हृदयासाठी उत्तम आहे अक्रोड; पण खाण्याची वेळ, पद्धत आणि प्रमाणही आहे महत्त्वाचे

हृदयासाठी उत्तम आहे अक्रोड; पण खाण्याची वेळ, पद्धत आणि प्रमाणही आहे महत्त्वाचे

अक्रोड (walnut) कमी प्रमाणात खाण्याचा सल्ला दिला जातो. अधिक प्रमाणात खाल्लं तर अनेक समस्यांचा धोका असतो.

  • Last Updated: Dec 14, 2020 10:21 AM IST
  • Share this:

ज्याचं हृदय तंदुरुस्त तितकं त्याचं शरीर तंदुरुस्त असतं. म्हणून त्या उपायांचा अवलंब केला पाहिजे ज्याने हृदयाचे आरोग्य चांगलं राहिल. व्यक्ती जे खातो त्याचा परिणाम त्याच्या शरीराबरोबरच त्याच्या हृदयाच्या आरोग्यावर होत असतो. आपल्या आहारात म्हणूनच अशा खाद्यपदार्थांचा समावेश केला पाहिजे जे आपल्या शरीरासोबत हृदयाचे स्वास्थ्य पण चांगलं ठेवतील. सुकामेवा संपूर्ण शरीराच्या स्वास्थ्यालादेखील फायदा देतं. म्हणून अक्रोड आपल्या आहारात सामील करायला हवं.

myupchar.com चे डॉ. लक्ष्मीदत्त शुक्ला यांनी सांगितलं, सुक्यामेव्यात फक्त पोषक घटकच भरपूर प्रमाणात नसतात तर त्या सोबत त्यात अनेक बायोएक्टिव घटक पण असतात जे शरीराला तंदुरुस्त ठेवण्यात मदत करतात. अक्रोड मेंदूसोबत हृदयासाठी पण फायद्याचं असतं. ते हृदयाचं कार्य संचालित आणि नियमित करतं त्यासोबत त्यात सुधारपण करत असतं. अक्रोडमध्ये ओमेगा फॅटी एसिड अधिक प्रमाणात असतं ज्याचा कार्डियोवस्कुलर सिस्टमला खूप लाभ होतो. ओमेगा 3 फॅटी एसिड शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलला कमी करतं आणि चांगलं कोलेस्ट्रॉल वाढवतं जे हृदयासाठी लाभदायक असतं. एक अक्रोड खाण्यानं रक्तदाब कमी होतो, असं आढळून आलं आहे. म्हणून उच्च रक्तदाब असणाऱ्या लोकांनी ते रोज खाल्लं पाहिजे.

myupchar.com चे एम्सशी संबंधित डॉ. नबी वली यांनी सांगितलं,  उच्च रक्तदाबामध्ये उच्च दबावामुळे रक्त पंप करावं लागल्यानं हृदयाचे स्नायू जड होतात. त्यामुळे या शरीराची गरज पूर्ण करण्यात अडचण येते, ते योग्य प्रमाणात रक्त पंप करू शकत नाहीत त्याने हृदयक्रिया थांबू शकते.

हे वाचा - तुमच्यामध्ये iodine ची कमी तर नाही ना? शरीर देतंय 5 संकेत

अक्रोडमध्ये जीवनसत्व बी, तंतुमय पदार्थ, मॅग्ननेशियम आणि एंटीऑक्सिडंट जसे व्हिटामिन ई भरपूर प्रमाणात असतं. अक्रोड प्रथिनांचा चांगला स्त्रोत आहे. अक्रोड सूज नियंत्रित करतं, वजन घटवतं, हे सर्व गुण एकत्रितपणे हृदयाचं स्वास्थ्य चांगलं करण्यास मदत करतं.

किती आणि केव्हा खावं अक्रोड

अक्रोडमध्ये calorie जास्त असतात, त्यामुळे ते कमी प्रमाणात खाण्याचा सल्ला दिला जातो. अधिक प्रमाणात खाल्लं तर वजन वाढण्याचा धोका असतो. अक्रोडचे अधिक सेवन हगवणीचं कारण होऊ शकते. लोकांना वाटतं त्यात फॅट खूप प्रमाणात असतात, आणि त्यानं वजन वाढेल पण जर मर्यादित प्रमाणात अक्रोड खाल्ले तर वजन कमी करायला मदत होते कारण योग्य प्रमाणात प्रथिने, फॅट, आणि कैलरी मिळतात.

रोज एक ते दोन अक्रोड सकाळी आणि संध्याकाळी नाश्त्यामध्ये खाल्ले तर चालतात. एका दिवसात पाचपेक्षा जास्त अक्रोड शरीरासाठी नुकसानदायक ठरतात, कारण ते गरम पडतात आणि ताप येणं, तोंड येणं यासारखे आजार होऊ शकतात. कफ असेल तर अक्रोड खाऊ नये. रिकाम्यापोटी अक्रोड खाऊ नये. अक्रोडच्या तेलानं काही दिवस पोटात जळजळ होऊ शकते.

हे वाचा - केसांमधील उवांमुळे हैराण झाला आहात? घरच्या घरी तयार करा हे रामबाण औषध

अक्रोड खाण्याची योग्य पद्धत म्हणजे त्याला केळं किंवा दही यामध्ये एकत्र करून खावं. त्याशिवाय सलाडसोबत पण अक्रोड खाता येतं. त्यात तुम्ही लिंबाचा रस, लसूण, आले, ऑलिव्ह तेल, मीठ, आणि काळे मिरेपूड टाकू शकता.

अधिक माहितीसाठी वाचा आमचा लेख - मेंदुत संसर्ग: लक्षणे, कारणे...

न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.

अस्वीकरण: आरोग्य विषयक समस्या आणि त्याविषयीचे उपचार याची माहिती सर्वाना सहज सुलभतेने कुठल्याही मोबदल्याशिवाय उपलब्ध व्हावी हा या लेखांचा हेतू आहे. या लेखनामध्ये प्रकाशित माहिती म्हणजे तज्ञ अधिकृत डॉक्टरांच्या तपासणी, रोगनिदान, उपचार आणि वैद्यकीय सेवेचा पर्याय नाही. जर तुमची मुले, कुटुंबातील सदस्य, नातेवाईक यापैकी कुणीही आजारी असतील, त्यांना याठिकाणी वर्णन केलेली काही लक्षणे दिसत असतील तर, कृपया तत्काळ आपल्या डॉक्टरांना जाऊन भेटा. डॉक्टरांच्या मार्गदर्शना शिवाय स्वतः, तुमची मुले, कुटुंब सदस्य, किंवा अन्य कुणावरही वैद्यकीय उपचार करू नका किंवा औषधे देवू नका. myUpchar आणि न्यूज18 यावर प्रकाशित माहिती, त्या माहितीच्या अचूकतेवर, या माहितीच्या परिपूर्णते वर विश्वास ठेवल्याने, तुम्हाला कुठलीही हानी झाली किंवा काही नुकसान झाले तर, त्याला myUpchar आणि न्यूज18 जबाबदार असणार नाही, हे तुम्हाला मान्य आहे, आणि त्याच्याशी तुम्ही सहमत आहात.

First published: December 14, 2020, 10:21 AM IST

ताज्या बातम्या