Home /News /lifestyle /

नवऱ्यांना कंडोम वापरू देत नाही ही महिला; 22 वर्षात 11 बाळांना दिलाय जन्म, 12 व्यांदा गर्भवती

नवऱ्यांना कंडोम वापरू देत नाही ही महिला; 22 वर्षात 11 बाळांना दिलाय जन्म, 12 व्यांदा गर्भवती

वेरोनिका मेरिट नावाची एक महिला सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. वेरोनिका हिने गेल्या 22 वर्षात 11 मुलांना जन्म दिला आहे. आता ती तिच्या बाराव्या मुलासह गर्भवती आहे.

    नवी दिल्ली, 13 ऑक्टोबर : आई होण्याचा आनंद हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण असतो. पण आजच्या महागाईच्या काळात लोक भविष्य काळातील योग्य नियोजन करून मुलांना जन्म (Baby Birth) देतात. अलिकडे अनेक जोडपी प्रथम त्यांची बचत आणि भावी आयुष्य सुरक्षित करून मुलांविषयी नियोजन करतात. पण आजकाल वेरोनिका मेरिट नावाची एक महिला सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. वेरोनिका हिने गेल्या 22 वर्षात 11 मुलांना जन्म दिला आहे. आता ती तिच्या बाराव्या मुलासह गर्भवती आहे. अमेरिकेमधील न्यूयॉर्कमध्ये (Newyork)  राहणाऱ्या वेरोनिका हिने तिच्या 12 प्रेग्नन्सीची बातमी स्वतः सोशल मीडियावर शेअर केली. तिने #12kids या कॅप्शनसह ही बातमी (Pregnancy News) शेअर केली. वेरोनिका अमेरिकेची प्रसिद्ध टिकटॉकर आहे. येत्या उन्हाळ्यात वेरोनिका तिच्या बाराव्या मुलाचं स्वागत करेल. वेरोनिकाची पहिली मुलगी आता 21 वर्षांची आहे. ही महिला वयाच्या 14 व्या वर्षी पहिल्यांदा गर्भवती झाली होती. त्यानंतर तिने पुढील 22 वर्षात 11 मुलांना जन्म दिला. दोन पतींना 11 मुले झाली वेरोनिकाला मुलांना जन्माला घालायला आवडतं. तिनं सांगितले की, ती आरोग्याच्या समस्यांमुळे गर्भनिरोधक (कंडोम) वापरत नाही. तसेच तिचा कंडोमवर अजिबात विश्वास नाही. यामुळे ती तिच्या पतींना सेक्स करताना कधीच कंडोम वापरू देत नव्हती. वेरोनिकाला जास्त मुलं होण्याची काहीच चिंता नाहीये, तिनं 'द सन'ला माहिती देताना सांगितलं की, तिचं कुटुंब 17 मुले झाल्यानंतरच पूर्ण होईल. हे वाचा - Bigg Boss15: नॉमिनेशन टास्क दरम्यान सुरेखा ताई झाल्या नाराज! समजूत काढण्यासाठी जयची खटपट आणखी 6 मुलं हवीत वेरोनिकाला दोन पतींपासून सध्या 11 मुले आहेत. तिला किडनीचा त्रास असून गेल्या वर्षी तिची एक किडनी खराब झाली. या कारणासाठीही ती कोणतीही गर्भनिरोधक औषधं घेत नाही. गर्भनिरोधक औषधांमुळं तिच्या रक्तात गुठळ्या तयार होतात, असे तिचे म्हणणे आहे. अजून तिला आणखी 6 मुले हवी आहेत. आतापर्यंत तिनं तिच्या आयुष्यातील साडेआठ वर्षे गरोदरपणामध्ये घालवली आहेत. सध्या, वेरोनिकाचा पती सध्या 37 वर्षांचा आहे, ज्यांच्याशी तिला 7 मुले आहेत. उर्वरित मुले तिच्या पहिल्या पतीची आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Pregnent women, Women

    पुढील बातम्या