मुंबई, 1 फेब्रुवारी : गळणारे केस ही आजच्या काळात सगळ्यांचाच अडचण झाली आहे. हे रोखण्यासाठी काही घरगुती पण प्रभावी तेलं वापरू तुम्ही शकता. यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्काल्प मसाज करा. यातून मन (mind) शांत होईल. टाळूची (scalp) रोमछिद्रंही मजबूत होतील. केसांना आतून पोषण मिळेल आणि केसांची मुळं (roots) मजबूत होतील. केसांना मसाज (massage) करण्यासाठी ही तेलं सर्वात चांगली आहेत.
नारळाचं तेल (coconut oil)
नारळाचं तेल स्काल्प मसाजसाठी खूप चांगलं आहे. यात एक चांगला सुगंध (fragrance) असतो. आणि केसांना खूप चांगलं पोषण (nourishment) देण्याची क्षमता असते. ज्यांचे केस कोरडे आणि निर्जीव झालेत त्यांना हे तेल खूप उपयोगी पडेल.
बदामाचं तेल
बदामाचं तेल केवळ तुमची स्मरणशक्तीच (memory) वाढवत नाही तर केसांनाही मोलाचं पोषण देतं. बदामाचं तेल नारळाच्या तेलाहूनही जास्त पोषक असतं. याची मालिश केल्यानं तणाव कमी होतो. शिवाय यातून डोकेदुखीही कमी होते.
मोहरीचं तेल
हो. मोहरीचं तेल खाण्यात वापरताततच सोबतच केसांसाठीही हे गुणकारी आहे. केसांना खूप चांगले फायदे या तेलातून मिळतात. याचा कडवट वास कदाचित अनेकांना आवडणार नाही. मात्र याचे गुण अतिशय फायदेशीर आहेत.
तिळाचं तेल
हे तेल स्काल्प अर्थात टाळूला चांगलं पोषण देतं. तुमचे केस पातळ, कोरडे आणि दोन टोकं फुटलेले झाले असतील तर तुम्ही नक्कीच तिळाचं तेल वापरलं पाहिजे. यातून टाळूला आर्द्रता, थंडावा मिळतो. शिवाय डोकेदुखीपासून आराम मिळतो. या तेलाचे फायदे अजून वाढवायचे असतील तर यात ब्राम्ही किंवा जास्वंद यांचं तेलसुद्धा मिसळा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health, Problems, Woman hair