मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

लोकं वजनावरुन उडवायचे खिल्ली, तिनं कामातून दिलं उत्तर! बाईक रायडर साईलीची inspirational स्टोरी

लोकं वजनावरुन उडवायचे खिल्ली, तिनं कामातून दिलं उत्तर! बाईक रायडर साईलीची inspirational स्टोरी

मी दादाला बोलले प्लीज मला बाईक खाली नेऊन दे. तेव्हा तो बोलला मी गाडी खाली नेऊन देईल. पण, त्यानंतर तुला कधीच गाडी मिळणार नाही. दादाच्या बोलण्याने माझी अवस्था इकडे आड तिकडे विहीर अशी झालेली. - साईली सावंत.

मी दादाला बोलले प्लीज मला बाईक खाली नेऊन दे. तेव्हा तो बोलला मी गाडी खाली नेऊन देईल. पण, त्यानंतर तुला कधीच गाडी मिळणार नाही. दादाच्या बोलण्याने माझी अवस्था इकडे आड तिकडे विहीर अशी झालेली. - साईली सावंत.

मी दादाला बोलले प्लीज मला बाईक खाली नेऊन दे. तेव्हा तो बोलला मी गाडी खाली नेऊन देईल. पण, त्यानंतर तुला कधीच गाडी मिळणार नाही. दादाच्या बोलण्याने माझी अवस्था इकडे आड तिकडे विहीर अशी झालेली. - साईली सावंत.

  • Published by:  Rahul Punde
पावसामुळे चिखल झाल्याने रस्ता निसरडा झाला होता. त्यात मला डोंगरावरुन खाली उतारयचं होतं. मला बाईक चालवायचा त्यावेळी जास्त अनुभव नव्हता. गाडी चालू करुन पहिला गिअर टाकला अन् क्लच सोडताच टायर स्लिप व्हायला लागले. माझी फुल तंतरली. इथून खाली दरीत गेलो तर सापडू की नाही अशीही भिती वाटली. त्यात माझं वजन 45 किलो आणि गाडी 200 किलोच्या आसपास. त्यामुळे गाडी कलंडली तरी माझं काही खरं नव्हतं. हाय फ्रेंड्स, माझं नाव साईली प्रमोद सावंत मी व्यवसायाने फार्मासिस्ट आहे. आता फार्मासिस्ट म्हटलं की तुमच्या डोळ्यासमोर चष्मीस, पुस्तकात डोकं, अभ्यास वैगेरे गोष्टी आल्या असतील. पण, मै अलग टाईप की लडकी हूँ! मी अभ्यासात जरी हुशार असले तरी चार भिंतीत माझं मन कधीच रमलं नाही. पालघर जिल्ह्यातलं मूळ गाव असल्याने निसर्गाची मुक्त उधळण पाहतच मी मोठी झालीय. त्यामुळे निसर्गाचा ओढा पूर्वीपासूनच आहे. याच निसर्गाला गवसणी घालत वेगवेगळे प्रदेश पाहणं हा माझा छंद आहे. थांबा.. घाई करू नका. याला माझी सुरुवात समजू नका. कारण, मेरे दोस्त पिक्चर अभी बाकी है! तो शुरु से शुरवात करते है! दादाच्या त्या वाक्याने माझ्याकडे दुसरा पर्यायच उरला नाही एकदा मी आणि दादा वसईतील तुंगारेश्वर महादेव मंदिरात गेलो होतो जे एका डोंगरात आहे. नेमका अवेळी पाऊस पडला होता. त्यामुळे रस्त्यावर सगळीकडे चिखल झाला होता. परिणामी टायर स्लप होत होते. मी गाडी चालू करुन गिअर टाकून क्लच थोडाच सोडला असेल गाडी एका बाजूला घसरायला लागली. तिथून जाणाऱ्या लोकांनी दादाला सांगितले की तुम्ही तिला बाईक खालीपर्यंत नेऊन द्या. तेव्हा दादा त्यांना म्हणाला की नाही ती स्वतः घेउन जाणार, पडेल तरच शिकेल. अश्या प्रकारे त्या निसरड्या रोडवर मला गाडी चालवायची पाळी आली. आमची गाडी थोडीजरी घसरली तरी खाली जाण्याची भिती होती. माझी हृदयाची धडधड इतकी वाढली की भर थंडीत मला घाम फुटला. त्यात लोकांचं बोलणं ऐकून माझा कॉन्फिडन्स आणखी कमी झालेला. मी दादाला बोलले प्लीज मला बाईक खाली नेऊन दे. तेव्हा तो बोलला मी गाडी खाली नेऊन देईल. पण, त्यानंतर तुला कधीच गाडी मिळणार नाही. दादाच्या बोलण्याने माझी अवस्था इकडे आड तिकडे विहिर अशी झालेली. अशा परिस्थितीत त्या निसरड्या रस्त्यावरुन मी सुरक्षित गाडी खाली आणली. जसजसं मी गाडी खाली आणत होते, तसतसा माझ्यातला आत्मविश्वासही वाढत होता. आणखी एक गोष्ट म्हणजे माझ वजन 45 किलो आणि गाडीचं जवळपास 200 किलो. तर लोकं बोलायचे की अरर्र तुझं वजन काय? गाडीचं वजन काय? पण, अशा लोकांना तोंडी कधीच उत्तर देत नाही. तर रॉयल एनफिल्ड स्टँडवरुन काढते आणि आरामात त्यांच्यासमोरुन निघून जाते. मला वाटतं तोंडी उत्तर देण्यापेक्षा कृतीतून उत्तर देणं कधीही चांगलच नाही का? मुंबई ते स्टॅच्यू ऑफ युनिटी, गुजरात साधारणपणे मी 2010 मधे बाईक चालवायला सुरुवात केली असेल. त्यावेळी वडिलांकडे स्कुटी नव्हती स्प्लेंडर बाईक होती. काहीतरी साधन पाहिजे म्हणुन मी चालवायला शिकले. त्यानंतर Royal Enfield Electra घेतली. पण, मला ती लगेच चालवायला मिळाली नाही, तेव्हा सांगितलं आधी डबल स्टँडवर टाकायला शिक. मग नंतर गाडी चालवायची. अश्या प्रकारे मी Royal enfield चालवायला सुरूवात केली. आता माझ्याकडे स्वतः ची Royal Enfield Himalayan आहे. ज्यावर मी आजपर्यंत बऱ्याच राईड केल्या आहेत. आतापर्यंतची सर्वात लांब आणि आठवणीत राहणारी राइड म्हणजे मुंबई ते स्टॅच्यू ऑफ युनिटी, गुजरात. मला प्रत्येक राईडमधून आनंद मिळतो, म्हणण्यापेक्षा मी आनंदासाठीच राईड करते हे जास्त योग्य राहिल. गुजरात राईडने माझ्यातील आत्मविश्वास आणखील दुणावला आहे. मुलगी म्हणून मी आता कुठेही जाऊ शकते, असा विश्वास माझ्यात निर्माण झालाय. त्यावेळी घडलेला एक प्रसंग मी कधीही विसरू शकणार नाही. अविस्मरणीय प्रसंग.. जेव्हा आपण full riding gears मध्ये असताना मुलगा चालवतोय की मुलगी काहीच समजत नाही. मी जेव्हा गुजरातला गेली होती. त्याच वेळी तिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार होते. त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा काम चालू होतं. रुम ते स्टॅच्यू ऑफ युनिटी अंतर कमी असल्याने रायडींग गिअर घातले नव्हते. मी त्या रस्त्यावरुन जात असताना काम करणारे कर्मचारी हातातलं काम सोडून मलाच पाहात होते. अगदी जाईपर्यंत. माझ्यापाठीमागे असणाऱ्यांनी जेव्हा मला ही घटना सांगितली. मला फार आनंद झाला. तेव्हा वाटलं की आपण नक्कीच काहीतरी वेगळं करतोय. ज्यामुळे लोकांना थोडी का होईना पण प्रेरणा नक्कीच भेटत असेल. तर मी का करू शकत नाही? रायडींगमुळे माझ्यात जो आत्मविश्वास निर्माण झाला आहे, कदाचित तो दुसऱ्या कुठल्या गोष्टीने झाला नसता. रायडींग हे एक passion आहे आणि by profession मी एक pharmacist आहे. Monday to Friday जॉब करुन Saturday, Sunday किंवा जशी सुट्टी मिळेल तसं राईड करत असते. मुलगी असल्यामुळे नेहमी दादा, वडील किंवा विश्वासू बाईक राईडर मित्राची गरज भासते. माझी अशी इच्छा आहे की महाराष्ट्रा मधील माझ्या सारख्या अनेक मुलींनी एकत्र येऊन ऐकमेकांना सहकार्य करुन राईड केल्या तर कुणावरही विसंबून राहण्याची गरज पडणार नाही. कारण, आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवकन्या अहोत. - साईली प्रमोद सावंत, बाईक रायडर, वसई, पालघर.
First published:

Tags: Bike riding, Digital prime time

पुढील बातम्या