून मगच करावीत अन्यथा तुमचा होता तो आजार बळावू शकतो.
First published:

Tags: Fitness, Health, Lifestyle, Pain

पुढील बातम्या