मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /सहज केलेली DNA Test पडली भलतीच महागात, तरुणीला बसला 440 व्होल्टचा झटका!

सहज केलेली DNA Test पडली भलतीच महागात, तरुणीला बसला 440 व्होल्टचा झटका!

अगदी सहज केलेली DNA Test 31 वर्षांच्या अमांडा स्टॅसी (Amanda Stacy) यांना चांगलीच महाग पडली आहे. या टेस्टचे रिपोर्ट पाहून त्यांना चांगलाच धक्का बसला.

अगदी सहज केलेली DNA Test 31 वर्षांच्या अमांडा स्टॅसी (Amanda Stacy) यांना चांगलीच महाग पडली आहे. या टेस्टचे रिपोर्ट पाहून त्यांना चांगलाच धक्का बसला.

अगदी सहज केलेली DNA Test 31 वर्षांच्या अमांडा स्टॅसी (Amanda Stacy) यांना चांगलीच महाग पडली आहे. या टेस्टचे रिपोर्ट पाहून त्यांना चांगलाच धक्का बसला.

    मुंबई, 5 ऑक्टोबर : काही दाम्पत्यं मूल दत्तक (Adoption) घेतल्यावर त्यांना आपलं नाव देतात, त्यांचं संगोपन करतात. यात बऱ्याचशा मुलांना आपल्याला दत्तक घेतलं आहे, हेदेखील माहिती नसतं. काही मुलांना मात्र ही बाब माहिती असते. दत्तक घेतलेल्या मुलगा अथवा मुलीचा सांभाळ संबंधित पालक कसे करतात, यावर या मुलांच्या भविष्यातल्या बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. आपल्याला दत्तक घेतलं आहे, ही गोष्ट त्या पाल्याला माहिती नसेल आणि ती त्याला अचानक समजली तर बऱ्याचवेळा नात्यांमध्ये (Relation) गुंतागुंत किंवा क्लेश निर्माण होऊ शकतात. अशीच काहीशी घटना अमांडा स्टॅसी (Amanda Stacy) या महिलेच्या आयुष्यात घडली.

    31 वर्षीय अमांडा स्टॅसी या महिलेनं अगदी गंमत म्हणून स्वतःची डीएनए तपासणी (DNA Test) करून घेतली; मात्र या तपासणीच्या रिपोर्टमुळे या महिलेचं आयुष्यच बदलून गेलं. ज्या आई-वडिलांसोबत आपण निम्मं आयुष्य (Life) घालवलं, त्यांनी आपल्याला दत्तक घेतलं होतं, असं अमांडाला कळालं. यामुळे अमांडला आश्चर्याचा धक्का बसला. आपल्या आयुष्यातल्या या धक्कादायक घटनेची माहिती अमांडानं `टिक टॉक`च्या (TikTok) माध्यमातून शेअर केली आहे.

    अमांडाने तिच्या @stacysinterlude7 या टिकटॉक अकाउंटवरून ही गोष्ट शेअर करताना सांगितलं, की `मी अगद सहज माझी डीएनए टेस्ट केली. मात्र त्यातून मी माझ्या आई-वडिलांची दत्तक मुलगी आहे असं मला समजलं. जेव्हा ही गोष्ट मी माझ्या आई-वडिलांना सांगायला गेले, तेव्हा त्यांनी मला गप्प राहण्याचा सल्ला दिला. रिपोर्टमध्ये काही चूक झाली असेल, असं मला त्या वेळी वाटलं; मात्र दोन दिवसांनी माझ्या आई-वडिलांनी मला सत्य सांगितलं. माझा 50 टक्के डीएनए हा जैविक आईचा आहे, असं त्यांनी सांगताच मला धक्का बसला. एवढी वर्षं ज्यांना आई-वडील समजून आपण त्यांच्यासोबत राहत आहोत, ते आपले खरे आई-वडील नाहीत, ही गोष्ट पचवणं मला अवघड जात होतं,` असं अमांडानं सांगितलं.

    `जेव्हा मला माझ्या आई-वडिलांनी सत्य सांगितलं, तेव्हा त्याचा त्यांना धक्का बसला नाही. खरं तर माझा चेहरा माझ्या वडिलांशी मिळताजुळता आहे. त्यामुळे मी दत्तक मुलगी आहे, असं त्यांनाही कधी वाटलं नाही. हीच बाब मला कमी वयात समजली असती तर मी त्यावर प्रतिक्रिया देऊ शकले असते; मात्र या कुटुंबानं मला खूप प्रेम दिलं असल्यानं हेच कायमस्वरूपी माझं कुटुंब (Family) असेल,` असं अमांडानं स्पष्ट केलं.

    डीएनए टेस्ट करण्याच्या निर्णयाबाबत अमांडानं सांगितलं, की `माझ्या आजोबांना अनेक मुलं होती. डीएनए चाचणीद्वारे मला कुटुंबातला नवीन सदस्य मिळू शकेल या विचारानं मी तपासणी करण्याचा निर्णय घेतला. या तपासणी रिपोर्टमध्ये एक सदस्य सोडून सर्वांचे डीएनए जुळले. डीएनए न जुळलेला तो सदस्य मी होते. रिपोर्ट पाहून मला प्रथम विश्वास बसला नाही. मला वाटलं की रिपोर्ट चुकीचा आहे किंवा त्यात काही तरी गडबड आहे. परंतु, डॉक्टरांनी याबाबत खुलासा केल्यानंतर मला धक्काच बसला.`

    जेव्हा या विषयावर अमांडानं तिच्या आई-वडिलांशी चर्चा केली, तेव्हा या प्रकरणाचा खुलासा झाला आणि अमांडाला दत्तक घेतलं गेलं असल्याचं स्पष्ट झालं.

    First published:
    top videos

      Tags: Adoption