नवी दिल्ली, 12 फेब्रुवारी: Omicron च्या अनेक लक्षणांशी संबंधित माहिती स्पष्ट केली गेली आहे, परंतु हा प्रकार देखील वेगळा आहे. कारण, काही वेळा त्याची लक्षणे स्पष्ट होत नाहीत. मात्र विशेष बाब म्हणजे, Omicron च्या त्वचेवर होणार्या परिणामाबाबत काही लक्षणं आहेत, ज्याबद्दल जागरुक असणं अत्यंत आवश्यक आहे. कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन संसर्गामध्ये त्वचेवर दिसू शकणारी अनेक लक्षणं आहेत.
बोटांना खाज सुटणे
हिंदुस्थान टाइम्सने दिलेल्या बातमीनुसार, Omicron चं एक लक्षण म्हणजे पायाची बोटं सुजलेली लाल किंवा जांभळी होतात. याशिवाय, बोटांनाही खाज येऊ शकते. सुजल्यामुळं बोटांमध्ये फोड येणं, खाज येणं किंवा दुखणंही जाणवू शकतं. अमेरिकन अॅकॅडमी ऑफ डर्मेटोलॉजी असोसिएशन म्हणते की, काही लोकांना त्या भागात खाज सुटते आणि फोड येतात. त्याच वेळी, पुष्कळ लोकांच्या मुरुमांमध्ये पू देखील होऊ शकतो.
हे वाचा -
Liver Healthy: लिवर खराब होणं म्हणजे संपलं..! निरोगी आरोग्यासाठी आधीपासूनच अशी घ्या काळजी
फुटलेले ओठ
बर्याच कोविड-19 संसर्गामध्ये सामान्य सर्दीसारखीच लक्षणं असू शकतात. फुटलेले ओठ त्यापैकी एक आहे. जर तुमचे ओठ फुटले असतील किंवा ओठ दुखत असतील तर तो कोविड-19 चा धोका असू शकतो. त्याच वेळी, कोरोनामधून बरे झाल्यानंतरही अनेकांना या समस्येचा सामना करावा लागू शकतो.
हे वाचा -
Why Men Sleep After Romance: पुरुषांना सेक्सनंतर लगेच झोप का लागते? त्यापाठीमागील काय आहे सायन्स
कोरडी त्वचा
अनेकांची त्वचाही कोरडी पडते. ही समस्या जसजशी वाढत जाते, तसतशी त्वचा कोरडी होते आणि खाज सुटते. कोरोनामधून बरे झाल्यानंतरही हा त्रास अनेक दिवस टिकू शकतो. हे टाळण्यासाठी, त्वचेतील ओलावा टिकवून ठेवण्याचे (Hydrated) उपाय करा ठेवा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.