मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Weight Loss Tips : वजन कमी करण्यासाठी काय खाणं आहे उत्तम? पनीर की चिकन

Weight Loss Tips : वजन कमी करण्यासाठी काय खाणं आहे उत्तम? पनीर की चिकन

कोणताही आजार असेल तर डॉक्टर सर्वांत अगोदर लठ्ठपणा कमी करण्याचा सल्ला देतात. वाढलेल्या चरबीमुळे शारीरिक त्रास तर होतोच शिवाय मानसिक स्थितीवरही परिणाम होतो.

कोणताही आजार असेल तर डॉक्टर सर्वांत अगोदर लठ्ठपणा कमी करण्याचा सल्ला देतात. वाढलेल्या चरबीमुळे शारीरिक त्रास तर होतोच शिवाय मानसिक स्थितीवरही परिणाम होतो.

कोणताही आजार असेल तर डॉक्टर सर्वांत अगोदर लठ्ठपणा कमी करण्याचा सल्ला देतात. वाढलेल्या चरबीमुळे शारीरिक त्रास तर होतोच शिवाय मानसिक स्थितीवरही परिणाम होतो.

 • Trending Desk
 • Last Updated :
 • Mumbai, India

  मुंबई, 22 मार्च : लठ्ठपणा हा निरोगी जीवनाचा मोठा शत्रू आहे. लठ्ठपणामुळे डायबेटिस, हार्ट डिसिज, मेंदूचे आजार, डोळ्यांच्या समस्या इत्यादी आजार होऊ शकतात. कोणताही आजार असेल तर डॉक्टर सर्वांत अगोदर लठ्ठपणा कमी करण्याचा सल्ला देतात. वाढलेल्या चरबीमुळे शारीरिक त्रास तर होतोच शिवाय मानसिक स्थितीवरही परिणाम होतो. काही लोक लठ्ठपणा कमी करण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करतात पण त्यांचं वजन कमी होत नाही. जर तुम्ही देखील त्यापैकी एक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.

  लठ्ठपणा कमी करण्यासाठी म्हणजेच वजन नियंत्रणात आणण्यासाठी योग्य आहाराची फार महत्त्वाची भूमिका आहे. जेव्हा वजन कमी करण्याची वेळ येते तेव्हा आहारात चिकनचा समावेश करावी की पनीरचा हा मोठा प्रश्न निर्माण होतो. दोन्हीमध्ये जास्त प्रमाणात प्रोटिन्स असतात. स्नायू बळकट करण्यासाठी आणि ते दुरुस्त करण्यासाठी चिकन आणि पनीर हे दोन्हीही पदार्थ मदत करतात. दोन्हींमध्ये असे काही फरक आहेत जे वजन कमी करण्यासाठी अधिक फायदेशीर ठरतात. 'झी न्यूज'नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

  पनीर हे एक प्रकारचं चीज (Cheese) आहे. सामान्यतः भारतीय आणि पाश्चिमात्य जेवणात त्याचा वापर केला जातो. यामध्ये प्रोटिन्स, कॅलरीज आणि फॅटचं प्रमाण जास्त असतं. पनीरमध्ये कॅल्शियमदेखील मुबलक प्रमाणात आढळतं. हाडं मजबूत ठेवण्यासाठी कॅल्शियम आवश्यक असते. चिकन एक लीन प्रोटिन (Lean protein) आहे. त्यामध्ये कॅलरी आणि फॅट्सचं प्रमाण कमी असतं. त्यात अॅमीनो अॅसिडचं प्रमाण जास्त असतं. स्नायूंच्या निर्मितीसाठी आणि दुरुस्तीसाठी हे अॅसिड आवश्यक असतं. याशिवाय, चिकन हे व्हिटॅमिन बी 12 चा देखील चांगला स्रोत आहे. जो शरीरातील उर्जेची पातळी राखण्यासाठी आणि मज्जासंस्था निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक आहे.

  वजन कमी करण्यासाठी नेमकं काय खावं?

  या प्रश्नाचं उत्तर चिकन आहे. पनीर हे प्रोटिनचा चांगला स्रोत असला तरी त्यात कॅलरी आणि फॅट्सचं प्रमाण जास्त असतं. म्हणजे आवश्यकतेपेक्षा जास्त कॅलरी शरीरात गेल्यानं वजन वाढू शकतं. तर, चिकन हे लीन प्रोटिन आहे, ज्यामध्ये कॅलरी आणि फॅट्स कमी असतात. याचा अर्थ असा की तुम्ही जास्त चिकन खाल्लं तरी तुमच्या पोटात जास्त कॅलरी जाणार नाहीत. याव्यतिरिक्त, चिकनमधील अॅमीनो अॅसिड्स तुम्हाला स्नायू बळकट करण्यास, दुरुस्त करण्यात, चयापचय वाढविण्यात आणि वजन कमी करण्यात मदत करू शकतात.

  हे लक्षात घेणं महत्त्वाचे आहे की, चिकन आणि पनीर हे दोन्ही पदार्थ वजन कमी करण्यासाठी आवश्यक असलेल्या निरोगी आहाराचा एक भाग असू शकतात. महत्त्वाचं म्हणजे हे पदार्थ संतुलित प्रमाणात खाणं गरजेचं आहे. तळण्याऐवजी ग्रिलिंग किंवा बेकिंगसारख्या पद्धतीनं ते शिजवलं पाहिजे. शाकाहारी व्यक्तींनी वजन कमी करण्यासाठी पनीरचा आहारात समावेश केला पाहिजे.

  First published:
  top videos

   Tags: Health, Health Tips, Lifestyle, Weight loss tips