मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

नवऱ्याला वारंवार मिळत होतं प्रमोशन, बायकोने सांगितलं धक्कादायक कारण

नवऱ्याला वारंवार मिळत होतं प्रमोशन, बायकोने सांगितलं धक्कादायक कारण

आपल्या पतीला प्रमोशन (Promotion) मिळणं ही त्याच्या पत्नीसाठीही आनंदाची, अभिमानाची गोष्ट असते. आपल्या पतीला मिळालेलं यश किंवा प्रमोशनचा आनंद अनेक महिला सोशल मीडियावर शेअर करतात. या महिलेनं तिच्या नवऱ्याला मिळणाऱ्या प्रमोशनमागचं जे कारण सांगितलं आहे, ते वाचून अनेकजणांना आश्चर्याचा धक्काच बसला आहे. काहीजण तिच्यावर संतापले आहेत.

पुढे वाचा ...
मुंबई, 4 नोव्हेंबर : नोकरीतल्या प्रमोशनची प्रत्येकजणच वाट बघत असतो. त्यासाठी वर्षभर प्रत्येकजण प्रचंड मेहनतीनं काम करत असतो. आपल्या पतीला प्रमोशन (Promotion) मिळणं ही त्याच्या पत्नीसाठीही आनंदाची, अभिमानाची गोष्ट असते. आपल्या पतीला मिळालेलं यश किंवा प्रमोशनचा आनंद अनेक महिला सोशल मीडियावर शेअर करतात. त्यात आपल्या नवऱ्यानं किती मेहनतीनं हे यश मिळवलं आहे हे आवर्जून सांगितलेलं असतं. सध्या सोशल (Social Media) मीडियावर एका महिलेचा मेसेज असाच व्हायरल झाला आहे. या महिलेच्या नवऱ्याला वारंवार प्रमोशन मिळत आहेत. त्याचं कामच तितकं चांगलं असेल किंवा तो त्याच्या बॉसचा अगदी खास लाडका असेल असं तुम्हाला वाटत असेल. यामध्ये तथ्यही असेल. पण या महिलेनं तिच्या नवऱ्याला मिळणाऱ्या प्रमोशनमागचं जे कारण सांगितलं आहे, ते वाचून अनेकजणांना आश्चर्याचा धक्काच बसला आहे. काहीजण तिच्यावर संतापले आहेत. पतीच्या ‘बॉस’बरोबर महिलेचे संबंध ‘माझ्या पतीला वारंवार प्रमोशन मिळतं कारण त्याच्या बॉससोबत माझे लैंगिक संबंध (Sexual Relations) आहेत. मात्र हे प्रमोशन आपल्या कामामुळे मिळतं असंच माझ्या पतीला वाटतं,’ असं या महिलेनं लिहिलं आहे. हे वाचून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. बॉसबरोबर आपले संबंध असल्यानंच नवऱ्याला प्रमोशन दिलं जातं असा दावा या महिलेनं केला आहे. इतकंच नाही तर “गेल्या काही वर्षांपासून माझे माझ्या पतीच्या बॉसबरोबर लैंगिक संबंध आहेत. नवऱ्याचं प्रमोशन म्हणजे तो जास्त काळ घरापासून दूर असणं. याच काळात मी त्याच्या बॉसशी संबंध ठेवू शकते,” असंही या महिलेनं पुढं लिहिलं आहे. प्रमोशनच्या नावाखाली पतीला आपल्यापासून दूर ठेवून त्याच्या बॉसशी संबंध ठेवणाऱ्या या महिलेच्या पोस्टवर लोकांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी या प्रकाराची प्रचंड थट्टा उडवली आहे तर काही जणांनी त्यावरून चांगलंच सुनावलंही आहे. “तुझ्या नवऱ्याला हे सगळं माहिती आहे, तो फक्त घटस्फोटासाठी पैसे जमवत आहे,” अशी प्रतिक्रिया एका युजरनं दिली आहे. एकूणच या पोस्टवरून तऱ्हेतऱ्हेच्या प्रतिक्रिया लोक देत आहेत. या महिलेनं ट्विटरच्या Fesshole वर हे सगळं लिहिलं आहे. हे अकाउंट लोकांच्या गुप्त गोष्टी किंवा सिक्रेट्स किंवा केलेल्या चुकीची कबुली शेअर करण्यासाठी एक गोपनीय व्यासपीठ मानलं जातं. त्यामुळेच या अकाउंटवरून या महिलेनं हे सगळं लिहिलं आहे. अर्थातच इतक्या खुलेपणानं लिहिल्यामुळे त्यावर विविध प्रतिक्रिया येणं स्वभाविक आहे. या महिलेची ही पोस्ट वाचणं रंजक असलं तरी तिच्या नवऱ्याला जेव्हा सत्य कळेल तेव्हा काय होईल याचा विचारच न केलेला बरा!
First published:

Tags: Wife and husband

पुढील बातम्या