Home /News /lifestyle /

वेगवेगळ्या व्यक्तींना कमी-अधिक वेदना का जाणवतात? पेनकिलरने कसं कमी होतं दुखणं? जाणून घ्या यामागचं विज्ञान

वेगवेगळ्या व्यक्तींना कमी-अधिक वेदना का जाणवतात? पेनकिलरने कसं कमी होतं दुखणं? जाणून घ्या यामागचं विज्ञान

आपल्याला ठेच लागली किंवा जखम झाली, तर त्या जागी दुखतं, वेदना (pain) होतात. कधी कधी असं पण होतं की दोन लोकांना सारखीच जखम झाली आहे पण त्यातल्या एकाला जास्त दुखतंय आणि एकाला तुलनेनी कमी त्रास होतो.

मुंबई, 31 जानेवारी: आपल्याला ठेच लागली किंवा जखम झाली, तर त्या जागी दुखतं, वेदना (pain) होतात. कधी कधी असं पण होतं की दोन लोकांना सारखीच जखम झाली आहे पण त्यातल्या एकाला जास्त दुखतंय आणि एकाला तुलनेनी कमी त्रास होतो. शरीरातल्या कोणत्याही भागाचं दुखणं असेल तर मग त्यावर औषध घेतलं जातं आणि त्यानंतर लगेच बरं देखील वाटायला लागतं, औषध घेतल्यानंतर लगेच त्रास कमी व्हायला लागतो. तर, हा कमी जास्त त्रास होणं, सारखाच आजार असला तरी त्रासाची तीव्रता कमी जास्त असणं आणि औषध घेतल्यानंतर लगेच बरं वाटू लागणं, हे सगळं का होतं किंवा त्याच्यामागची कारणं काय, शरीरातल्या रचनेमुळे असं घडतं का? अशा अनेक प्रश्नांची कारणं संशोधकांनी शोधली आहेत, तीच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. एका व्यक्तीला वेदना कमी आणि दुसऱ्याला जास्त जाणवणं हे जन्मापासून होत नाही. तर, ती व्यक्ती जन्मानंतर कोणत्या स्थितीत वाढली आणि तिची मानसिक स्थिती काय आहे, यावर अवलंबून असतं. आता अशी परिस्थिती कशी निर्माण होते ते समजून घेऊ. बीबीसीच्या रिपोर्ट्सनुसार, वेदनांचा मानवी मेंदूशी थेट संबंध आहे. वेदनेच्या परिस्थितीला माणूस कसा सामोरा जातो, यावर सगळं अवलंबून असतं. यासाठी एक उदाहरण पाहू. तुम्ही जिममध्ये (Gym) जाता तेव्हा तुम्हाला हार्ड वर्कआउट (workout) करताना वेदना होतात, शरीराचे काही अवयव खूप दुखतात. पण मग तुम्ही विचार करता की, दोन-तीन दिवसांनी त्या वेदना कमी होतील आणि मग शरीराला त्याची सवय झाली तर त्या वेदना होणार नाहीत. काही दिवसांनी खरंच तसं होतं देखील. हे वाचा-हिवाळ्यात कफ सिरपचा अतिवापर नको; दीर्घकालीन घातक परिणामांना तोंड द्यावं लागेल आता या मागचं कारण समजून घेऊ. यासंदर्भात फोर्ब्सच्या रिपोर्टमध्ये असं म्हटलंय की, एखादी व्यक्ती वेदनांबद्दल जितका जास्त विचार करते, तितक्याच जास्त वेदना त्याला जाणवतात. नंतर या वेदनांची एकदा सवय झाली की त्या जाणवणं बंद होतं. बरेचदा असं होतं की जेव्हा वेदना जाणवते तेव्हा मानवी शरीरातील वेदनांचे सिग्नल मेंदूकडे घेऊन जाणारी रक्तवाहिनी वेगाने काम करू लागते, त्यामुळे त्या व्यक्तीला वेदना होतात. एखाद्या व्यक्तीला ती वेदना पहिल्यांदाच झाली असेल तर त्याला जास्त त्रास होतो, पण एखाद्याला ती सवयीची झाली असेल तर वेदना कमी होते. पुरुष आणि महिलांमध्ये सर्वाधिक वेदना कोणाला जाणवतात, याचं उत्तर पुरूष आहे. त्याचं कारण म्हणजे पुरुषांमध्ये वेदना सहन करण्याची क्षमता जास्त असते. जेव्हा आपल्या सभोवताली जास्त लोक असतात, तेव्हा वेदना सहन करण्याची क्षमता आणखी वाढते, असं बीबीसीच्या रिपोर्टमध्ये म्हटलंय. हे वाचा-आयुर्वेदानुसार जेवण्याची पद्धत अनेकजण चुकतात; वेळ निघून जाण्यापूर्वी समजून घ्या पेनकिलर घेतल्याने वेदना का थांबतात? आपल्याला खूप वेदना होत असतील, तर आपण पेनकिलर (painkiller) घेतो आणि वेदनांची जाणीव होणं बंद होतं. तर पिनकिलर शरीरात कशी काम करते, हे समजून घेऊयात. जेव्हा एखाद्या व्यक्तीला दुखापत होते आणि वेदना होतात तेव्हा शरीरात प्रोस्टाग्लॅंडिन (prostaglandins ) नावाचं एक केमिकल रिलीज होतं. त्यामुळे वेदनेचा संदेश मेंदूपर्यंत पोहोचवणारी रक्तवाहिनी सक्रिय होते. परंतु पेनकिलर घेतल्यानंतर ते औषध त्या वाहिनीला मेंदूपर्यंत वेदनेचे सिग्नल पोहोचवू देत नाही. त्यामुळे आपल्याला दुखणं थांबलंय, असं वाटू लागतं आणि वेदना होत नाहीत.
First published:

Tags: Health, Pain

पुढील बातम्या