मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

घरातील लग्नकार्यासाठी नातेवाईकांना द्या खास निमंत्रण; WhatsAppवरून पाठवा लग्नपत्रिका

घरातील लग्नकार्यासाठी नातेवाईकांना द्या खास निमंत्रण; WhatsAppवरून पाठवा लग्नपत्रिका

घरातील लग्नकार्यासाठी नातेवाईकांना द्या खास निमंत्रण; WhatsAppवरून पाठवा लग्नपत्रिका

घरातील लग्नकार्यासाठी नातेवाईकांना द्या खास निमंत्रण; WhatsAppवरून पाठवा लग्नपत्रिका

Lagna Patrika format in Marathi: डिजिटलायझेशनच्या युगात पत्रिका ऑनलाईन पाठवल्या जातात. व्हॉट्सअपच्या माध्यमातून पत्रिका पाठवण्यासाठी अनेक जण एखादी नमुना पत्रिका शोधत असतात, ज्या माध्यमातून ते त्यांची आवश्यक माहिती भरून नातेवाईक, मित्रमंडळींना निंमत्रण देऊ शकतील.आज आम्ही तुमच्यासाठी लग्नपत्रिकेचा फॉरमॅट सांगणार आहोत, जो तुम्ही तुमच्या आप्तेष्टांना पाठवू शकता.

पुढे वाचा ...
  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Suraj Sakunde

मुंबई, 3 डिसेंबर: हिंदू धर्मामध्ये मुहुर्ताला विशेष महत्त्व आहे. एखादी गोष्ट खरेदी करणं असो, एखादा विधी असो, घरातील एखादा कार्यक्रम असो अशा वेळी मुहूर्त पाहिला जातो. हिंदू धर्मात विवाह हा अतिशय महत्त्वाचा विधी मानला जातो. लग्न विधीवत आणि मुहूर्तावर व्हावं, यासाठी लोक प्रयत्नशील असतात. याप्रमाणंच या मुहूर्तावर सर्व नातेवाईक, आप्तेष्ट यांनीही हजेरी लावावी म्हणून त्यांना लग्नपत्रिकेच्या माध्यमातून आमंत्रित केलं जातं.

लग्नपत्रिकेमध्ये लग्नाच्या दिवशीचे विविध विधी, ते विधी कुठं होणार आहेत याची माहिती, वधू-वराचं नाव, विवाहस्थळ, दिनांक, यजमान कुटूंबातील सदस्यांची नावं, मुहूर्त इत्यादीची संपूर्ण माहिती असते. ही पत्रिका नातेवाईकांना पोहोचली म्हणजे ते लग्नात उपस्थित राहत असत. आता जग बदललंय. डिजिटलायझेशनच्या युगात पत्रिका ऑनलाईन पाठवल्या जातात. व्हॉट्सअपच्या माध्यमातून पत्रिका पाठवण्यासाठी अनेक जण एखादी नमुना पत्रिका शोधत असतात, ज्या माध्यमातून ते त्यांची आवश्यक माहिती भरून नातेवाईक, मित्रमंडळींना निंमत्रण देऊ शकतील.आज आम्ही तुमच्यासाठी लग्नपत्रिकेचा फॉरमॅट सांगणार आहोत, जो तुम्ही तुमच्या आप्तेष्टांना पाठवू शकता.

लग्न पत्रिका नमुना 1: (Marriage Invitation format in Marathi)

|| श्री गणेशाय नम: ||

श्री कुलस्वामिनी कृपेने आमचे येथे,

चि.            (वराचं नाव व पत्ता)

आणि

चि. सौ. का.          (वधूचं नाव व पत्ता)

यांचा शुभविवाह

मिती (मराठी महिन्याचं नाव) कृ. ......... शके 1944 (वार आणि दिनांक) ........ रोजी (लग्नाचा शुभ मुहूर्त, वेळ)............. या शुभ मुहूर्तावर करण्याचं योजिले आहे.

विवाहस्थळ-

लग्न म्हणजे रेशीम गाठ । अक्षता आणि मंगलाष्ट्का सात

दोनाचे होणार आता चार हात । दोन जीव गुंतणार एकमेकांत

गोड गोजिरी लाड लाजिरी । लाडकी आई बाबाची

नवरी होणार आज तू । सून एका नव्या घराची

स्वप्न दोघांच्या लग्नाचे । मंगलाष्टकांनी पूर्ण होते

शुभ आशीर्वादाच्या साथीने । नव्या संसाराची सुरवात होते

आपले स्नेहांकित-

वरील विनंतीस मान देऊन आपण अगत्य येण्याची कृपा करावी.

 हेही वाचा: Chanakya Niti: चाणक्य नीतित सांगितली भावनिक स्त्रियांबद्दलची खास गोष्ट, कुटुंबाला होतात ‘हे’ फायदे

लग्नपत्रिका नमुना 2:

|| श्री गणेशाय नम: ||

स. न. वि. वि. श्री कृपेकरून आमचे येथे

चि. सौ. कां.     (वधूचे नाव)

(मुलीच्या वडिलांचे नाव) यांची सुकन्या

आणि

चि.     (वराचे नाव)

(मुलाच्या वडिलांचे नाव) यांचा सुपुत्र, राहणार (पत्ता)

यांचा शुभविवाह करण्याचे योजिले आहे.

हळदी समारंभ -

दिनांक -

वार -

वेळ -

विवाह मुहूर्त -

दिनांक -

वार -

वेळ - शुभ मुहूर्त -

विवाहस्थळ –

पाऊस क्षणाचा पण गारवा कायमचा ।। भेट क्षणाची पण मैत्री दोन जीवांची ।। मुहूर्त क्षणाचा पण नाती कायमची

आपला सहभागही क्षणाचा पण आशीर्वाद कायमचा ।। या मनस्वी इच्छेने शुभमंगल प्रसंगी अगत्य येऊन

वधू – वरास शुभाशिर्वाद द्यावेत ही नम्र विनंती

आपले स्नेहांकित...

वरील विनंतीस मान देऊन अगत्य येण्याचे करावे.

First published:

Tags: Wedding