कैलाश कुमार, प्रतिनिधी बोकारो, 28 जुलै : शाकाहारी लोकांचे मटण मानले जाणारे रुगडा आता झारखंडच्या बोकारोमधील रस्त्यावर उपलब्ध झाला आहे. रुगडा ही एक प्रकारची भाजी आहे. ही भाजी मशरूमसारखी असते. तसेच अत्यंत दुर्गम ग्रामीण भागात मर्यादित प्रमाणात मिळते. तिच्यामध्ये अनेक पौष्टिक गुणधर्म असल्याने ती लोकांना खूप आवडते. सध्या झारखंड राज्यातील बोकारोच्या सेक्टर 1 रोडवरील चंदनक्यारी येथून आलेले नारायण महतो रस्त्यावर रुगडा भाजीची विक्री करत आहेत. नारायण महतो यांनी याबाबत सांगितले की, ते रुगडा बोकारो, झारग्राम आणि रांचीच्या आसपासच्या गावांमध्ये जाऊन खरेदी करतात. यानंतर मग रस्त्याच्या कडेला या भाजीजी विक्री करतात. सध्या रुगडा या भाजीला 800 रुपये प्रतिकिलो असा भाव मिळत आहे.
नारायण महतो हे सध्या रोज 20 ते 25 किलो रुगडा विकतात. ही भाजी फक्त दोन महिनेच असते. त्यामुळे ती इतकी महाग मिळते. ढगांच्या गडगडाटामुळे जंगलात सखुआच्या झाडाखाली ही रुगडा भाजी उगवते. त्यामुळे ही भाजी क्वचितच मिळते, असेही ते म्हणाले. आठवड्यातून चार दिवस विक्री - नारायण महतो यांनी सांगितले की, ते सोमवारी, बुधवारी आणि रविवारी दुकान लावतात आणि रुगडा विकतात. दुकानात दुपारी 12 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत विक्री केली जाते. याठिकाणी आलेल्या डीएन प्रसाद या ग्राहकाने सांगितले की, ही भाजी फारच स्वादिष्ट आहे. तसेच ही पूर्ण मटणसारखी लागते. त्यामुळे शाकाहारी लोकसुद्धा या भाजीचा आस्वाद घेऊ शकतात.