मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Vitamin D बद्दल महत्त्वाचं संशोधन आलं पुढे; कोरोना संसर्गाचा धोका होतो कमी

Vitamin D बद्दल महत्त्वाचं संशोधन आलं पुढे; कोरोना संसर्गाचा धोका होतो कमी

शिकागो मेडिसीन युनिव्हर्सिटीतल्या संशोधकांनी Vitamin D बद्दल केलेलं संशोधन कोरोना काळात महत्त्वाचं ठरणारं आहे.

शिकागो मेडिसीन युनिव्हर्सिटीतल्या संशोधकांनी Vitamin D बद्दल केलेलं संशोधन कोरोना काळात महत्त्वाचं ठरणारं आहे.

शिकागो मेडिसीन युनिव्हर्सिटीतल्या संशोधकांनी Vitamin D बद्दल केलेलं संशोधन कोरोना काळात महत्त्वाचं ठरणारं आहे.

नवी दिल्ली, 31 ऑगस्ट : हाडं, दात, स्नायू कणखर करण्यासाठी आणि त्यांचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी व्हिटॅमिन डी (Vitamin D) अर्थात ड जीवनसत्त्वाचं काम महत्त्वाचं आहे, हे आपल्याला माहिती आहे. कोरोना संसर्गाच्या भयानक साथीत मात्र हेही सिद्ध झालं आहे, की शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी आणि कोरोनासारख्या (Corona) घातक विषाणूशी दोन हात करण्याची क्षमता मिळवण्यासाठीही व्हिटॅमिन डी महत्त्वपूर्ण ठरतं.

शिकागो मेडिसीन युनिव्हर्सिटीतले डॉ. डेव्हिड मेल्टजर यांच्या नेतृत्वाखाली शास्त्रज्ञांच्या एका टीमने यावर एक संशोधन केलं आहे. व्हिटॅमिन डीची कमतरता नसलेल्या व्यक्तींच्या तुलनेत व्हिटॅमिन डीची कमतरता असलेल्या व्यक्तींमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता जवळपास दुप्पट होती, असं या संशोधनात आढळलं आहे. 489 जणांवर हा प्रयोग करण्यात आला होता. ज्यांच्यामध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता होती, त्यांच्यात कोविड रुग्ण आढळण्याचं प्रमाण 1.77 पट अधिक होतं, असंही त्यात आढळलं.

शास्त्रज्ञ म्हणतात, की नियमित आहारातून व्हिटॅमिन डी शरीराला मिळत असेल, तर कोरोनापासून बचाव करण्यासाठी त्याचा हातभार लागू शकतो. ज्यांच्या शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता असेल, त्यांना कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो.

व्हिटॅमिन डी हे एक असं जीवनसत्त्व आहे, की जे फॅट्समध्ये विरघळतं (Fat Soluble Vitamin) आणि शरीर हेल्दी राहण्यासाठी मदत करतं. प्रतिकारशक्तीला (Immunity Boost) प्रोत्साहन देणं, स्नायू, हाडं मजबूत करणं, मानसिक आरोग्य चांगलं राखणं आदी कामांमध्ये ते साह्यभूत होतं. तसंच, हृदयविकार, मधुमेह, कॅन्सर अशा गंभीर विकारांपासून बचाव करण्यासाठीही त्याचा उपयोग होतो.

'हेल्थलाइन'मध्ये दिलेल्या माहितीनुसार, आपण जेव्हा सूर्यप्रकाशात येतो, तेव्हा आपल्या त्वचेखाली व्हिटॅमिन डीची निर्मिती आपोआपच होऊ लागते. सूर्यप्रकाश हाच व्हिटॅमिन डीचा मुख्य स्रोत आहे. त्यामुळेच या व्हिटॅमिनला सनशाइन व्हिटॅमिनही (Sunshine Vitamin) म्हटलं जातं. खासकरून सकाळच्या कोवळ्या उन्हात गेल्यास व्हिटॅमिन डीची निर्मिती चांगल्या प्रमाणात होऊ शकते. भारतीय या बाबतीत सुदैवी आहेत, की वर्षातले प्रचंड पाऊस पडणारे एक-दोन महिने वगळता बाकीच्या काळात सूर्यप्रकाश विपुल प्रमाणात उपलब्ध असतो.

याशिवाय काही खाद्यपदार्थांमधूनही व्हिटॅमिन डी मिळतं. त्यात साल्मन, ट्यूना आदी मासे, लिव्हर ऑइल, अंड्याचा बलक, मश्रूम, गायीचं दूध, सोयाबीन दूध, ऑरेंज ज्यूस, ओटमील आदींचा समावेश होतो. व्हिटॅमिन डी सप्लिमेंट्सचाही उपयोग या जीवनसत्त्वाचं शरीरातलं प्रमाण वाढवण्यासाठी करता येतो.

First published:

Tags: Corona, Covid19, Vitamin D