नवी दिल्ली, 27 डिसेंबर : हिंदू धर्मात प्रत्येक व्यक्ती आपल्या इष्ट देवाची कोणत्या ना कोणत्या स्वरूपात पूजा (worship) करतो. हिंदू धर्मग्रंथांमध्ये प्रत्येक देवाची पूजा (God worship) वेगळी आहे. परंतु, प्रत्येक पूजा पद्धतीमध्ये विशेषत: तांब्याची भांडी थाळी, कलश, आचमणी वापरली जातात. हिंदू पौराणिक कथांमध्ये, तांब्याची भांडी पूर्णपणे शुद्ध मानली जातात. कारण ही भांडी बनवताना इतर कोणत्याही प्रकारचा धातू वापरला जात नाही. शास्त्रात तांब्याच्या भांड्याची उपयुक्तता उपासना ग्रंथात सांगितली आहे. हिंदू धार्मिक ग्रंथांव्यतिरिक्त विज्ञान देखील मानते की, तांब्याची भांडी वापरणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. त्याविषयी सविस्तर (Why copper is used for worship) जाणून घेऊया.
वैज्ञानिक कारण
तांब्याच्या भांड्याच्या वापराने अनेक प्रकारचे आजार बरे होतात, असे विज्ञानाचेही मत आहे. तांब्याच्या भांड्यात पाणी प्यायल्याने आरोग्याला फायदा होतो, असे वैज्ञानिकांचे मत आहे.
धार्मिक मान्यता
धार्मिक मान्यतेनुसार, असे म्हटले जाते की जेथे तांब्याची भांडी किंवा तांब्यापासून बनवलेल्या वस्तूंचा वापर केला जातो, तेथे नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही. तांब्याला सूर्याचा धातू म्हणूनही ओळखले जाते.
हे वाचा - थंडीच्या दिवसात Heart Attack चा धोका अधिक; व्यायाम करताना या गोष्टींची खबरदारी घ्या
पुराणात उल्लेख
वराह पुराणात असा उल्लेख आहे की, प्राचीन काळी गुडाकेश नावाचा एक राक्षस होता. परंतु, राक्षस होऊनही तो भगवान श्रीहरींचा अनन्य भक्त होता. एकदा गुडाकेशने भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी कठोर तपश्चर्या सुरू केली. अनेक दिवसांची घोर तपश्चर्या केल्यावर भगवान श्रीहरी प्रसन्न होऊन त्यांच्यासमोर प्रकट झाले आणि त्यांनी वरदान मागायला सांगितले. तेव्हा गुडाकेश राक्षसाने वरदान मागितले की, माझा मृत्यू तुमच्या सुदर्शन चक्रानेच व्हावा आणि माझे शरीर . तांब्याचे बनवावे आणि त्या तांब्याच्या भांड्यांपासून बनवलेल्या वस्तू तुझ्या पूजेसाठी वापरल्या जाव्यात. पृथ्वीवरील कोणताही प्राणी तुझ्या पूजेत तांब्याच्या वस्तूचा वापर करतो, त्यांची उपासना सफल होते आणि तुझा आशीर्वाद सदैव त्यांच्यावर राहो.
हे वाचा - Winter Health : थंडीच्या दिवसात सुपरफूड आहे खजूर; हिवाळ्यात यासाठी खाणं आहे गरजेचं
गुडाकेश या राक्षसाने मागितलेल्या वरदानाने भगवान श्रीहरी प्रसन्न झाले आणि त्यांनी आपल्या सुदर्शन चक्राने गुडाकेशच्या शरीराचे तुकडे केले. त्यानंतर त्याच्या शरीरातून तांबे, रक्तातून सोने, हाडातून चांदी असे अनेक पवित्र धातू तयार झाले. म्हणूनच पूजेत नेहमी तांब्यापासून बनवलेली भांडी वापरावीत, असे सांगितले जाते.
(सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य धार्मिक माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Lifestyle