Home /News /lifestyle /

Winter Health: घशात दुखत असेल तर चुकूनही खाऊ नका या गोष्टी; तब्येत जास्तच खालावेल

Winter Health: घशात दुखत असेल तर चुकूनही खाऊ नका या गोष्टी; तब्येत जास्तच खालावेल

घशात संसर्ग असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घेऊ शकता. याशिवाय काही घरगुती उपाय (Sore throat home remedies) देखील तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील. या काळात काय खावे आणि काय खाऊ नये हे जाणून घेणं तितकेच महत्त्वाचे आहे.

    नवी दिल्ली, 29 जानेवारी : थंडीच्या मोसमात सर्दी-पडसं आणि घसा खवखवण्याची समस्या (Sore throat) सहसा अनेकांना उद्भवते. बहुतेक लोकांना अशा परिस्थितीत घसा खवखवणे, खोकला, कर्कशपणा आणि घशातील संसर्गाचा सामना करावा लागतो. घशात संसर्ग असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घेऊ शकता. याशिवाय काही घरगुती उपाय (Sore throat home remedies) देखील तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील. विशेषतः खाण्यापिण्याचीही काळजी घ्यायला हवी. या काळात काय खावे आणि काय खाऊ नये हे जाणून घेणं तितकेच महत्त्वाचे आहे. तळलेले पदार्थ घसा खवखवणे (Sore throat problem) किंवा घसा दुखत असल्यास तळलेले पदार्थ अजिबात खाऊ नका. तेलकटपणामुळे घसा खवखवण्याचा त्रास आणखीन वाढू शकतो. या काळात तळलेले पदार्थ खाऊ नका. दूध या काळात दुधाचे सेवन तुमच्यासाठी हानीकारक ठरू शकते. दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ जास्त प्रमाणात घेऊ नका. यामुळे कफ वाढतो. जर तुम्हाला दूध प्यायचे असेल तर गरम दूध हळद ​घालून प्या. थंड पदार्थ खाऊ नका थंड पेये, फ्रीजमधील थंड पाणी यासारख्या थंड पदार्थांमुळे नुकसान हा त्रास आणखीन वाढत जातो. आयुर्वेदानुसार ही पेये कफ वाढवण्यास कारणीभूत ठरतात, यामुळे घशाचे नुकसान होते. या उपायांचा चांगला परिणाम दिसेल मिठाच्या पाण्याने गुळण्या घशाचा त्रास दूर करण्यासाठी मिठाच्या पाण्याने गुळण्या करा. यामुळे घशात जमा झालेला कफ सहज निघून जातो. घसा साफ केल्याने संसर्ग दूर होण्यास मदत होईल. ज्येष्ठमध घसादुखी किंवा घसा खवखवल्यास ज्येष्ठमध खायला हवा. यासाठी ज्येष्ठमधचा तुकडा घ्या आणि चोखत रहा. यामुळे घसादुखीची समस्या दूर होईल. तुम्ही लिकोरिस पावडरचे पाणी देखील पिऊ शकता. हे वाचा - Immunity Booster: हंगामी सर्दी-तापातून लगेच व्हाल रिकव्हर; हा आयुर्वेदिक काढा ठरेल गुणकारी तुळस तुळशीच्या पानांमध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी सेप्टिक गुणधर्म असतात. त्याचे सेवन फायदेशीर ठरेल. यासाठी तुळशीची पाने पाण्यात उकळा. या पाण्याने गुळण्या करा. आपण तुळशीच्या पानांचा चहा देखील पिऊ शकता. लवंग आणि काळी मिरी लवंग आणि काळी मिरी यांचे सेवन देखील घशासाठी फायदेशीर आहे. एक ग्लास कोमट पाण्यात लवंग, काळी मिरी पावडर आणि मध मिसळा. हे पाणी काही दिवस सतत सकाळी प्या. हे वाचा - या 5 राशींच्या लोकांना फेब्रुवारी महिना जाणार जड; अस्ताला जाणारा शनी लागोपाठ आणेल संकटं तमालपत्र चहा तमालपत्राच्या चहाच्या सेवनानेही फायदा होईल. चहामध्ये तमालपत्र टाकून प्या. यामुळे घशाला खूप आराम मिळेल. (सूचना : येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत याची हमी देत नाही.)
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Health, Health Tips, Lifestyle

    पुढील बातम्या