मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /LGBTQIA+ म्हणजे काय? दिसणं नाही तर लैंगिक प्राधान्याने ओळख, प्रत्येक अक्षराचा अर्थ वेगळा!

LGBTQIA+ म्हणजे काय? दिसणं नाही तर लैंगिक प्राधान्याने ओळख, प्रत्येक अक्षराचा अर्थ वेगळा!

आपल्या देशात अलीकडच्या काळात एलजीबीटीक्यू (LGBTQIA) हा शब्द सर्रास ऐकू येतो. या समुदायाच्या मागण्या, त्यासाठीची चळवळ, त्यानंतर करण्यात आलेले नवीन कायदे, यामुळे आता या समुदायाबाबत जनतेत जागरूकता निर्माण झाली आहे.

आपल्या देशात अलीकडच्या काळात एलजीबीटीक्यू (LGBTQIA) हा शब्द सर्रास ऐकू येतो. या समुदायाच्या मागण्या, त्यासाठीची चळवळ, त्यानंतर करण्यात आलेले नवीन कायदे, यामुळे आता या समुदायाबाबत जनतेत जागरूकता निर्माण झाली आहे.

आपल्या देशात अलीकडच्या काळात एलजीबीटीक्यू (LGBTQIA) हा शब्द सर्रास ऐकू येतो. या समुदायाच्या मागण्या, त्यासाठीची चळवळ, त्यानंतर करण्यात आलेले नवीन कायदे, यामुळे आता या समुदायाबाबत जनतेत जागरूकता निर्माण झाली आहे.

    मुंबई, 17 नोव्हेंबर : आपल्या देशात अलीकडच्या काळात एलजीबीटीक्यू हा शब्द सर्रास ऐकू येतो. या समुदायाच्या मागण्या, त्यासाठीची चळवळ, त्यानंतर करण्यात आलेले नवीन कायदे, यामुळे आता या समुदायाबाबत जनतेत जागरूकता निर्माण झाली आहे; मात्र अनेकांना या नावाचा नेमका अर्थ माहीत नाही. अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) कॉलेजियमने (Collegium) ज्येष्ठ वकील सौरभ कृपाल (४९) यांची दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश (High Court Judge) म्हणून नियुक्ती करण्याची शिफारस केली आहे. सौरभ कृपाल (Saurabh Kripal) हे एलजीबीटीक्यूआयए प्लस (LGBTQIA+) समुदायाशी संबंधित असून, त्यांच्या रूपाने प्रथमच देशाला समलिंगी (Gay Judge) न्यायाधीश मिळणार आहे. आपल्या देशात ही खूप मोठी बाब आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या समुदायाची चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर एलजीबीटीक्यूआयए प्लस (LGBTQIA+) या नावातल्या अक्षरांचा अर्थ काय, असा प्रश्न पुन्हा एकदा विचारला जाऊ लागला आहे.

    आपण एखाद्या व्यक्तीच्या एखाद्या ठराविक वैशिष्ट्यावरून तिला एखादे टोपण नाव देतो. तसंच एखाद्या विशिष्ट समुदायाची ओळखही त्यांच्या काही वैशिष्ट्यांवरून होते. त्याचप्रमाणे एलजीबीटीक्यूआयए प्लस (LGBTQIA+) या समुदायातले नागरिक त्यांच्या पेहरावावरून किंवा दिसण्यावरून ओळखले जात नाहीत, तर त्यांच्या लैंगिक आवडींवरून ओळखले जातात. म्हणजेच, लैंगिक संबंधासाठी ते कोणत्या लिंगाकडे आकर्षित होतात आणि स्वतःला शरीरापेक्षा (पुरुष किंवा स्त्रीलिंगी) वेगळ्या रूपात पाहतात. त्यावरून त्यांची ओळख ठरवली जाते. या समुदायाच्या नावातल्या चिन्हाचा अर्थ त्याच्याशी निगडित आहे.

    L - लेस्बियन (Lesbian) : जेव्हा एखाद्या स्त्रीला स्त्रीचं आकर्षण असते, तेव्हा त्यांना लेस्बियन म्हणतात. यामध्ये दोन्ही जोडीदार महिला असतात. काही वेळा जोडीदारांपैकी एकाचं बाह्य व्यक्तिमत्त्व वेगळंही असू शकतं.

    G - गे (Gay) : जेव्हा एखादा पुरुष दुसऱ्या पुरुषाकडे आकर्षित होतो, तेव्हा त्याला 'गे' म्हणतात. 'गे' हा शब्द काही वेळा संपूर्ण समलिंगी समुदायासाठी वापरला जातो, ज्यामध्ये 'लेस्बियन', 'गे', 'बायसेक्शुअल' सर्वांचा समावेश होतो.

    B - बायसेक्शुअल (BiSexual) : जेव्हा एखादा पुरुष किंवा स्त्री, स्त्री आणि पुरुष दोघांकडेही आकर्षित होतात आणि लैंगिक संबंधदेखील ठेवतात. तेव्हा त्याला 'बायसेक्शुअल' म्हणतात. स्त्री आणि पुरुष दोघेही 'बायसेक्शुअल' असू शकतात. माणसाची शारीरिक इच्छा तो L, G किंवा B आहे हे ठरवते.

    T - ट्रान्सजेंडर (Transgender) : एखादी व्यक्ती जन्माला येताना जे शरीर घेऊन येते, त्याच्यापेक्षा तिच्या भावना पूर्णपणे विरुद्ध असतात. जन्माच्या वेळी जननेंद्रिये जशी असतात त्यानुसार तिचं लिंग म्हणजे ती व्यक्ती स्त्री आहे की पुरुष आहे हे ठरतं. परंतु काही व्यक्तींमध्ये काही काळानंतर मनाने ती व्यक्ती मुलीसारखी असल्याचं, पण शरीराने पुरुषासारखं असल्याचं स्पष्ट होतं. अशा वेळी काही जण शस्त्रक्रिया करून लिंगबदल करतात. हॉर्मोन्स थेरपी घेतात. त्यामुळे मुलांनादेखील स्तन येतात. एखाद्या स्त्रीला पुरुषासारखे वाटत असेल, तर ती पुरुषासारखे दिसण्यासाठी, वाटण्यासाठी थेरपीचा अवलंब करून लिंगबदल करून घेते. अशा व्यक्तींना 'ट्रान्सजेंडर' म्हणतात.

    Q - क्विअर (Queer or Questioning) : या गटात अशा व्यक्तींचा समावेश होतो ज्यांना आपल्या ओळखीबद्दल आणि शारीरिक इच्छेबद्दल संभ्रम असतो, प्रश्न असतो. या व्यक्ती स्वतःला पुरुष, स्त्री किंवा ट्रान्सजेंडर किंवा लेस्बियन, गे किंवा बायसेक्शुअलही मानत नाहीत. त्यांना क्विअर म्हटलं जातं. क्विअरमधल्या 'क्यू'चा अर्थ प्रश्नार्थक असा केला जातो.

    I - इंटरसेक्स (Intersex) : इंटरसेक्स सोसायटी ऑफ नॉर्थ अमेरिका या संस्थेच्या मते, ही संज्ञा अशा व्यक्तींची व्याख्या करते, जे स्त्री किंवा पुरुषाच्या सामान्य प्रजनन अवयवांसह जन्मलेले नाहीत. जे लोक बाहेरून नर किंवा मादी दिसतात, परंतु त्यांचे प्रजननासाठीचे अवयव त्यांच्या लिंगाशी जुळत नाहीत.

    A - अलाय (Asexual or Ally ) : या अक्षराचे दोन अर्थ होऊ शकतात. पहिला असेक्शुअल ज्याला आपण अलैंगिक म्हणू शकतो. ही संज्ञा अशा व्यक्तींसाठी वापरली जाते, ज्यांना कोणत्याही लिंगाबद्दल लैंगिक आकर्षण वाटत नाही. त्यांना लैंगिक भावनाच नसतात. या व्यक्ती अन्य व्यक्तीशी प्रेमसंबंध निर्माण करू शकतात, परंतु ते लैंगिक संबंध ठेवण्यास सक्षम नसतात. यामागे कोणतंही मानसिक कारण किंवा भीती नसते. दुसरी संज्ञा आहे 'अलाय '. ही संज्ञा LGBTQI व्यक्तींचे सहकारी किंवा मित्र म्हणून त्यांच्या हक्कांसाठी बोलणाऱ्या व्यक्तींसाठी वापरली जाते. अनेकदा या व्यक्ती त्या समुदायाच्या नसतात.

    प्लस (+) (Plus Sign) : LGBTQIA सोबत प्लस (+) चिन्ह जोडण्यात आलं आहे. यामध्ये पॅनसेक्शुअल, पॉलीमोरस, डेमिसेक्शुअल यांसह इतर अनेक गटांचा समावेश आहे. अद्याप ज्या गटांची ओळख निर्माण झालेली नाही, अशा गटांसाठी हे चिन्ह ठेवण्यात आलं आहे.

    First published: