मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /पुरुषांमध्येही मेनोपॉज होतो का? महिला मेनोपॉजपेक्षा काय असतं वेगळं, वाचा सर्व माहिती

पुरुषांमध्येही मेनोपॉज होतो का? महिला मेनोपॉजपेक्षा काय असतं वेगळं, वाचा सर्व माहिती

पुरुषांमध्ये रजोनिवृत्ती होते, ज्याला आपण एंड्रोपॉज (Andropause) म्हणतो, असे डॉक्टरांच्या एका गटाचे मत आहे. तर दुसरा गट एंड्रोपॉजचा सिद्धांत स्वीकारत नाही. डॉ. मनोज शर्मा यांच्या मते, 40 वर्षांनंतर सहसा काही हार्मोनल बदल होतात.

पुरुषांमध्ये रजोनिवृत्ती होते, ज्याला आपण एंड्रोपॉज (Andropause) म्हणतो, असे डॉक्टरांच्या एका गटाचे मत आहे. तर दुसरा गट एंड्रोपॉजचा सिद्धांत स्वीकारत नाही. डॉ. मनोज शर्मा यांच्या मते, 40 वर्षांनंतर सहसा काही हार्मोनल बदल होतात.

पुरुषांमध्ये रजोनिवृत्ती होते, ज्याला आपण एंड्रोपॉज (Andropause) म्हणतो, असे डॉक्टरांच्या एका गटाचे मत आहे. तर दुसरा गट एंड्रोपॉजचा सिद्धांत स्वीकारत नाही. डॉ. मनोज शर्मा यांच्या मते, 40 वर्षांनंतर सहसा काही हार्मोनल बदल होतात.

नवी दिल्ली, 12 नोव्हेंबर : स्त्रियांची मासिक पाळी पूर्णपणे नैसर्गिकरित्या थांबते तेव्हा अशा स्थितीला रजोनिवृत्ती (मेनोपॉज) (Menopause) म्हणतात. त्यामुळं असा प्रश्न निर्माण होतो की, स्त्रियांप्रमाणे पुरुषांनाही रजोनिवृत्ती होते का? यावर वसंतकुंज फोर्टिस हॉस्पिटलचे वरिष्ठ सल्लागार डॉ. मनोज शर्मा सांगतात की, पुरुषांमध्ये रजोनिवृत्ती होते की नाही, हा खरं तर वादाचा विषय आहे. वैद्यकीय तज्ज्ञांची याबाबत वेगवेगळी मतं आहेत.

पुरुषांमध्ये रजोनिवृत्ती होते, ज्याला आपण एंड्रोपॉज (Andropause) म्हणतो, असे डॉक्टरांच्या एका गटाचे मत आहे. तर दुसरा गट एंड्रोपॉजचा सिद्धांत स्वीकारत नाही. डॉ. मनोज शर्मा यांच्या मते, 40 वर्षांनंतर सहसा काही हार्मोनल बदल होतात. एंड्रोपॉज या बदलांमुळे लक्षणे आणि कमी टेस्टोस्टेरॉनशी संबंधित आहे. या बदलांमुळं समोर येणारी लक्षणं आणि टेस्टोस्टेरोन कमी होण्याच्या प्रकाराला एंड्रोपॉजशी जोडून पाहिलं जातं

पुरुष रजोनिवृत्तीची लक्षणे (एंड्रोपॉज)

मूड बदलणे

अशक्तपणा येणं

आळस येणं

अंगदुखी

हाडे कमकुवत होणे

काम करण्यात मन न लागणं

लैंगिक उत्तेजना कमी

उदास वाटणे इ.

एंड्रोपॉजची लक्षणे या रोगांसारखीच असतात

डॉ. मनोज शर्मा यांच्या म्हणण्यानुसार, 40 वर्षे ओलांडलेला रुग्ण आपल्या डॉक्टरांकडे जातो आणि कामात मन न लागणं, थकवा किंवा नैराश्य, हाडे कमकुवत होणे, अंगदुखी यासारखी इतर काही लक्षणे सांगतो, तर शक्य आहे की ही लक्षणं संसर्गामुळं किंवा चयापचयाशी संबंधित आजारांमुळे उद्भवू शकतात. म्हणून लगेच कोणत्याही रुग्णावर एंड्रोपॉज असं लेबल लावण्याआधी सखोल तपासणी करणं फार महत्वाचं आहे. ही सर्व लक्षणे इतर कुठल्यातरी आजारामुळे किंवा समस्येमुळेही होऊ शकतात.

हे वाचा - बाईकच्या हँडलमुळे तरुणीच्या प्रायव्हेट पार्टला जबर मार; मेडिकल जर्नलमध्ये केस दाखल

टेस्टोस्टेरॉन चाचणीच्या पद्धतीतही अडचणी

डॉ. मनोज शर्मा यांच्या मते, एंड्रोपॉजवर उपचार म्हणून टेस्टोस्टेरॉन बदलण्याची वेळ येऊ शकते. येथेही अनेक समस्या आहेत. पहिली अडचण अशी आहे की, प्रत्येक प्रयोगशाळेत टेस्टोस्टेरॉनची चाचणीची पद्धतच नव्हे तर त्यांची वॅल्यूही वेगळी असतात. अशा स्थितीत टेस्टोस्टेरॉनचे योग्य वॅल्यू मिळवणे हे एक मोठे आव्हान असते. जर रुग्णाच्या सर्व चाचण्या एकाच प्रयोगशाळेतून झाल्या तर कदाचित टेस्टोस्टेरॉनची खरी वॅल्यू कळू शकेल. जर एखाद्याला टेस्टोस्टेरॉन कमी असेल तर त्याला टेस्टोस्टेरॉन द्यावे की नाही, हा देखील पुन्हा एक वादग्रस्त विषय आहे.

हे वाचा - हिवाळ्यात फक्त एक डाळिंब खाण्याचे आहेत भरपूर फायदे; वजनासह कोलेस्ट्रॉलही होईल कमी

टेस्टोस्टेरॉन प्लेसमेंटचे धोके काय आहेत?

डॉ. मनोज शर्मा यांच्या मते, टेस्टोस्टेरॉन रिप्लेसमेंटसाठी इंजेक्टेबलचे अनेक पर्याय आहेत. प्लेसमेंटसाठी अनेक क्रीम आणि पॅचेस देखील येतात. इंजेक्टेबल पर्याय थोडा कठीण आणि वेदनादायक आहे. त्याचवेळी योग्य मार्गदर्शन न केल्यास प्रोस्टेट कॅन्सरचा धोकाही असतो. प्लेसमेंटनंतर अनेक वेळा मूड स्विंग, राग, निद्रानाश आदी लक्षणेही दिसतात. त्याच वेळी, टेस्टोस्टेरॉन प्लेसमेंटनंतर आपल्या समस्येचे निदान होईल याची कोणतीही हमी नाही. अशा स्थितीत रुग्णाला नैराश्य किंवा इरेक्टाइल डिसफंक्शनच्या उपचारांकडेही जावे लागते.

First published:

Tags: Sexual health, Sexual wellness