Home /News /lifestyle /

FACT CHECK - सूर्यग्रहणामुळे CORONAVIRUS चा खरंच नाश होणार?

FACT CHECK - सूर्यग्रहणामुळे CORONAVIRUS चा खरंच नाश होणार?

    मुंबई, 20 जून : 21 जूनला भारतात कंकणाकृती सूर्यग्रहण दिसणार आहे. हे ग्रहण पाहण्याची उत्सुकता जितकी सर्वांना आहे, तितकीच आता या ग्रहणामुळे कोरोनाचा नाश होईल अशी आशा अनेकांना आहे. कारण सूर्यग्रहणामुळे कोरोना बरा होऊ शकतो, असा दावा चेन्नईतील एका शास्त्रज्ञाने केला आहे. त्यामुळे सूर्यग्रहण पाहण्यापेक्षा कोरोनाचा नाश होईल या अपेक्षेने आता भारतीय त्या क्षणाची वाट पाहत आहेत. सूर्यग्रहणामुळं कोरोना बरा होऊ शकतो असा दावा चेन्नईचे अणु आणि पृथ्वी वैज्ञानिक (Nuclear and Earth Scientist) केएल सुंदर कृष्णा यांनी केला आहे. केएल सुंदर यांच्या मते कोव्हिड-19 हा रोग गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये झालेल्या एका सूर्यग्रहणाशी (solar eclipse) संबंधित आहे. त्यामुळं डॉ. सुंदर कृष्णा यांचे म्हणणे आहे की, 26 डिसेंबरच्या या ग्रहणानं सूर्यमालेत ग्रहांची संरचना बदलली. एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत, सुंदर कृष्णा असेही म्हणाले की, 'हा बदल चीनमध्ये प्रथम पाहिला गेला. हा बदल एखाद्या प्रयोगामुळे किंवा हेतूपुरस्सर प्रयत्नांचा परिणाम आहे. त्यामुळं असा विश्वास आहे की, येत्या सूर्यग्रहण एक टर्निंग पॉइंट असल्याचं सिद्ध होऊ शकतो. कृष्णा यांनी दावा केला आहे की, ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि त्यामुळे लोकांना यावर घाबरून जाण्याची गरज नाही. सूर्यप्रकाश आणि सूर्यग्रहण या प्राणघातक विषाणूचा एक नैसर्गिक उपचार म्हणून सिद्ध होईल. हे वाचा - 21 जूनला 'या' कारणामुळे ठीक होणार कोरोना? चेन्नईच्या शास्त्रज्ञाचा अजब दावा यानंतर गुगलवरदेखील सूर्यग्रहणामुळे कोरोनाचा नाश होईल का? असे प्रश्न सर्च केले जात आहेत. सूर्यग्रहण म्हणजे काय? सूर्यग्रहण अमावस्येच्या दिवशी दिसते, जेव्हा चंद्र, पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये येतो आणि तिघेही एका सरळ रेषेत असतात. जेव्हा चंद्र पृथ्वीपासून त्याच्या सर्वाधिक लांब अंतरावर राहून सूर्य आणि पृथ्वीच्यामध्ये येऊन सूर्याला झाकतो. मात्र लहान आकारामुळे तो सूर्याला पूर्णपणे झाकू शकत नाही, तेव्हा कंकणाकृती सूर्यग्रहण दिसते. अशा वेळी चंद्र सूर्याच्या मध्यभागी दिसतो आणि सूर्याच्या बाह्याकाराचे कंकण दिसू लागते. हे वाचा - 21 जूनला भारतात कंकणाकृती सूर्यग्रहण; पुन्हा कित्येक वर्ष जुळून येणार नाही असा योग एका वर्षात संपूर्ण पृथ्वीवरून किमान दोन ते पाचवेळा सूर्यग्रहणं पाहता येतात. त्यातलं एखाद-दुसरंच खग्रास ग्रहण असतं, तेदेखील सगळ्याच देशांतून दिसत नाही. कंकणाकृती ग्रहण दिसणं त्यापेक्षाही दुर्मिळ. चंद्राच्या थेट छायेखाली असलेल्या प्रदेशातच कंकणाकृती ग्रहण दिसतं. तर त्याच्या आसपासच्या प्रदेशात खंडग्रास ग्रहण पाहायला मिळतं. सूर्यग्रहण आणि कोरोनाव्हायरसचा संबंध काय? सूर्यग्रहणामुळे कोरोनाव्हायरसचा नाश होईल या दाव्याला कोणताही वैज्ञानिक आधार नाही. खरंतर कोरोनाव्हायरस आणि सूर्यग्रहणाचा संबंध आहे तो फक्त आकारावरून. टाइमच्या रिपोर्टनुसार  1986 साली जेव्हा शास्त्रज्ञांनी मायक्रोस्कोपमधून या व्हायरसला पाहिलं त्यावेळी त्यावेळी ते सूर्याच्या कोरोनाप्रमाणे दिसत होता. सोलर कोरोना म्हणजे ज्यावेळू स्रयग्रहण होतं, तेव्हा सूर्याभोवती येणारं क्राऊनसारखं कंकण सूर्यग्रहणात सूर्य झाकल्यानंतर त्याच्याभोवती जो प्रकाश दिसतो त्याला कोरोना असं म्हटलं जातं आणि हा व्हायरस त्याप्रमाणेच दिसत होता त्यामुळे त्याला कोरोना असं नाव पडलं. हे वाचा - Solar Eclipse: भर दिवसा होईल अंधार! 25 वर्षानंतर सुर्यग्रहणामुळे असे दिसेल दृष्य नासाने सांगितल्यानुसार, सूर्याचा कोरोना म्हणजे सूर्याच्या भोवतालचा भाग. सूर्याच्या तेजस्वी प्रकाशामुळे हा कोरोना लपला जातो. त्यामुळे विशेष उपकरणाशिवाय हा कोरोना पाहणं शक्य नाही. ज्यावेळी पूर्ण सूर्यग्रहण होतं, त्यावेळी कोरोना दिसतो. तुम्हीच करू शकता कोरोनाव्हायरसा नाश कोरोनाव्हायरस आणि सूर्यग्रहणाचा नेमका काय संबंध आहे ते तुम्ही पाहिलात. त्यामुळे सूर्यग्रहणामुळे कोरोनाव्हायरसचा नाश होऊ शकत नाही, मात्र त्याचा नाश करणं तुमच्या हातात आहे. कोरोनाव्हारचा नाश करण्याचा मार्ग म्हणजे 20 सेकंदांसाठी हात साबण आणि पाण्याने धुणं, हँड सॅनिटायझर वापरणं आणि ज्या वस्तूंवर, पृष्ठभागांवर कोरोनाव्हायरस असण्याची शक्यता आहे, त्या वस्तू आणि पृष्ठभाग निर्जंतुक करून घेणं. तर मास्क घालणं, स्वच्छता आणि सोशल डिस्टन्सिंग हा कोरोनाव्हायरसचं संक्रमण रोखण्याचा मार्ग आहे. संकलन, संपादन - प्रिया लाड हे वाचा - गर्लफ्रेंडने केलं KISS; तरुणाने तिच्यावर ठोकला कोट्यवधी रुपयांचा दावा
    First published:

    पुढील बातम्या