जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / World Hearing Day 2022: काय आहे यंदाची थीम? जाणून घ्या इतिहास आणि महत्व

World Hearing Day 2022: काय आहे यंदाची थीम? जाणून घ्या इतिहास आणि महत्व

World Hearing Day 2022: काय आहे यंदाची थीम? जाणून घ्या इतिहास आणि महत्व

दरवर्षी जागतिक आरोग्य संघटना (WHO) या दिनानिमित्त एक थीम ठरवते.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

     मुंबई, 3 मार्च-   बहिरेपणा आणि श्रवणशक्ती कमी होण्यापासून बचाव करण्यासाठी जागरुकता करण्यासाठी 3 मार्च हा जागतिक श्रवण दिवस (World Hearing Day) म्हणून पाळला जातो. हा दिवस जगभरात कान आणि कानासंबंधी अधिक काळजी घेण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठीदेखील साजरा केला जातो. दरवर्षी जागतिक आरोग्य संघटना (WHO) या दिनानिमित्त एक थीम ठरवते आणि लोकांना याबद्दल शिक्षित करण्यासाठी माहितीपत्रके (brochures), फ्लायर्स, पोस्टर्स, बॅनर (banners) आणि प्रेझेंटेशन (presentations ) तयार करते. WHO ने 3 मार्च 2007 रोजी सर्वात पहिला जागतिक श्रवण दिन साजरा केला होता. त्यानंतर 2016 मध्ये त्यांनी हा दिवस जागतिक श्रवण दिन म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेतला. त्याआधी तो आंतरराष्ट्रीय कानाची काळजी दिवस (International Ear Care Day) म्हणून ओळखला जायचा. संवाद हा मूलभूत मानवी हक्क आहे. परंतु काही विकार आणि अडचणी असलेल्या लोकांना लोकांशी कनेक्ट करणं कठीण जातं. जगभरात, तब्बल 36 कोटी लोक श्रवणासंबंधी समस्यांनी ग्रस्त आहेत. हा दिवस साजरा केल्यास लोकांना शिक्षित करणं आणि त्यांना त्यांच्या हक्कांबद्दल शिकवण्यास मदत होईल, असा हेतू यामागे होता. जागतिक श्रवण दिन 2022 ची थीम- या वर्षी, WHO ने जागतिक श्रवण दिनाची थीम “आयुष्यभर काळजीपूर्वक ऐकण्यासाठी” (to hear for life, listen with care) अशी ठरवली आहे. आयुष्यभर आपली ऐकण्याची क्षमता चांगली राहावी यासाठी सुरक्षित श्रवणशक्तीचे महत्त्व आणि साधनं यासंबंधी जनजागृती प्रामुख्यानं डब्ल्यूएचओच्या कार्यक्रमांच्या माध्यमांतून करण्यात येईल. 2021 मध्ये, WHO ने श्रवणासंदर्भातला एक जागतिक अहवाल लाँच केला. ज्यामध्ये ऐकण्याची क्षमता कमी होण्याच्या जोखमीवर जगणाऱ्या लोकांच्या वाढत्या संख्येवर प्रकाश टाकण्यात आला होता. (हे वाचा: अतिरिक्त चरबी स्मरणशक्ती आणि विचार करण्याच्या क्षमतेसाठी ठरू शकते मोठा धोका ) आजच्या या दिवसाच्या माध्यमातून संस्था कान आणि श्रवण यंत्रणा तसंच त्याची काळजी घेत आयुष्यभर चांगली श्रवणशक्ती कशी टिकवावी, यासंदर्भात प्रोत्साहन देतील. श्रवणशक्ती कमी होण्यास कारणीभूत अनेक गोष्टी कारणं टाळता येतात. मोठ्या आवाजामुळे श्रवणशक्ती क्षीण होण्याचं प्रमाण खूप मोठ्ठं आहे. आजच्या दिवशी डब्ल्यूएचओ, सरकार, इंडस्ट्री पार्टनर (industry partners) आणि समाजातील नागरिकांना सुरक्षित श्रवणाचं महत्व समजावून सांगण्यासाठी जागरुकता करतं. कार्यक्रमांव्यतिरिक्त, दरवर्षी अहवालदेखील तयार केले जातात. जे सरकारला अशा नागरिकांबद्दल जाणून घेण्यास मदत करतात आणि ज्यांना मदतीची गरज आहे, त्यांना ते मदतीचा हात देतात. या अहवालांच्या माध्यमातून गरीबांना आर्थिक मदत करणं आणि लोकांना श्रवणयंत्र पुरवणं, त्यांचं जगणं सुकर करणं, हा हेतूदेखील साध्य केला जातो.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात