शरीरावर दिसणारी गाठ कॅन्सरची की चरबीची नेमकं कसं ओळखावं?

शरीरावर दिसणारी गाठ कॅन्सरची की चरबीची नेमकं कसं ओळखावं?

आपल्या शरीरावर कुठेही गाठ दिसली की सर्वात पहिला मनात प्रश्न येतो तो म्हणजे ही गाठ कॅन्सरची तर नाही ना?

  • Last Updated: Nov 28, 2020 02:49 PM IST
  • Share this:

बर्‍याचदा आपण पाहतो की शरीरावर अशा गाठी असतात, ज्यांच्यामध्ये वेदना होत नाहीत. याला चरबीची गाठ असं म्हटलं जातं. यामुळे कोणती समस्या उद्भवत नसली, त्याचा त्रास होत नसला तरी त्या शरीरावर विचित्र दिसतात. कधीकधी या प्रकारच्या गाठींमुळे लोकांना लाज वाटते. ही गाठ कशी ओळखायची, त्याची कारणं आणि  त्यावर घरगुती उपचार काय आहेत याची माहिती घेऊयात.

इतर प्रकारच्या गाठींव्यतिरिक्त चरबीमुळे होणाऱ्या गाठींची लक्षणं काही वेगळी आहेत. ही गाठ मान, खांदा, हात, कंबर, उदर आणि मांडीवर उद्भवते. या प्रकारच्या गाठीमुळे जास्त वेदना होत नाही. मात्र जर कोणत्याही मज्जातंतूवर दबाव येत असेल तर यामुळे सौम्य वेदना होऊ शकतात. काही जणांना चरबीच्या गाठी असल्यास बद्धकोष्ठतेची समस्या देखील असते.

myupchar.com शी संबंधित एम्सच्या डॉ. व्ही. के. राजलक्ष्मी यांनी सांगितलं, चरबीच्या गाठी होण्याची अनेक कारणं असू शकतात. जखम, लठ्ठपणा, जास्त प्रमाणात मद्यपान किंवा यकृत संबंधित आजारांमुळे देखील ही गाठ येऊ शकते. तसंच आनुवंशिकरित्यादेखील ही गाठ असू शकते.

चरबीची गाठ घालवण्यासाठी घरगुती उपचार

गाठीवर दररोज कापसाचा वापर करून लिंबूपाणी लावा. हे लावल्यास यातील दाहकविरोधी गुणधर्म जळजळ कमी होण्यास मदत करतील.

गाठीवर अॅपल सिडर व्हिनेगरदेखील लावता येतं.

गाठीवर हळद पेस्ट लावली तरी देखील गाठ लवकरच नाहीशी होईल. हळदीमध्ये दाहकविरोधी आणि प्रतिजैविक गुणधर्म असतात. हे गुणधर्म जळजळ कमी करतात आणि जीवाणूपासून मुक्तता देतात.

लसणीचा चरबीच्या गाठीवर उपचार करण्यासाठी उपयोग केला जातो. त्यात अँटीमाइक्रोबियल, अँटीऑक्सिडंट, अँटीबॅक्टेरीयल आणि अँटीफंगल गुण असतात. लसणातील हे सर्व गुण चरबीच्या गाठी कमी करण्यास मदत करतात सोबत बॅक्टेरीयापासून बचाव पण करतात.

चरबीच्या गाठीपासून वाचण्यासाठी आहाराची काळजी घ्यायला हवी. व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन ई असलेले पदार्थ खायला हवेत आणि पाणी भरपूर प्यायला हवं.

कॅफीन नावाचं उत्तेजक द्रव्य कॉफी आणि चहामध्ये भरपूर प्रमाणात आढळतात, ज्यामुळे गाठी वाढू शकतात. इतकंच नाही तर तेलकट आणि मसालेदार पदार्थ देखील टाळावेत.

myupchar.comशीसंबंधितएम्सचे डॉ. उमर अफरोज यांच्या म्हणण्यानुसार, बहुतेक चरबीच्या गाठी शस्त्रक्रियेद्वारे कापून काढता येतात. बर्‍याच प्रकरणांमध्ये शस्त्रक्रियेनंतर त्याचे दुष्परिणामही पाहायला मिळतात. काही प्रकरणांमध्ये या गाठी इंजेक्शनद्वारे देखील संकुचित किंवा छोटे करता येतात.

अधिक माहितीसाठी वाचा आमचा लेख – अंडाशयात गाठ

न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीयमाहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेतस्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठीआरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.

अस्वीकरण: आरोग्य विषयक समस्या आणि त्याविषयीचे उपचार याची माहिती सर्वाना सहज सुलभतेने कुठल्याही मोबदल्याशिवाय उपलब्ध व्हावी हा या लेखांचा हेतू आहे. या लेखनामध्ये प्रकाशित माहिती म्हणजे तज्ञ अधिकृत डॉक्टरांच्या तपासणी, रोगनिदान, उपचार आणि वैद्यकीय सेवेचा पर्याय नाही. जर तुमची मुले, कुटुंबातील सदस्य, नातेवाईक यापैकी कुणीही आजारी असतील, त्यांना याठिकाणी वर्णन केलेली काही लक्षणे दिसत असतील तर, कृपया तत्काळ आपल्या डॉक्टरांना जाऊन भेटा. डॉक्टरांच्या मार्गदर्शना शिवाय स्वतः, तुमची मुले, कुटुंब सदस्य, किंवा अन्य कुणावरही वैद्यकीय उपचार करू नका किंवा औषधे देवू नका. myUpchar आणि न्यूज18 यावर प्रकाशित माहिती, त्या माहितीच्या अचूकतेवर, या माहितीच्या परिपूर्णते वर विश्वास ठेवल्याने, तुम्हाला कुठलीही हानी झाली किंवा काही नुकसान झाले तर, त्याला myUpchar आणि न्यूज18 जबाबदार असणार नाही, हे तुम्हाला मान्य आहे, आणि त्याच्याशी तुम्ही सहमत आहात.

First published: November 28, 2020, 2:49 PM IST
Tags: healthskin

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading