जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणजे काय? वजन वाढीशीही आहे संबंध, कसा तो पाहा!

इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणजे काय? वजन वाढीशीही आहे संबंध, कसा तो पाहा!

इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणजे काय? वजन वाढीशीही आहे संबंध, कसा तो पाहा!

शरीरातली अतिरिक्त फॅट्स विशेषत: कमरेभोवती असलेलं फॅट आणि शारीरिक हालचालींचा अभाव ही इन्सुलिन रेझिस्टन्सची प्राथमिक कारणं आहेत.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    नवी दिल्ली, 5 मे : सध्याच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे आणि खाण्यापिण्याच्या अयोग्य सवयींमुळे अनेकांना वजनवाढीच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. वजन कमी करताना कमी कॅलरीजचं सेवन करणं आणि फॅट्सयुक्त पदार्थांचं मर्यादित सेवन करणं हा सर्वांत सोपा मार्ग आहे. अनेकांना याचा उपयोग होतो आणि त्यांचं वजन नियंत्रणात येतं; पण वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला इन्सुलिन रेझिस्टन्स असेल आणि टाइप 2 डायबेटीसचा धोका असेल तर? ‘स्क्रिप्स क्लिनिक सेंटर फॉर वेट मॅनेजमेंट’मधले एंडोक्रायनॉलॉजिस्ट आणि वेट मॅनेजमेंट एक्सपर्ट, मायकेल डब्ल्यू. ली (एमडी) यांच्या मते, अशा व्यक्तीने डॉक्टरांशी सल्लामसलत केली पाहिजे. ‘स्क्रिप्स’ने याबाबत माहिती प्रसिद्ध केली आहे. इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणजे काय? इन्सुलिन हे आपल्या स्वादुपिंडाने तयार केलेलं एक मेटाबॉलिक हॉर्मोन आहे. जेव्हा आपण अन्न खातो तेव्हा आपल्या शरीरातल्या पेशींना रक्तातली साखर किंवा ग्लुकोजच्या स्वरूपात इंधन त्वरित वापरासाठी उपलब्ध आहे, हे सांगण्याचं काम इन्सुलिन करतं. काही प्रकरणांमध्ये विविध कारणांमुळे, शरीरातल्या पेशी इन्सुलिनला पाहिजे तसा प्रतिसाद देत नाहीत आणि रक्तातून साखर सहजपणे घेऊ शकत नाहीत. अशा वेळी हाय ब्लड शुगर लेव्हल कायम ठेवण्याचा प्रयत्न करण्यासाठी स्वादुपिंड अधिक इन्सुलिन तयार करून प्रतिक्रिया देतं. ही स्थिती हायपरइन्सुलिनेमिया म्हणून ओळखली जाते. पेशी इन्सुलिनला खूप प्रतिरोधक बनल्या तर त्याचा परिणाम रक्तातल्या शुगर लेव्हलवर होऊ शकतो. इन्सुलिन रेझिस्टन्समुळे वजन वाढू शकतं, प्रीडायबेटिक परिस्थिती उद्भवू शकते आणि टाइप 2 डायबेटीस होऊ शकतो. इन्सुलिन रेझिस्टन्स असल्यास वजन कमी करणं अधिक कठीण होतं. कारण, शरीर रक्तातली अतिरिक्त साखर चरबी म्हणून साठवतं. इन्सुलिन रेझिस्टन्स कशामुळे होतो? शरीरातली अतिरिक्त फॅट्स विशेषत: कमरेभोवती असलेलं फॅट आणि शारीरिक हालचालींचा अभाव ही इन्सुलिन रेझिस्टन्सची प्राथमिक कारणं आहेत. हाय प्रोसेस्ड कार्बोहायड्रेट खाद्यपदार्थ आणि सॅच्युरेटेड फॅट्स असलेले खाद्यपदार्थ हे यात आणखी वाढ करणारे घटक आहेत. काही औषधं आणि आनुवंशिक गुणधर्मदेखील इन्सुलिन रेझिस्टन्ससाठी कारणीभूत ठरू शकतात. हेल्दी कार्ब्ज, फॅट्स आणि प्रोटीन असलेला आहार घेतल्यास इन्सुलिन रेझिस्टन्स कमी होण्यास मदत होऊ शकते. ग्लायसेमिक इंडेक्स आणि आहार ग्लायसेमिक इंडेक्स (जीआय) हे रक्तातल्या ग्लुकोज व्यवस्थापनाला प्रोत्साहन देण्यासाठी सर्वोत्तम साधनांपैकी एक साधन आहे. जीआय स्कोअर हे खालेल्या अन्नाचा रक्तातल्या साखरेवर किती परिणाम होतो याचं मोजमाप आहे. तिशीनंतर आयुष्यभर तंदुरुस्त राहायचंय? मग रात्रीचे जेवण केल्यानंतर अजिबात करू नका या चुका 1. हाय-ग्लायसेमिक पदार्थ (70 आणि त्याहून अधिक) अचानक आणि लक्षणीय प्रमाणात इन्सुलिन वाढवतात. 2. मिड-ग्लायसेमिक पदार्थ (56-69) हे मध्यम प्रमाणात इन्सुलिन वाढवतात. 3. लो-ग्लायसेमिक पदार्थ (0-55) इन्सुलिनची पातळी तुलनेने कमी आणि स्थिर ठेवण्यास मदत करतात. हार्वर्ड युनिव्हर्सिटीनं ग्लुकोज व्यवस्थापनात मदत करण्यासाठी एक सोपा ऑनलाइन ग्लायसेमिक इंडेक्स दिला आहे. डायबेटीस, ग्लुकोज कंट्रोल, आहाराचे प्लॅन्स आणि शारीरिक अ‍ॅक्टिव्हिटी ट्रॅक आणि मॅनेज करण्यासाठी स्मार्टफोन आणि टॅबलेट अ‍ॅप्सदेखील आहेत. कोणत्या पदार्थांचा ब्लड शुगरवर परिमाण होतो? रक्तातल्या साखरेचं प्रमाण वाढवणाऱ्या कार्बोहायड्रेट्समध्ये तांदूळ, ब्रेड, ब्रेकफास्ट सीरियल्स, बेक केलेले पदार्थ, तसंच साखरयुक्त पेयं आणि फळांचे रस यांसारख्या खाद्यपदार्थांचा होतो. रक्तातल्या साखरेचं प्रमाण कमी करणाऱ्या कार्ब्जमध्ये बीन्स, शेंगा, ताजी किंवा फ्रोजन फळं, भाज्या, दूध आणि दही यांचा समावेश होतो. योग्य वजन कसं राखावं? ‘समजा, एखादी व्यक्ती इन्सुलिन रेझिस्टंट नसेल आणि साध्या कार्बोहायड्रेट्सचं आहारातलं प्रमाण घटवून त्यांना वजनात घट करण्याचे अतिरिक्त फायदे मिळाले नाहीत, तरी तो आहार घेण्याचा हेल्दी मार्ग आहे,’ असं डॉ. ली. सांगतात. “सातत्य आणि सस्टेनॅबिलिटी घटक हे वजन कमी करण्याची गुरुकिल्ली ठरू शकतात. कोणत्याही प्रकारच्या लो-कॅलरी आहाराच्या मदतीने वजन कमी करणं आणि ते संतुलित राखणं शक्य आहे. विशेषत: आहार आवडत असलेले पदार्थ खाण्यास परवानगी देत असेल तर तुम्ही त्याचाच अवलंब करू शकता,” असंही डॉ. ली म्हणाले.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात