मुंबई, 24 जून : अन्न वाया गेल्याने देवाचा कोप होतो. त्यामुळे कधीही अन्न टाकून देऊ नये, असं अनेक धार्मिक ग्रंथांमध्ये सांगितलेलं आहे. सध्याच्या महागाईच्या काळात एक एक रुपया वाचवणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे अन्न वाया जाणं परवडणारं नाही; पण अन्नाच्या नासाडीच्या बाबतीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे, हे जाणून कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल. देशात दर वर्षी 92 हजार कोटी रुपयांचं अन्न वाया जाते. अन्न वाया न जाण्यासाठी एका महिलेने काही ट्रिक्स शेअर केल्या आहेत. या ट्रिक्सचा वापर करून अन्नाचा अपव्यय थांबवू शकता. जॉर्जियातल्या सारा बिगर्स यांनी टिकटॉकवर या ट्रिक्स शेअर केल्या आहेत. या ट्रिक्समुळे अन्नाची नासाडी रोखता येऊ शकते. सहसा आपण नाशवंत पदार्थ फ्रीजमध्ये ठेवतो. परंतु, सारा यांनी सांगितलं, की ‘मी फळं, भाज्यांसह नाशवंत पदार्थ फ्रीजच्या दारातल्या कप्प्यांमध्ये ठेवते, जेणेकरून कुटुंबातल्या व्यक्ती हे पदार्थ खराब होण्यापूर्वी वापरू शकतात. सहसा आपण फळं आणि भाज्या फ्रीजमधल्या सर्वांत खालच्या भागात असलेल्या बॉक्समध्ये ठेवतो. प्रत्येक वेळी आपलं लक्ष या ठिकाणी जात नाही; पण फ्रीजच्या दारात ठेवलेल्या पदार्थांकडे पटकन लक्ष जातं आणि ते खावेसे वाटतात.’ फ्रीजमधल्या या भागात काय ठेवावं? सारा यांनी सांगितलं, की `आतापर्यंत आपण ड्रॉवरच्या ज्या भागात भाजीपाला ठेवायचो तिथे अशा वस्तू ठेवा ज्यांची गरज कमी असते. तसंच दीर्घ काळ टिकणारे अन्नपदार्थ तुम्ही येथे ठेवू शकता. कारण हा ड्रॉवर तुम्हाला सारखा पाहायची सवय नसते. त्यामुळे तो दृष्टीपासून दूर राहतो. तुम्ही या ठिकाणी मांस, चीज, ऑलिव्ह, साल्सा यांसारख्या गोष्टी ठेवू शकता.` फ्रीजच्या दारात मसाले ठेवण्याऐवजी तो व्यवस्थित करण्याकरिता टर्नटेबल वापरण्याची शिफारस सारा यांनी केली आहे. वाचा - केसगळती खूप वाढलीय? मग वापरा हे स्पेशल सिरम, घरीच सहज बनवू शकता सध्या अमेरिकेत अनेक जण अन्नाची नासाडी रोखण्यासाठी मोहीम राबवत आहेत. त्यासाठी सोशल मीडियावर सर्व प्रकारचे मार्ग शेअर करून जनजागृती करत आहेत. सारा यांच्या ट्रिक्स पाहिल्यानंतर अनेकांना त्या खूप आवडल्या. काही जणांनी या ट्रिक्स वापरून पाहिल्या आणि त्या खूप उपयुक्त असल्याची प्रतिक्रिया दिली. ‘माझ्या घरी रोज काही ना काही पदार्थ टाकून दिले जात होते; पण आता आम्ही अन्न अजिबात वाया घालवत नाही,’ असं एकाने लिहिलं. डनहंबी या ग्राहक डाटा फर्मच्या माहितीनुसार, एक तृतीयांश कुटुंबं पैसे वाचवण्यासाठी एक वेळच जेवत आहेत. तसंच कमी प्रमाणात अन्न सेवन करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.