दूध पिणं आरोग्यासाठी फायद्याचे आहे पण आपण ते कसं पितो यावर त्याचे फायदे अवलंबून आहेत. नुकत्याच झालेल्या एका संशोधनामधून समोर आलं की, कच्चं दूध जर सामान्य तापमानात ठेवले तर त्यात हानिकारक जीवाणू निर्माण होतात. माइक्रोबायोम जर्नल मध्ये प्रकाशित या अभ्यासात असे दिसून आले की दुधामध्ये रोगाणुरोधी-प्रतिरोधी जिन असतात. खूप वेळ सामान्य तापमानात दूध ठेवले तर त्यात जीवाणू निर्माण होतात आणि असे दूध प्यायल्याने आजार होऊ शकतात. myupchar.com चे डॉ. लक्ष्मीदत्त शुक्ला सांगतात की, कच्च्या दुधाला पॉश्चराइझ किंवा होमोजेनाइझ (दुकानात जे दूध पॅकिंग करून मिळते त्याला पॉश्चराइज्ड अथवा होमोजीनइझ दूध म्हणतात) केले जात नाही. कच्चे दूध मुख्यत्वे गाय, बकरी, म्हैस आणि उंटाचे असते. कच्च्या दुधात अनेक पोषक द्रव्य आणि एंजाइम असतात जे रोग प्रतिकारशक्ती वाढवतात, अॅलर्जी कमी करतात. कच्चे दूध सहज पचते. पॉइश्चराइजेशन पोषकद्रव्यांची हानी न होऊ देता त्याला सुरक्षित ठेवते. यात दूध गरम केले जाते त्यामुळे त्यातील सूक्ष्म जीवाणू नाश पावतात आणि हे दूध पिण्यास योग्य असते. पण सामान्य तापमानाला खूप वेळ ठेवलेलं दूध प्यायलो तर मात्र आजार होण्याचा संभाव असतो. हे वाचा - तुमच्याही खाण्यासंदर्भात तक्रारी आहेत का? हा असू शकतो आजार, जाणून घ्या लक्षणं कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या संशोधकांचे सांगणे आहे, कच्च्या दुधाला फ्रीजमध्ये ठेवायला हवे. यामुळे रोगाणुरोधी-प्रतिरोधी जिनसोबत जीवाणू निर्माण होण्याचा धोका राहत नाही. कच्च्या दुधामध्ये पॉश्चराइज्ड दुधाच्या तुलनेत जास्त प्रमाणात चांगले जीवाणू असतात असे म्हटले जाते पण संशोधकांना असे काही आढळून आले नाही. त्यांना दोन गोष्टींनी आश्चर्यचकित केले ते म्हणजे कच्च्या दुधात हेल्दी जीवाणू कमी प्रमाणात होतात आणि पॉश्चराइज्ड दुधाच्या तुलनेत यात जास्त प्रमाणात रोगाणुरोधी-प्रतिरोधी जिन बनतात. रोगाणुरोधी-प्रतिरोधी जिन असलेल्या जीवाणूंमध्ये ‘सुपरबग्स’ बनायची क्षमता होती आणि या संसर्गावर औषधेही परिणाम करत नाहीत. यूएस सेंटर्स फॉर डिसऑर्डर कंट्रोलच्या नुसार, दरवर्षी साधारणपणे 30 लाख लोकांमध्ये रोगाणुरोधी-प्रतिरोधी संसर्ग आढळून येतो आणि 35,000 पेक्षा जास्त लोक बळी पडतात. हे वाचा - डोळ्यांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचा आहार; आवश्यक आहेत 5 पोषक घटक या संशोधनासाठी पाच राज्यातील 200 दुधाच्या नमुन्यांचे विश्लेषण करण्यात आले. ज्यात कच्च्या आणि पॉश्चराइज्ड दुधाचे नमुने घेण्यात आले होते. अभ्यासात दिसून आले की कच्च्या दुधात रोगाणुरोधी-प्रतिरोधी जिवाणूंची निर्मिती अधिक प्रमाणात होती. myupchar.com चे डॉ. लक्ष्मीदत्त शुक्ला यांच्या अनुसार, कच्च्या दुधाचा योग्य उपयोग केला तर रक्तदाब नियंत्रणात येऊ शकतो. हे दूध पोट आणि हाडांसाठी पण फायाद्याचे असते. त्याने त्वचा चांगली होते. अधिक माहिती साठी वाचा आमचा लेख - ग्रंथी, पोषण आणि राहणीमानाशी संबंधित आजार न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.