मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

अनवाणी चालण्याचे आहेत अनेक फायदे; डायबेटीस, BP सुद्धा राहील नियंत्रणात

अनवाणी चालण्याचे आहेत अनेक फायदे; डायबेटीस, BP सुद्धा राहील नियंत्रणात

नवी दिल्ली, 18 ऑगस्ट : आजकाल मधुमेह (Diabetes) आणि रक्तदाब (Blood Pressure) यासारखे आजार हे सर्वसामान्य आजार झाले आहेत. लोकांना पूर्वीसारखी या आजारांची भीती वाटत नाही. अगदी प्रत्येक घरात या आजाराचा शिरकाव झाला आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अगदी लहान मुलांपासून ते वृद्धांपासून कोणत्याही वयोगटातील व्यक्तींना हे आजार होऊ शकतात. लोक या आजारावर मात करण्यासाठी विविध प्रकारचे उपाय करतात. वेगवेगळ्या डॉक्टरांकडे फेऱ्या मारतात. पण यातून कायमची सुटका होत नाही. मात्र एका साध्या सोप्या उपायानं या आजारांवर नियंत्रण ठेवणं अगदी सहज शक्य आहे. हा उपाय आहे अनवाणी पायाने चालण्याचा (Bare foot Walk). चालण्याचा व्यायाम हा सर्वात सोपा आणि अत्यंत प्रभावी व्यायाम आहे. सहजपणे प्रत्येकाला हा व्यायाम करणे शक्य असते. झीन्यूज इंडिया डॉट कॉमनं याबाबतचं वृत्त दिलं आहे. आजकालची ताणतणावाची जीवनशैलीही (Lifestyle) या आजारांना निमंत्रण देत आहे. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, व्यायामाचा अभाव, दीर्घकाळ एकाच ठिकाणी बसून काम, स्पर्धा, ताण या सगळ्यामुळे हे आजार होण्याचे प्रमाण वाढले आहे. आजकाल बहुतांश लोकांचे काम एका ठिकाणी बसून असते. त्यामुळे शरीराची हालचाल खूप कमी होते. एका जागी खूप वेळ बसल्यानं पायांवर सूज येते. अनवाणी पायानं चालण्याने शरीरात रक्ताचा प्रवाह योग्य राहतो आणि रक्ताभिसरण (Blood Circulation) योग्य प्रकारे होते. मधुमेही रुग्णांनाही गुडघेदुखीची समस्या असते. अनवाणी पायाने चालण्याने ही समस्याही दूर होईल. चालण्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण सुधारते आणि रक्तातील साखरेचे नियंत्रणही होते. हाडं मजबूत होतात. तुमची हाडे (Bones) वयापूर्वी कमकुवत होऊ लागली असतील तर चालण्याचा व्यायाम अतिशय फायदेशीर ठरतो. सतत चालण्याने हाडांमध्ये असलेले कॅल्शियम वाढते आणि ती मजबूत होतात. त्याचप्रमाणे, दृष्टी कमी झाली असेल तर चालण्याच्या व्यायामामुळे त्यातही सुधारणा होते. तुम्ही रोज अनवाणी चालत असाल तर शरीरातील रक्तप्रवाह चांगल्या प्रकारे होतो. चालताना पायावर पडणाऱ्या दबावामुळे डोळे नेहमी चांगले राहतात. शरीराच्या मज्जासंस्थेसाठीही चालणे फायदेशीर मानले जाते. दररोज नियमितपणे अनवाणी चालण्याने रक्तदाब नियंत्रित राहण्यासही मदत होते. साखरही नियंत्रणात राहते. त्यामुळे भरमसाठ औषधे घेण्यापासून सुटका हवी असेल आणि मधुमेह, रक्तदाब, गुडघेदुखी या आजारांना दूर ठेवायचे असेल तर अनवाणी पायी चालण्याचा व्यायाम नियमितपणे करा.
First published:

पुढील बातम्या