मुंबई, 2 मे : दारू पिण्याचं व्यसन वाईट आहे, असं आपण सातत्याने ऐकत असतो. दारूचे शरीरावर दुष्परिणाम होतात, तसेच माणूस नशेत स्वतःवरचं नियंत्रण गमावून बसतो. दारू प्यायल्यानंतर लोकांचं स्वतःवर नियंत्रण नसल्याने ते काहीही बोलतात, कसेही वागू लागतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की दारू प्यायल्यानंतर आपण आपल्या शरीरावरील नियंत्रण का गमावतो? आपल्यात इतकी हिंमत कुठून येते की आपण कुणालाच न घाबरता काहीही बोलू लागतो. आज जाणून घेऊया, त्याचं शास्त्रीय कारण काय आहे. या संदर्भात ‘झी न्यूज हिंदी’ ने वृत्त दिलं आहे. मद्यपान केल्यानंतर आपल्या शरीरात अनेक प्रकारचे बदल होऊ लागतात. दारूचा मेंदूवरील न्यूरॉनवर थेट प्रभाव पडतो, त्यामुळे आपल्या मेंदूच्या हालचाली नियंत्रित करणारे न्यूरॉन्स हळूहळू कमी होऊ लागतात, त्यामुळे मेंदूतील न्यूरॉन्सची संख्या कमी होऊ लागते. आपली विचार करण्याची क्षमता कमी होते, त्यामुळे दारू प्यायल्यानंतर आपला मेंदूवर कंट्रोल राहत नाही. न्यूरॉन्सच्या कमतरतेमुळे आपल्याला बोलण्यातही अडचणी येतात. दारू प्यायल्यानंतर उद्भवणाऱ्या अवस्थेला ब्लॅकआउट असंही म्हणतात. एका रिपोर्टनुसार, अमेरिकेतील नॅशनल इन्स्टिट्युट ऑन अल्कोहोल अॅब्युज अँड अल्कोहॉलिझमच्या मते, दारूचा थेट प्रभाव मेंदूवर होतो. दारूच्या नशेत बेशुद्ध झाल्यावर मेंदूतील हायपोथॅलॅमस नावाचा भाग काही वेळेसाठी अनियंत्रित होतो. हायपोथॅलॅमसमध्ये आपला मेंदू सर्व आठवणी व घडणाऱ्या गोष्टी एका फाईलप्रमाणे स्टोअर करतो. हायपोथॅलॅमसचं मुख्य काम म्हणजे शरीराचा तोल सांभाळणं. त्यावर दारूचा परिणाम झाला की माणसाचा तोल जातो. तळीरामांनो सावधान! तुम्हीही दारूसोबत असा चकणा खाताय का? एकदा जरूर पाहा या शिवाय हायपोथॅलॅमसला माहिती देणारे मेंदूचे इतर दोन भाग ज्याला फ्रंडल लोब व मेड्युला अबलाँगेटा म्हणतात, तेही प्रभावित होतात. फ्रंटल लोब मेंदूचा महत्त्वाचा भाग आहे, तर मेड्युला अबलाँगेटा आपल्याला धोक्याबद्दल सावध करतो. तज्ज्ञांच्या मते, दारूचं जास्त सेवन केल्यास आपल्या मेंदूच्या कॉग्निटिव्ह फंक्शनवर खूप मोठा प्रभाव पडतो. ही सगळी कारणं आहेत, ज्यामुळे दारू प्यायल्यानंतर आपण स्वतःवरील नियंत्रण गमवतो आणि जे तोंडात येईल ते बडबडतो. बऱ्याचदा नशेत केलेल्या बडबडीमुळे चुकीच्या गोष्टी बोलल्या जातात, त्यातून वादही उद्भवतात. त्यामुळे दारूची नशा करणं योग्य नाही. प्रत्येक पुरुष व स्त्रीने किती दारू प्यायला हवी, याबद्दलही अनेक संशोधनं झाली आहेत. त्यानुसार त्यांच्या शरीरासाठी किती दारू योग्य आहे, याबद्दलही संशोधकांनी माहिती दिली आहे. काही जण मर्यादेत मद्य प्राशन करतात, पण जे लोक दारू पिऊन स्वतःवरील कंट्रोल गमावतात, त्यांना बऱ्याचदा अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.