जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / ...म्हणून आपण निर्जीव वस्तूंमध्येही मानवी चेहरे शोधतो! निसर्गाने दिलेली अद्भूत देणगीच

...म्हणून आपण निर्जीव वस्तूंमध्येही मानवी चेहरे शोधतो! निसर्गाने दिलेली अद्भूत देणगीच

...म्हणून आपण निर्जीव वस्तूंमध्येही मानवी चेहरे शोधतो! निसर्गाने दिलेली अद्भूत देणगीच

मानवाला चेहरे पाहणे आणि ओळखणे खूप महत्वाचे आहे. कारण तेच त्यांच्या अस्तित्वाचे रक्षण करते. मानवी मेंदू (Why human brain analyse face in non living thing) अशा प्रकारे प्रोग्राम केलेले आहे की तो चेहऱ्यावरूनच गोष्टी शोधतो आणि निर्जीव वस्तूंमध्ये चेहरे शोधतो.

    मुंबई, 6 जून : कधी कधी आकाशातल्या ढगांकडे पाहिलं, तर माणसाचा चेहरा दिसतो किंवा एखादं मोठं हरीण धावत असल्यासारखं दिसतं. कधी चंद्राकडे पाहिलं, तर आपल्याकडे पाहून चंद्र हसतो आहे, असं वाटतं. असं का होतं? एखाद्या निर्जीव वस्तूमध्ये आपल्याला मानवी चेहऱ्याचा भास कसा होतो? याबाबत थोडं जाणून घेऊ या. अशा प्रकारे निर्जीव वस्तूत मानवी चेहरा दिसण्याला फेस पॅराडोलिया (Face Pareidolia) असं म्हणतात. चेहरे ओळखणं, वाचणं ही माणूसपणाची लक्षणं आहेत. मानवाला तशी देणगीच मिळाली आहे. चेहरे ओळखणं, त्यावरचे हावभाव ओळखणं, निर्जीव वस्तूंमध्ये मानवी चेहरा ओळखणं यासाठी माणसाचा मेंदू (Human Brain) तयार आहे. यामुळे माणूस एखाद्या निर्जीव गोष्टीत पटकन मानवी चेहरा ओळखतो. या प्रक्रियेला फेस पॅराडोलिया असं म्हणतात. मानवी मेंदू दोन पद्धतींनी चेहरा किंवा एखादी गोष्ट ओळखण्याचा प्रयत्न करतो. एखादी गोष्ट नीट पाहून, पारखून मग त्यातली सेन्सरी इन्फॉर्मेशन ओळखून त्यावर प्रक्रिया करणं ही एक पद्धत. याला टॉप डाउन प्रोसेसिंग असं म्हणतात. म्हणजे शाळेतल्या एखाद्या जुन्या मित्राला पाहिल्यावर त्याचा चेहरा पाहून ओळख पटवण्याचा आपण प्रयत्न करतो. दुसऱ्या पद्धतीत मेंदू आपोआपच सेन्सरी इन्फॉर्मेशन (Sensory Information) ओळखून प्रक्रिया करायला सुरुवात करतो. म्हणजे ढगांमध्ये किंवा ब्रेडवरच्या जॅममध्ये तयार झालेला मानवी चेहरा आपोआपच आपल्याला ओळखू येतो. याला बॉटम अप प्रोसेसिंग असं म्हणतात. ही प्रक्रिया आपोआपच होते. म्हणून ढगात चेहरा नाही हे माहीत असूनही, आपल्याला त्यात चेहरा दिसतो. या पद्धतीमध्ये मेंदू ओळखण्यात चूक करतो आणि ब्रेड किंवा ढगांना डिझाइन समजतो. आपण सवयीने खोटं बोलतो? की त्यामागं दुसरं काही कारण आहे? संशोधनातून मिळालं उत्तर मानवी मेंदू एखाद्या गोष्टीत केवळ चेहराच का शोधतो हाही एक मुद्दा आहे. त्याचं कारण जेव्हा बॉटम अप पद्धतीनं प्रक्रिया केली जाते, तेव्हा मेंदू चेहऱ्याशी पटकन जोडला जाऊ शकतो अशा पद्धतीनं त्याची रचना केलेली आहे. एखादा चेहरा विसरला गेला, तर जितकं नुकसान होईल, तितकं एखादी गोष्ट, वस्तू विसरल्यावर आपलं होणार नाही. त्यामुळेच चेहऱ्याविषयी मेंदूमध्ये अधिक सतर्कता असते. मेंदूच्या अनेक भागांमध्ये ही प्रक्रिया घडत असते. माणूस हा सामाजिक प्राणी आहे. त्यामुळे निसर्गानं मानवी मेंदूला सतत चेहरा ओळखण्यासाठी कार्यक्षम बनवलं आहे. त्यामुळे माणूस एखाद्या डिझाइनमध्ये, तसंच एखाद्या वस्तूच्या विशिष्ट आकारातून तयार झालेला चेहरा पटकन ओळखू शकतो.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात