तुळस, कडूनिंबाप्रमाणेच आरोग्यदायी आहे पिंपळ; फायदे वाचाल तर थक्क व्हाल

तुळस, कडूनिंबाप्रमाणेच आरोग्यदायी आहे पिंपळ; फायदे वाचाल तर थक्क व्हाल

पिंपळाच्या झाडामुळे (peepal tree) ऑक्सिजन तर भरपूर मिळतंच, मात्र याशिवाय आरोग्याच्या अनेक समस्यांपासूनदेखील मुक्ती मिळते. पिंपळाच्या पानांचा वापर तुम्ही अनेक समस्यांवर उपचार म्हणून करू शकता. तो कसा ते सविस्तर वाचा.

  • Last Updated: Oct 16, 2020 07:40 PM IST
  • Share this:

हिंदू धर्मात पिंपळाच्या झाडाला (peepal tree) खूप महत्त्व आहे. शिवाय पिंपळाचे झाड प्राणवायूचा चांगला स्रोत आहे. आयुर्वेदानुसार पिंपळाच्या झाडाचा प्रत्येक भाग म्हणजे बी, साल, पानं आणि फळं औषधी गुणांनी परिपूर्ण आहेत. पिंपळाच्या पानाबद्दल बोलायला गेलो तर आरोग्याशी संबंधित बर्‍याच समस्यांवर मात करण्यात हे मदत करतं. पिंपळाच्या पानांच्या औषधी प्रभावामुळे दमा, काविळ आणि मधुमेहासारख्या आजारांमध्ये आराम मिळतो.

पिंपळ्याच्या पानांचे नेमके काय फायदे आहेत आणि त्याचा वापर कसा करावा पाहुयात.

हृदय निरोगी ठेवते

myupchar.com चे डॉ.लक्ष्मीदत्त शुक्ल यांनी सांगितलं, पिंपळाची पानं हृदयाचं आरोग्य टिकवून ठेवण्यास उपयुक्त ठरतात. हे हृदयाचे आजार असलेल्यांसाठी रामबाण औषध आहे. त्याचा वापर करण्याची पद्धत अगदी सोपी आहे. पिंपळाची पानं रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी हे पाणी गाळून दिवसभर प्या. दिवसभरातून 2-3 वेळा हे पाणी प्यायल्याने हृदय निरोगी राहतं.

मधुमेहासाठी फायदेशीर

पिंपळाची पानं मधुमेह नियंत्रित करण्यास उपयुक्त ठरतात. पिंपळाच्या पानांचा रस रक्तातील साखरेची पातळी कमी करतात. पिंपळाची पानं इन्सुलिन आणि ग्लुकोज वापरण्याची शरीराची क्षमता वेगाने ऊर्जेमध्ये बदलतात.

अतिसारापासून त्वरित आराम

पिंपळाची पानं अतिसारावर उपचार करण्यास देखील मदत करतात. myupchar.com शी संबंधित एम्सचे डॉ. व्ही. के. राजलक्ष्मी यांनी सांगितलं, आव हा आतड्यांमधील संसर्ग आहे ज्यामुळे रक्त आणि श्लेष्माचा अतिसार होतो. हा संसर्ग जीवाणू किंवा परजीवी जंतुसंसर्गामुळे होतो. जर हा संसर्ग अमिबामुळे झाला असेल तर इतर समस्यांसह गंभीर रक्तस्राव होणारा अतिसार  होऊ शकतो. आव पडण्यापासून आराम मिळवण्यासाठी पिंपळाची पानं आणि कोथिंबीर एकजीव करून थोडी साखर घालून हळू हळू चघळा.

श्वसन रोग, दम्यापासून आराम

पिंपळाची पानं श्वसन रोगात आराम देतात. पिंपळाची पानं आणि साखर दुधात उकळवून घ्या. पिंपळाच्या पानांचे गुणधर्म संपूर्ण दुधात उतरलील इतकी उकळी येऊ द्या. हे दूध थंड झाल्यावर प्या. तुम्ही दिवसातून दोनदा हा उपाय करू शकता.

कावीळची लक्षणं कमी करतं

कावीळची लक्षणं कमी करण्यासाठी पिंपळाची पानं उपयुक्त ठरू शकतात. यासाठी पिंपळाची पानं आणि खडीसारख यांचा रस बनवा. आपण दिवसातून 2-3 वेळा हा रस पिऊ शकता.

बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी

बद्धकोष्ठतेमुळे मूळव्याधसारख्या इतर अनेक समस्या उद्भवतात. पिंपळाची पानं पाचन तंत्रास योग्य प्रकारे मदत करण्यासाठी वापरली जाऊ शकतात. दूधात या पानांची पावडर, गूळ आणि बडीशेप पावडर मिसळा. झोपण्यापूर्वी हे दूध प्या. यामुळे बद्धकोष्ठता दूर होईल.

अधिक माहितीसाठी वाचा आमचा लेख - हृदयरोग: लक्षणे, कारणे, उपचार, औषध...

न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.

अस्वीकरण: आरोग्य विषयक समस्या आणि त्याविषयीचे उपचार याची माहिती सर्वाना सहज सुलभतेने कुठल्याही मोबदल्याशिवाय उपलब्ध व्हावी हा या लेखांचा हेतू आहे. या लेखनामध्ये प्रकाशित माहिती म्हणजे तज्ञ अधिकृत डॉक्टरांच्या तपासणी, रोगनिदान, उपचार आणि वैद्यकीय सेवेचा पर्याय नाही. जर तुमची मुले, कुटुंबातील सदस्य, नातेवाईक यापैकी कुणीही आजारी असतील, त्यांना याठिकाणी वर्णन केलेली काही लक्षणे दिसत असतील तर, कृपया तत्काळ आपल्या डॉक्टरांना जाऊन भेटा. डॉक्टरांच्या मार्गदर्शना शिवाय स्वतः, तुमची मुले, कुटुंब सदस्य, किंवा अन्य कुणावरही वैद्यकीय उपचार करू नका किंवा औषधे देवू नका. myUpchar आणि न्यूज18 यावर प्रकाशित माहिती, त्या माहितीच्या अचूकतेवर, या माहितीच्या परिपूर्णते वर विश्वास ठेवल्याने, तुम्हाला कुठलीही हानी झाली किंवा काही नुकसान झाले तर, त्याला myUpchar आणि न्यूज18 जबाबदार असणार नाही, हे तुम्हाला मान्य आहे, आणि त्याच्याशी तुम्ही सहमत आहात.

First published: October 16, 2020, 7:40 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading